शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

सोशल ड्रिंकच्या पाटर्य़ा

By admin | Updated: August 13, 2015 15:19 IST

ग्रामीण भागात काहीजण माळकरी असतात. ते व्यसनापासून लांब राहतात. वडीलधा-या माणसांचा थोडा धाकही असतो. शहरात तसं नसतं. इथं पर्याय अनेक, धाक कमी, दबाव कमी, आणि विरोधही कमी! त्यामुळे दारू ही फॅशन बनते.

‘माझे एक जरा प्रौढ मित्र. त्यांची ही गोष्ट. ते एकदा कुठल्या तरी आध्यात्मिक अधिक योगशिबिराला गेले होते. तिथल्या शिकवण्याने अत्यंत प्रभावित झाले. तिथे जी गोष्ट करायला सांगितली ती आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या शिबिरात त्यांनी सांगितलं होतं की, एकदा मुलं करती-सवरती झाली की घरात आपण पाहुण्यासारखं राहायचं. एरवी घरातील प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे (म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे) व्हावी असं त्यांना वाटत असे. त्यामुळे घरात वाद होत. पण शिबिरातून आल्यानंतर त्यांनी काटेकोर स्वभाव बाजूला ठेवला आणि पाहुण्यासारखे राहायला सुरुवात केली. घरातल्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालणं बंद झालं. सून तर फारच खूश झाली.

जी नवी जीवनशैली तुम्ही आत्मसात केली आहे ती तशीच राहावी म्हणून महिन्यातून दोनदा कुणाकडे तरी सत्संग करा. भजनं म्हणा, योगा करा असंही त्यांना सांगितलं होतं. ते तसंही करू लागले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यातल्या या बदलानं चकित झाले होते. पण एक दिवस एक घटना घडली. तशी छोटीशीच होती. विजेचं बिल दोन महिन्यात भरलं नव्हतं म्हणून वीज तोडायला माणसं आली. हे घरातच होते. त्यांची जी चिडचिड झाली त्याला तोडच नाही. आणि आपण घरात  पाहुणे आहोत हेच ते विसरले आणि थेट पहिल्यासारखे वागू लागले. जाम संतापले!’ 
- ढवळे सर सांगत होते. थांबून मलाच त्यांनी विचारलं, आता सांगा, असं का झालं असावं?
कदाचित हे वीज तोडणे प्रकरण त्यांना सहन झालं नसावं आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला असावा.
बरोबर. आता विचारात घ्या, की जो माणूस चांगला शिकला सावरला आहे त्याच्यावरही बंधनं घातली की कधीतरी ती तोडण्याची अनावर ऊर्मी येते आणि त्यानं स्वत:ने जे ठरवलंय ते तो विसरतो आणि पुन्हा मूळच्या वागण्याकडे परततो. तुम्हाला किती तरी उदाहरणो देता येतील. नियमित व्यायाम करणं, डाएट करणं, रोज सकाळी फिरायला जाणं अशा कित्येक गोष्टी करायच्या असं स्वत:वर अनेकजण बंधन घालून घेतात. पण कधी कंटाळा, कधी आळस, कधी घरी पाहुणो आले म्हणून त्या नियमात खंड पडतो. आणि काही दिवसांनी आपण काय ठरवलं होतं तेसुद्धा विसरून जायला होतं.
ही सामान्य माणसाची नित्य कथा! तर व्यसनाधीन झालेल्या माणसाला त्याच्यावरची बंधनं पाळता पाळता नाकीनऊ येतात आणि आपण आजारी व्यक्ती आहोत, आपल्या मेंदूत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत हे विसरून तो नियम तोडण्याला योग्य अशी परिस्थिती निर्माण करतो.
सर्व व्यसनी माणसांचे तीन महत्त्वाचे शत्रू असतात. काम, क्रोध आणि मोह. या प्रत्येक भावनेशी त्याचं एक प्रकारचं नातं असतं आणि ते मेंदूत कोरलं गेलेलं असतं. त्यामुळे जरा बारीकशी ठिणगी पडायचा अवकाश की न आवरता येणारा मोह येतोच पुढे. आणि मग पुन्हा ‘ये रे माङया  मागल्या..’ अशी अवस्था होते.
पण मग ही शक्यता सगळ्याच माणसांबाबत खरी म्हणायला हवी. ग्रामीण भागातून आलेल्या, कमी शिकलेल्या माणसांचं असंच होत असेल; फक्त शिकल्यासवरल्यांचंच जास्त होतं असं कसं म्हणता येईल? - माझा भाबडा प्रश्न.
आपल्याकडे ग्रामीण भागात अनेक माळकरी असतात. कुटुंबात वडीलधारी माणसांची थोडी का होईना जरब असते. काही महिने जर ते व्यसनमुक्त राहिले तर व्यसनमुक्त जीवनाचा आनंद त्यांना मिळतो. आणि त्याला ते सरावतात. तसंच गावाकडे बहुतेक सर्व माणसं एकमेकांना ओळखतात. त्यांचाही अप्रत्यक्ष दबाव असतो. अर्थात सगळ्याच घरी हे वातावरण असतंच असं नाही. पण असतं बहुतांश हे खरं.
पण शहरी भागात प्रलोभनं जास्त असतात. पंचतारांकित हॉटेलपासून हातभट्टीपर्यंत सगळे पर्याय उपलब्ध असतात. शहरी भागातल्या महिलाही काही दारूविरोधी आंदोलनं वगैरे करताना दिसत नाहीत. आणि मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांची व्यसनं दाबून ठेवली जातात. त्यामुळे बाहेरून मदत मिळण्याचे प्रमाणही कमी, तसे मार्गही ते शोधत नाहीत.
विभक्त कुटुंब व्यवस्था, दारूची सहज उपलब्धी, घरच्यांचा आजार झाकायचे केविलवाणो प्रयत्न, हल्ली सगळेच पितात हा वाढता सामाजिक दृष्टिकोन, अनेक ठिकाणी दारू ही प्रतिष्ठेचा अपरिहार्य भाग, कार्पोरेट क्षेत्रतल्या साप्ताहिक पाटर्य़ा या सा:यांत आता पुरुषच काय महिलांमध्येही व्यसन करण्याचं प्रमाण वाढत आहे. अशा मोहमयी दुनियेत स्वत: व्यसन न करण्याचा इरादा किती अवघड असेल, आणि अनेकांचा वारंवार मोडूनही पडत असेल का?
विचार करायला हवा.
 
व्यसन सुटत का नाही?
*व्यसन हा एक आजार आहे आणि तो आपल्याला झाला आहे हे व्यसनी मंडळी सोयीस्करपणो विसरतात.
*स्वत:वर बरीच बंधने घालणं त्यांना जमत नाही.
*शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रिकव्हरीचं प्रमाण जास्त असतं. याचे मुख्य कारण त्यांची उपचारांवर श्रद्धा असते.
*शहरी आणि निम-शहरी भागात प्रायव्हसीच्या कल्पनेमुळे इतर सामाजिक दबाव कमी असतो.
*मोहाच्या क्षणांना आवरणं आणि स्वत:ला सावरणं हे व्यसनमुक्तीचं मुख्य सूत्र आहे.
 
 
- मनोज कौशिक 
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो