शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

हावऱ्या मेंदूची करणी

By admin | Updated: March 24, 2016 21:06 IST

कधी उत्तान कपड्यातले फोटो, कधी सो कॉल्ड बौद्धिक चर्चांमधली भांडणं, कधी श्वास घेतला-सोडल्याचे अपडेट्स..

 - मुक्ता चैतन्य ( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)कधी उत्तान कपड्यातले फोटो, कधी सो कॉल्ड बौद्धिक चर्चांमधली भांडणं,कधी श्वास घेतला-सोडल्याचे अपडेट्स.. हे सारं फेसबुकवर रोज उठूनलोक कशासाठी करतात?तर लाइकसाठी?आणि हे जास्तीत जास्त लाइक्स कशासाठी?तर मेंदूसाठी !मेंदूतलं कौतुक मागणारंसेण्टरच हावरट व्हायला लागतं,त्याला काय करणार?तिच्यामुळे आपला स्वत:वरचा तोल अनेकदा सुटतोच !आपण फेसबुकवर म्हणजे कुणाचं तरी पेज बघायचं असतं, काहीतरी आवडीचं फॉलो करायचं असतं, चक्कर मारत लेटेस्ट काय हे पाहायचं असतं आणि आपलं काही मनातलं लिहायचंही असतं. थोडाच वेळ असतो हातात, पाच मिण्टात फेसबुकवर जाऊन येऊ म्हणत आपण लॉगइन करतो. पण अनेकदा एफबीवर गेलं की वेगवेगळ्या गोष्टीच दिसायला लागतात. स्वत:च्याच वॉलवर रेंगाळण्यात कितीतरी वेळ जातो. कुणी कुणी शेअर केलेले व्हिडीओ दिसतात. कुणी मित्रमैत्रिणीनं प्रोफाईल पिक बदललेलं असतं, कुणी कुठल्याशा ट्रिपचे फोटो टाकलेले असतात, कुणी कविता पोस्ट केलेली असते, कुणी दुसऱ्याची कविता स्वत:च्या नावावर टाकलेली असते, कुणाचे जबरदस्त फोटो, कुणाचा वाढदिवस, लग्नाचे फोटो असं किती आणि काय काय पुढ्यात येऊन पडलेलं असतं. मध्येच एखादी चर्चा चालू असते. त्यात कुणीतरी टॅग केलेलं असतं. मग ते सगळं बघणं आलं, लाइक, वॉव करणं आलं. हे सगळं करता करता आपण एफबीवर का आलो होतो तेच विसरायला होतं. त्यात आता फोनवर व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही ग्रुप असल्यानं एफबीसारखेच लाइकचे कौतुक सोहळे तिकडेही होत असतात. कामाचे मेसेज राहतात बाजूलाच, वायफळ थम्सअप आणि स्मायलींचा भडिमारच सुरू होतो. त्यात आपण व्हॉट्सअ‍ॅपवर का आलो होतो तेच विसरायला होतं...कितीही नाकारा, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत हे होतं. अर्थात आपण असं वागतो हा काही अपघात नाही किंवा आपल्यापैकी प्रत्येकाला एफबीचं व्यसन लागलंय असंही नाही. मग ही सगळी काय भानगड आहे? करायचं असतं एक आणि करत राहतो भलतंच काहीतरी, हे कशामुळे होतं?मागच्या भागात आपण बघितलं की समाजमाध्यमांवरचा वावर हे एक व्यसन आहे. अर्थात सगळ्यांच्या बाबतीत हे व्यसन गंभीर असेल असं नाही. पण तरीही चकवा लागल्यासारखे आपण सोशल नेटवर्किंग साइटवर भटकत का असतो? कारण याचा थेट संबंध मेंदूतल्या एका केंद्राशी आणि रसायनाशी आहे. आपल्या मेंदूमध्ये एक रिवार्ड सेंटर असतं, म्हणजे मोबदला किंवा बक्षीस देणारं केंद्र. त्याचं नाव न्यूक्लीयस अकम्बन्स. मेंदूच्या या केंद्रातून मोबदला देणाऱ्या भावना निर्माण होत असतात. म्हणजे आपण उत्तम पदार्थ खाल्ला, आवडीच्या वस्तूची खरेदी केली, अनपेक्षित धनलाभ झाला, पगार वाढला की आपल्याला जसं मस्त वाटतं ना, छान वाटतं, काहीतरी मिळवल्याचा आनंद होतो ते सगळं या केंद्रामुळे होतं. शास्त्रज्ञाच्या मते अन्न खाणं, सेक्स करणं, पैसा मिळणं आणि आपलं सामाजिक स्थान या सगळ्यातून मिळणारा आनंद या केंद्राशी निगडित असतो. आवडीचा पदार्थ एक वाटी खाल्ला तरी समाधान होत नाही, मग आपण अजून एक वाटी खातो कारण त्याशिवाय छान वाटत नाही. तसंच काहीसं एफबीवर लाइक मिळाल्यानंतर आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कौतुक झाल्यावर वाटतं. मग हे छान वाटणं सतत सुरू राहावं अशी या केंद्राची मागणी सुरू होते आणि आपणही ते सुख मिळवण्यासाठी धडपडायला लागतो.एकेका लाइकने वाढत जाणाऱ्या सुखाचा मोह पडतो आपल्याला. या लाइक्सच्या मोहजाळात आपण कधी ृअडकतो कळतच नाही. अजून सुख, अजून मोह, अजून आनंद अशा भ्रामक चक्रात आपण फिरत राहतो. यातलं काहीही चुकून घडत नाही. ही सगळी आपल्या मेंदूची करणी आहे.अनेकदा सोशल मीडिया हे लक्ष वेधून घेण्याचं, भावनिक आधार मिळवण्याचं, सामाजिक मान्यता मिळवण्याचं माध्यम म्हणूनही कळत नकळत वापरलं जातं. सॅड, डिप्रेस्ड या अर्थाचे इमोटिकॉन्स टाकून पोस्ट केलं की लगेच काय झालं? बरा आहेस ना? काही प्रॉब्लेम? असे मेसेज सुरू होतात. पाठोपाठ व्याकूळ शेरोशायरी, कविता, आणि काय काय. प्रत्यक्षात दरवेळी असे इमोटिकॉन्स टाकणारी व्यक्ती दु:खी, कष्टी असतेच असं नाही. पण चार लोकांचं लक्ष वेधून घेण्याच्या नादात, सोशल अटेन्शनच्या हव्यासापोटी हे सगळं घडत जातं. हे घडतं ते अनेकदा कळत. बऱ्याचदा नकळत.हा सगळा खेळ जोवर आटोक्यात असतो तोवर ठीक आहे; पण एकदा याची चटक लागली की मग चढाओढ सुरू होते. आधी कोण लाइक करणार? इतर मित्र- मैत्रिणींच्या आधी मेसेजला रिप्लाय कोण देणार? शेजारीच मित्र-मैत्रीण बसली असेल तरी तिचा बीप वाजायच्या आधी माझा वाजला पाहिजे याची विचित्र चढाओढ ! मग बोटही बरहुकूम चालतात. मेंदूत काही शिरण्याआधी प्रतिसाद देण्याची सवय होते आणि आपण खूश होतो. आपण एखादी पोस्ट टाकली आणि त्याला लगेच लाइक मिळाले की आपल्याला बरं वाटतं. आपला मेंदू खूश होतो. त्याची खूश होण्याची मागणी वाढायला लागते. पण त्याचवेळी एखाद्या पोस्टला अपेक्षित लाइक्स मिळाले नाहीत की मात्र आपण अस्वस्थ होतो. आपल्याला चुकल्या-चुकल्यासारखं वाटायला लागतं. लोकांना आपण आवडत नाही का, आपली पोस्ट आवडली नाही का? - असले प्रश्न मनाचा ताबा घेतात आणि मग सुरू होतो स्वप्रतिमेचा एक विचित्र खेळ. लोकांनी आपल्याला सतत चांगलं म्हणत राहावं यासाठी धडपड चालू होते. हे लोकांनी चांगलं म्हणणं बऱ्याचदा संबंधित असतं ते दिसण्याशी, कपड्यांशी, फोटोशी आणि शेअर होत जाणाऱ्या गोष्टींशी ! त्यातून मग आपण जे नाही किंवा जे असायला हवं असं वाटतं ते आॅनलाइन जगाला दाखवण्याचा सारा खेळ सुरू होतो. कधी उत्तान कपड्यातले फोटो, कधी सो कॉल्ड बौद्धिक चर्चांमधून आणि कधी स्वत:चे क्षणाक्षणाचे अपडेट्स टाकून इतरांचं लक्ष वेधून घेणं सुरू होतं.. आणि सुरूच राहतं !तुमच्या बाबतीतही असंच काही घडतंय का, चेक करा...लाइकचाविचका  "Like" is a way to give positive feedback or to connect with things you care about on Facebook. You can like content that your friends post to give them feedback or like a Page that you want to connect with on Facebook.- ही आहे फेसुबकनं स्वत:च सांगितलेली लाइकची व्याख्या. पण विचार करा, आपण खरंच किती वेळा आपल्याला एखादी गोष्ट फक्त आवडली म्हणून लाइक करतो? म्हणजे अनेकदा करतोही, नाही असं नाही !! पण बऱ्याचदा, समोरच्यानं आपल्याला लाइक केलेलं असतं, रिलेशन मेण्टेन करायची असतात, भविष्यात कॉण्टॅक्ट तयार होण्याच्या शक्यता असतात, व्यावसायिक गरज असते, व्यावसायिक कम्पल्शन असतं. त्यात नुस्तं लाइक करण्यात कुणाचंच काहीच नुकसान नसतं. म्हणून आपण लाइक करतो. त्यात लाइक करणं सोपं आहे, शब्दांशिवाय आहे आणि कुठंही बसल्या बसल्या हातातल्या स्मार्टफोनवरून करता येण्यासारखं आहे. म्हणूनच, कुठल्याही डीपी अपडेटला सगळ्यात जास्त लाइक्स मिळतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अनेकदा कुणी दुखावले जाऊ नये म्हणून ‘वा..वा.. छान..छान’ करणारे प्रत्यक्षात मागून एकमेकांबद्दल गॉसिप करताना आढळतात. त्यामुळे हे लाइक आपल्याला किती मिळाले यावर स्वत:ची किंमत करणारे आपल्या मनस्वास्थ्याचा विचका करून घेत असतील हे उघड आहे.