वयात येण्याच्या नाजूक वयात
‘त्यांना’ सगळं माहिती होतंय,
‘तसले’ व्हिडीओ, क्लिप्स त्यांनी
हातातल्या मोबाइलवर पाहिलेल्या आहेत,
आणि भयानक हे की,
त्यांना त्यातही आता काही ‘विशेष’ वाटत नाहीये.
असं का?
S आणि P
टीनएजर्सच्या
आयुष्यात सर्वाधिक क्रेझ असलेल्या गोष्टी कुठल्या,
याचा अभ्यास करणा:या गोष्टींचा सव्र्हे अलीकडेच प्रसिद्ध
करण्यात आला.
त्या सव्र्हेनुसार
S आणि P
या दोन अक्षरांची क्रेझ सर्वाधिक दिसते.
एस= सेल्फी.
एक सेल्फी पोस्ट करण्यापूर्वी 200 वेळा क्लिक करणारे अनेक टीनएजर्स आहेत.
आणि दुसरी म्हणजे
पी= पोर्नोग्राफी.
वय वर्षे 12 ते 13 या वयोगटातल्या दर दहा मुलांमध्ये एका मुलानं पोर्न साइट्स, फोटो, व्हिडीओ पाहिलेले असतात.
आणि
18 टक्के मुलं म्हणतात की,
त्यांनी पोर्न क्लिप्स आपल्या घरातच पाहिलेल्या आहेत.
‘नववीच्या सुट्टीतली गोष्ट. मित्रनं त्याच्या फोनमध्ये एक-दोन क्लिप्स दाखवल्या होत्या. ते बघून मी तर भांबावूनच गेलो होतो. नंतर तर त्या क्लिप्स बघण्याची चटकच लागली. शाळेतही चोरून बघायचो. रात्री घरी बघायचो. अभ्यासाच्या वेळेतही क्लिप्स बघण्याचा मोह आवरायचा नाही. त्याचा अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. अशा वेळी काय करावं काही सुचत नव्हतं. कुणाशी बोलताही येत नव्हतं.’
नववीतला निनाद हे सारं सांगतो. पण घरात आईवडिलांना आपला प्रॉब्लेम सांगायची इच्छा असूनही त्याला काही बोलता येत नाही.
निनादसारखी कोंडी होणारी अनेक मुलं असतात. वयात आलेल्या मुलां-मुलींमध्ये लैंगिक आकर्षण असतं, ‘त्या’ विषयाबद्दल प्रचंड कुतूहल असतंच. लोकांनी ते मान्य करो न करो, त्या वयात शरीराविषयीचं कुतूहल जागं झालेलं असतंच!
आठवी ओलांडलेल्या तेरा-चौदा वर्षाच्या मुला-मुलींच्या बाबतीत या ‘नाजूक’ विषयाच्या संदर्भात नेमकी काय भूमिका असली पाहिजे, कोणत्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, कोणत्या सांगू नयेत याबाबत अजूनही पालक आणि शिक्षक गोंधळलेलेच असतात.
पण मुलांना घरून किंवा शाळेतून कुणी काही सांगितलं नाही म्हणजे त्यांना काही समजणारच नाही अशातली काही परिस्थिती उरलेली नाही. चोरून पिवळी पुस्तक वाचण्याचा आणि चित्र बघण्याचा जमाना तर कधीच निघून गेला. हल्ली पाचवीतून सहावीत किंवा त्याही आधी मुलांना स्वत:चे स्वतंत्र कम्प्युटर्स मिळतात. शाळेत इयत्ता पहिलीपासून कम्प्युटर्स हा विषय असल्यामुळे कम्प्युटर हाताळायचा कसा याबाबत त्यांच्या मनात धास्ती, घोळ, भीती, संकोच यापैकी काहीही नाही. ते बिनधास्तपणो कम्प्युटरशी खेळत असतात. त्यातच साधारण सातवी-आठवीत मूल जाईतो त्याच्या हातात स्मार्टफोन येतो. टॅब येतो. व्हॉट्सअॅप, चॅट, फेसबुक हे सगळे तर टीनएजमध्येच दोस्तीचे होतात.
मग अशा मुलांच्या आयुष्यात पोर्नोग्राफी येणारच नाही, असा भाबडा विचार करण्यात काय हाशिल आहे?
वयात येताना पोर्नची ओळख होते तेव्हा.
1) आज टीनएजर्समध्ये पोर्नोग्राफी बघण्याचं प्रमाण पुष्कळच आहे. यातही एकमेकांशी लिंक्स शेअर करणं, किंवा इंटरेस्ट वाटलेल्या साइटविषयी माहिती पुरवणं, त्यातल्या एखाद्या हॉट आणि सेक्सी व्हिडीओबद्दल सविस्तर चर्चा करणं या गोष्टी सर्रास होतात. प्रत्यक्ष गर्लफ्रेण्ड/बॉयफ्रेण्ड बरोबर ‘ते’ सगळं करायला कुणी धजावत नसलं तरी टीनएजर्सच्या आयुष्यात पोर्नोग्राफी येतच नाही असं मुळीच नाहीये.
2) पॅरेण्टल कण्ट्रोल अर्थात पालकांच्या धाकानं मुलं तसलं काही पाहणारच नाही, हा समज जगभरातल्या अभ्यासकांनी खोटा ठरवला आहे. त्यांचं म्हणणं पालकांनी धाक दाखवण्यापेक्षा जरा मुलांकडे लक्ष ठेवावं. म्हणजे काय तर पालकांचा रोल नुसता पेरण्टल कण्ट्रोलच्या बटणापुरता मर्यादित नाही. आपली मुलं कम्प्युटरवर नेमकं काय करतात, काय बघतात, त्यांच्या आयुष्यात पोर्नोग्राफीने प्रवेश केला असेल तर त्याविषयी त्यांच्याशी उघडपणो बोलता यायला हवं. न रागवता त्यांना समजावता यायला हवं.
शरीर संबंधासंदर्भात मुला-मुलींच्या मनात भ्रामक आणि चुकीच्या कल्पना रु जू न देणं ही पालकांचीच मोठी जबाबदारी आहे.
3) आडनिडय़ा वयात लैंगिक भावना चाळवणा:या गोष्टी समोर घडतात. आपल्याला नेमकं काय वाटतंय हे नीटसं समजत नाही. जे काही अर्धवट समजलेलं असतं ते कुणाला सांगता येत नाही. धाडस करून सांगितलं तरी पालक, शिक्षक समजून घेतील याची खात्री वाटत नाही. त्यातून या मुलांचं गोंधळलेपण अधिक वाढत जातं. इतकंच नाही; पण पुढे जाऊन पोर्नोग्राफीमध्ये जे काही दाखवतात तेच लैंगिक जीवन असतं असं मानून स्वत:विषयी न्यूनगंड निर्माण होण्यापर्यंत मानसिक कोलाहाल या टीनएजर्स मुलांच्या मनात निर्माण होतो.
4) पोर्नोग्राफी हा सगळा पाश्चात्यांचा मूर्खपणा आहे, आपले संस्कारच असे की मुलं वाकडय़ा वाटेनं जाणारच नाहीत, आमच्या घरातली मुलं असलं काहीतरी बघण्याच्या भानगडीत पडूच शकत नाहीत. आमचे संस्कार त्यांना असं काही करू देत नाहीत असल्या भ्रामक कल्पनांना पालक आणि समाज अजूनही कवटाळून बसले तर नुकसान त्यांचं नाही मुलांचं होईल हे नक्की! हातात असलेलं तंत्रज्ञान या मुलांना निराळ्या दिशेने ओढत असताना. आणि त्याचा वेग आणि आवेग असा असतो की मुलं त्यात खेचली जातात.
5) मुलांचे सतत मोबाइल तपासत राहणा:या आया, कम्प्युटरवर काम करून झाल्यानंतर त्यांच्या कम्प्युटरची हिस्ट्री चेक करण:या बाबांना एकच सांगावंसं वाटतं, हे सगळं करण्यापेक्षा मुला-मुलींशी पोर्नोग्राफीबद्दल मोकळेपणानं बोला. हा काय प्रकार असतो, तो किती खोटा असतो, किती अभासी असतो, ख:या जगण्यात येणा:या संबंधांची सुंदरता, त्यातला तरलपणा, त्यातला सन्मान त्यांना समजला तर पोर्नोग्राफी साइटवरच्या अब्युङिाव्ह व्हिडीओचे ग्राहक ते बनणार नाहीत. लहान मुला-मुलींबरोबरचे लैंगिक संबंध, रेप, लैंगिक विकृती, लैंगिक प्रयोगाच्या नावाखाली दाखवले जाणारे विकृत चाळे या सगळ्याला खरं मानण्याचा मूर्खपणा ते करणार नाहीत. पण त्यासाठी संवाद आणि मुलांच्या प्रश्नांना खरी उत्तरं देण्याची तयारी हवी.
6) टीनएजर्सच्या आयुष्यात पोर्नोग्राफी नावाची एक भयानक गोष्ट शिरते आहे हे मान्य करून, त्या प्रश्नाशी दोन हात करण्याचं तंत्र शिकून घ्यावं लागणार आहे. ते केलं तर
उत्तराच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकेल!