शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

बंडखोर बिकिनी

By admin | Updated: July 16, 2015 19:27 IST

सभ्य आणि असभ्यतेच्या पारंपरिक व्याख्या मोडून नव्यानं काही प्रश्न विचारणा-या बिकिनीचा आजवरचा प्रवास झाला कसा ? त्या प्रवासाची ही एक रंजक सफर..

अनघा पाठक

जगण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार मागणा-या, आपल्या देहावर आपला हक्क सांगणा-या,
सभ्य आणि असभ्यतेच्या पारंपरिक व्याख्या मोडून नव्यानं काही प्रश्न विचारणा-या
बिकिनीचा आजवरचा प्रवास झाला कसा ? त्या प्रवासाची ही एक रंजक सफर..
-----------
 
* फ्रेंच डिझायनर लुईस रेअर्ड याने सर्वप्रथम मॉडर्न बिकिनी डिझाइन केली. हे डिझाइन एवढं खतरनाक होतं की कुणीही मॉडेल ते परिधान करायला तयार होईना. शेवटी लुईसने मिशेलीन बर्नाडिनी ह्या नग्ननृत्य करणा:या नर्तिकेला हा पोषाख चढवून जगासमोर पेश केलं. तो दिवस होता, 5 जुलै 1948.
 
* या नव्या स्वीमसुटला बिकिनी हे नाव मिळालं ते बिकिनी अॅटोल ह्या प्रसिद्ध ठिकाणामुळे. लुईसने त्याचं नवं डिझाइन जगासमोर आणलं त्याच्या फक्त पाचच दिवस आधी बिकिनी अॅटेलमध्ये अमेरिकेने 23 अणुबॉम्बची चाचणी केली होती. आणि या  घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली. तशीच खळबळ आपण डिझाइन केलेला स्वीमसूट माजवेल अशी लुईसला खात्री होती. म्हणूनच त्याने आपल्या डिझाइनचं नामकरण केलं- बिकिनी.
* आज पाश्चात्त्य जगात बिकिनीला सर्वमान्यता असली, तरी सुरुवातीच्या काळात बिकिनीला प्रखर विरोध झाला. विशेषत: चर्चकडून. अठराव्या शतकार्पयत कमी घेराचे, घोटय़ार्पयत येणारे झगे अंघोळीचा वा पोहोण्याचा पोषाख म्हणजेच बाथिंग सूट म्हणून वापरले जायचे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धार्पयत या  पोषाखात फारसा फरक पडला नव्हता. अगदी 19क्क् र्पयत बायका बीचवर लोकरीचे झगे वापरायच्या ज्यासाठी आठ मीटर कापड लागायचं.
* हे चित्र बदललं अनेट केलरमन ह्या स्त्रीच्या धाडसामुळे. जलतरणपटू असणा:या केलरमनला 19क्7 साली अमेरिकन सरकारने अटक केली. गुन्हा होता अंगाला घट्ट चिकटेल असा बिनबाह्यांचा पोहण्याचा पोषाख घालणं. मानेपासून पायार्पयत अंग झाकणारा हा घट्ट पोषाख तेव्हा अत्यंत वादग्रस्त ठरला. पण केलरमनच्या धाडसाने ब:याच स्त्रियांना आधुनिक स्वीमसूट घालण्याची प्रेरणा दिली.
* 19क्क् ते 193क् ह्या कालखंडात स्त्रीस्वातंत्र्याची नवी परिमाणं तयार होत होती. स्त्रियांनी पारंपरिक व्हिक्टोरियन ड्रेसेस सोडून सुटसुटीत पेहराव स्वीकारायला सुरुवात केली होती. स्त्रियांच्या स्कर्ट्सची उंची कमी व्हायला लागली होती. अशावेळी स्वीमसूट्स तरी कसे मागे राहतील. स्वीमसूट्स घालणं ही स्वातंत्र्याची नवी व्याख्या ठरू लागली. तरीही बहुतांश स्त्रिया समाजात ‘सभ्य’ ठरतील असेच स्वीमसूट्स वापरत होत्या.
* 1930 नंतर स्वीमसूटकडे बघण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडून आला. आतार्पयत हे पोषाख पाण्यात जाण्यासाठी वापरले जायचे. पण आता हे बीचवर पडून टॅन  होण्यासाठी वापरले जाऊ लागले. मूळ उद्देशच बदलल्यामुळे स्वीमसूटच्या डिझाइनमध्ये बदल होणं अपरिहार्य होतं. अशातच 1942 मध्ये अमेरिकेच्या वॉर प्रॉडक्शन बोर्डाने स्त्रियांच्या स्वीमसूटमध्ये अतिरिक्त वापरल्या जाणा:या कापडात कपात करण्याचा आदेश दिला आणि 1946 मध्ये  सर्वाधिक शरीर उघड टाकणा:या टू-पीस बिकिनीचा उदय झाला.
* ‘स्त्रीचं सर्व काही दाखवणारा पोषाख’ अशी जहरी टीका बिकिनीवर झाली. व्हॅटिकनने बिकिनीला पापी पोषाख ठरवले, तर स्पेन, पोतरुगाल, इटली, बेल्जिअम, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील बरीच राज्ये यांनी बिकिनीवर बंदी घातली. नॅशनल लीग ऑफ डिसेन्सीने हॉलिवूडच्या चित्रपटात बिकिनी वा स्त्रियांच्या नाभीचे दर्शन घडवणारा कुठलाही पोषाख दाखविण्यास बंदी घातली. हॉलिवूडच्या चित्रपटात बिकिनी दिसली ती 1962 च्या बॉण्डपटात.
* बिकिनीला विरोध करणा:यांची संख्या जसजशी वाढत होती, तसतशी बिकिनी घालणा:या स्त्रियांची संख्यादेखील वाढत होती. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिकिनीचा स्त्रीमुक्तीशी जोडला गेलेला संबंध. 
* आजमितीला बिकिनी हा 811 मिलियन गॅलर्सचा (अंदाजे सहा अब्ज रुपये) भलामोठा व्यवसाय बनला आहे.
 
 
भारतीय चित्रपटात पहिली बिकिनी
सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रrाचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या’ ह्या गाण्यात परिधान केलेला स्वीमसूट रुढार्थाने बिकिनी नसला, तरी त्याने तत्कालीन संस्कृतिरक्षकांच्या मेंदूला ङिाणङिाण्या आणल्या होत्या. हिंदी चित्रपटात पहिल्यांदा बिकिनी घातली ती शर्मिला टागोरने ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ चित्रपटात.
 
सभ्य काय, असभ्य काय?
बिकिनीबद्दलच्या वादात आणखी एका वादाची भर पडलीये ती म्हणजे ‘सभ्य’ बिकिनी आणि ‘असभ्य’ बिकिनी. अभिनेत्री आणि डिझायनर जेसिका रे हिने स्वत:ची ‘सभ्य’ बिकिनीज्ची रेंज आणली. तिच्या मते ह्या बिकिनीज स्टायलिशही आहेत आणि पालकांना चिंतेत न पाडणा:या आहेत, तर दुस:या बाजूला ‘माझी सभ्यता इतर कोण ठरवणार?’ असा रोखठोक सवाल विचारणा:या तरुण मुलीही आहेतच.
 
इट्सी बिट्सी यलो बिकिनी
पहिल्यांदाच बिकिनी घातलेल्या मुलीची मनोवस्था ब्रायन हेलॅण्ड्सच्या ‘इट्सी बिट्सी यलो पोलका डॉट बिकिनी’ या गाण्यात नेमकेपणाने वर्णन केली आहे. बिकिनी घातलीय तर खरी, पण कुणी पाहिलं तर? कुणी काही म्हटलं तर? पाण्यात कशी जाऊ? - असे असंख्य प्रश्न त्या मुलीच्या मनात आहेत. ब्लँकेट अंगावर लपेटून, सगळ्यांची नजर चुकवून ती पाण्यात कशी शिरते ह्याचं सुरेख वर्णन ह्या गाण्यात आलं आहे. पन्नासच्या दशकात चार्टबस्टर ठरलेलं गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.