शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

केळीचे भाव कोसळले; हवालदिल शेतकऱ्याने अडीच एकरवरील बागेवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:54 IST

एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल केळीला भाव नेहमी असतो. मात्र सध्या तीनशे ते पाचशे  रुपयांपर्यंत भाव घसरला आहे.

ठळक मुद्देचार लाखांच्या उत्पन्नाला फटकाजोपासणा करणेही मुश्कील

पाथरी : लॉकडाऊन उठल्यानंतरही केळीचे भाव पडलेलेच आहेत. त्यामुळे शेतातील केळी  विक्रीसाठी परवडत नाही. १ हजार २०० रुपये क्विंटल  मिळणारा भाव ३०० ते ५०० रुपयापर्यंत कमी आला आहे. त्यामुळे कासापुरी येथील शेतकरी गणेश कोल्हे यांनी अडीच एकर केळी पिकावर नांगर फरविल्याने त्यांना चार लाख रुपयांचा फटका बसला आहे.

दरवर्षी केळी पिकाला चांगले मार्केट असते. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठा  खर्च करून केळी लागवड करतो. पाथरी तालुक्यात केळीचे क्षेत्र ५१० एकरवर आहे. यावर्षी  मार्च महिन्यापासून  कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु होते.  त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत कोसळली. दरम्यान केळीचे दर अचानक पडले. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी आपल्या गट नंंबर १७५ मध्ये  कासापूरी  शिवारात जून २०१९ मध्ये अडीच एकर शेतात साडेतीन हजार केळीची झाडे लावले होती. सदरील केळीच्या झाडास वर्षभर चांगली मेहनत घेतली. केळीवर तब्बल दीड लाख रुपये खर्चही केला, मात्र  आता केळीला भावच राहिला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यावर केळी पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल केळीला भाव नेहमी असतो. मात्र सध्या तीनशे ते पाचशे  रुपयांपर्यंत भाव घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यास हे परवडत नाही. केळीची जोपासणा करणेही मुश्कील होऊन बसल्याने सदरील शेतकऱ्याने ५ नोव्हेंबर रोजी केळीवर नांगर फिरवला आहे. सदरील शेतकऱ्याचे यामुळे चार लाख लाखांचे नुकसान झाले आहे.

दहा वर्षात पहिल्यांदा परिस्थिती वाईटदसऱ्यानंतर केळीचे भाव कमालीचे गडगडले आहेत. व्यापारी केळीच्या फडाकडे मंदी आल्याचे करण देऊन  फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. केळीची बाग खरेदी केली तर अर्धा माल फेकून दिला जातो. त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. परिणामी नांगर फिरवावा लागला. कासापुरी येथील हे शेतकरी मागील 10 वर्षापासून केळीची बाग घेतात. मात्र यावर्षीसारखी परिस्थिती कधीच उद्भवली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती