शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लेट्स ट्राय

By admin | Updated: March 17, 2016 22:19 IST

ठरवून करिअर केलं, मी फार हुशार होते, जे ठरवलं तेच करिअर केलं असं काही नाही

ठरवून करिअर केलं,मी फार हुशार होते,जे ठरवलं तेच करिअर केलं असं काही नाही.वाटा बदलत गेल्या, संधी मिळत गेलीआणि प्रत्येक वेळेस एकच गोष्ट स्वत:लासांगितली.. जमेल, करून तर पाहा!असं म्हणत स्वत:च्या क्षमता पणाला लावल्यातर पृथ्वीवरच काय, पण अंतराळातही काम करणं जमतं!माझं करिअर निवडण्याचा आणि तिथपर्यंत पोहचण्याचा प्रवास सरळसोट नक्कीच नव्हता. म्हणजे मी माझं ध्येय निश्चित केलं आणि जे ठरवलं ते करत गेले, असं नाही झालं. अर्थात हे केवळ माझ्या बाबतीतच नाही, तर अनेकांच्या बाबतीत होत असतं. शाळेमधून बाहेर पडताना आपल्याला काय बनायचंय, याचं चित्र स्पष्ट नसतं. पालकांच्या-शिक्षकांच्या अपेक्षेचं दडपण त्यांच्यावर असतं. सुदैवाने मी अशा मुलांपैकी नव्हते. कारण आपल्याला काय बनायचंय हे ठामपणे ठरवलेलं नसलं, तरी मी एक चांगली विद्यार्थिनी होते आणि त्यामुळेच माझ्यासमोर करिअरचे अनेक पर्याय खुले होते. विद्यार्थिदशेत जर तुम्ही गुणवत्ता जोपासली, तर भविष्यातल्या शक्यतांचा विचार करता तुमच्यासमोर अनेक मार्ग मोकळे राहतात असं मला आज वाटतं. माझ्या बाबतीतही असंच झालं. जेव्हा मी ‘नेव्हल अकादमी’मध्ये प्रवेश घेतला तेव्हा ते माझं ध्येय होतं म्हणून काही मी तिथे प्रवेश घेतला नव्हता, तर माझ्या पालकांवर आर्थिक भार पडणार नाही असं शिक्षण मला घ्यायचं होतं. कारण मला माझ्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे मी माझ्यापरीनं त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. नेव्हल अकादमी ही माझी पहिली पसंती नसली, तरी तिथे गेल्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं. अनेक चांगल्या लोकांना मला भेटता आलं. तिथे असणाऱ्या मुलींसोबत माझे सूर छान जुळले. साहजिक होतं. विद्यार्थ्यांचं प्रमाण पाहिलं तर ९० टक्के मुलं होती आणि अवघ्या दहा टक्के मुली. साधारणपणे सारख्या समस्यांना तोंड देणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या चटकन जवळ येतात. कदाचित आमच्या बाबतीतही तेच झालं असेल. आज पंचवीस वर्षांनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावल्यानंतरही आम्हा मैत्रिणींची मैत्री कायम असण्याचं कारणही या बॉंडिंगमध्ये आहे. तो अभ्यासक्रम पूर्ण करून ग्रॅज्युएट झाल्यानंतरचा प्रवासही मी ठरवलेला नव्हता. मी जे केलं, त्यापेक्षा माझी स्वप्नं नेहमीच वेगळी होती. मला नेव्हीमध्ये डायव्हर व्हायचं होतं. कारण मी उत्तम स्वीमर होते. पण मी पायलट झाले. कारण डायव्हरचा जॉब गेलेला होता आणि माझ्यासमोर फक्त पायलट होण्याचाच पर्याय होता. मी ती माझ्यासाठी असलेली संधी मानली आणि प्रयत्न केला. प्रयत्न करण्याची मला कधीच भीती वाटली नाही. आपल्या कोशातून बाहेर पडून नवीन गोष्टी करायला मी कचरले नाही. मी आयुष्यात कधी विमान उडवण्याचा विचार केला नव्हता. मी हे काम किती उत्तम रीतीने करेन हेसुद्धा मला माहीत नव्हतं. पण मी म्हटलं, करून तर पाहूया! मी प्रयत्न केला, त्यातून शिकत गेले. काय चूक, काय बरोबर हे मला कळत गेलं. मी माझं काम उत्तम कसं होईल, एवढंच पाहत गेले. त्याचवेळी मला अजून एक संधी मिळाली- हेलिकॉप्टर उडवण्याची. हेही काम मी केलं नव्हतं. पण पुन्हा एकदा मी स्वत:लाच म्हटलं, लेट्स ट्राय! त्याच दरम्यान कधीतरी मला माध्यमांनी लढाईतल्या महिलांच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारला होता. कारण अमेरिकेमध्ये महिलांचा लष्करी मोहिमेमध्ये थेट सहभाग नसतो. त्यांचं काम हे सपोर्ट सिस्टिमचं असतं. त्यावेळी मला जाणवलं, की ५०-६० जणांच्या स्क्वाड्रनमध्ये आम्ही अवघ्या ४-५ मुलीच असायचो. आपसूकच मुलांचा गट तयार व्हायचा, त्यांचं बॉंडिंग मस्त असायचं. आम्ही मुली मात्र त्या ‘कूल गँग’चा भाग नसायचो. एखाद्या क्षेत्रात जेव्हा महिला कमी असतात, तेव्हा बऱ्याचदा असं होत असावं. अशावेळी असं क्षेत्र निवडणाऱ्या महिलांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की तुम्ही जे काम करत आहात, ते करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे सक्षम असलं पाहिजे. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला बारीक-सारीक गोष्टीही माहीत असल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. कामात कोणतीही तडजोड करता कामा नये. या गोष्टींचं भान बाळगलं की तुम्ही ज्या कोणत्याही ठिकाणी, क्षेत्रात काम करत असाल तिथे तुम्हाला लोकांकडून मिळणारा आदर वाढेल, तुम्हाला चांगल्या संधी मिळत जातील. मलाही माझ्या स्क्वाड्रनमध्ये चांगल्या संधी मिळाल्या याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजते. फ्लोरिडाला जेव्हा चक्र ीवादळाचा तडाखा बसला होता, तेव्हा मला दोन हेलिकॉप्टर्समधून ३० जणांची टीम घेऊन या आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत पोहचवण्याची संधी मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी होता. मी अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करू शकते, हा माझा आत्मविश्वास त्यामुळे वाढायला मदत झाली. शिवाय गटाबरोबर काम करण्यातली गंमतही मला समजली. मी नेहमी सगळ्यांना सांगते, की एखादं काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकमेकांसोबत काम करणारा ‘गट’ आहात, केवळ सोपवलेली जबाबदारी पार पाडणारी ‘मशीन’ नाही, ही जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण करा. आपल्या गटातील लोकांच्या कामाबद्दल भावना काय आहेत, ते ठरवून दिलेलं काम कसं पार पाडताहेत, त्या कामामध्ये किती प्रगती होतीये ही खूप सुखावणारी भावना आहे. त्यातून एक ताकद मिळते आणि मला ती नेहमी जाणवते. अंतराळवीर म्हणून काम करतानाही मला ती जाणवायची. माझ्या करिअरचा पुढचा टप्पा हा अ‍ॅस्ट्रॉनॉट आॅफिसरचा होता. इथे आल्यावर मला खरं तर खूप बरं वाटलं. कारण मी यापूर्वी जिथे कामं केली होती, त्या तुलनेत इथे बायकांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्यांची मतं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करायचे. अ‍ॅस्ट्रॉनॉट आॅफिसमध्ये डेप्युटी चीफ म्हणून काम करत असताना मी आॅफिसमध्ये फिरून लोकांशी बोलून त्यांचा विचार घ्यायचे. आपल्याला कुठे संधी आहेत, आपण कुठे कमी पडतो, मॅनेजमेंटकडून काही कमी पडतंय का हे विचारायचे. लोकांच्या गटामधून ‘टीम’ कशी तयार होईल, हे आजमावून पाहायचे. मला वाटतं बायकांमध्ये हा गुण उपजतच असतो. सर्वांना सांभाळून घेण्याचा, सर्वांची काळजी घेण्याचा ‘आईपणा’ बायकांमध्ये उपजतच असतो. हा अनुभव मला कोणत्याही अंतराळ मोहिमेपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटला. माझ्या एकूणच प्रवासाकडे पाहताना मला असं जाणवतं की मला खरंच एक उत्तम करिअर मिळालं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी असण्यामुळे मला माझ्या करिअरमधल्या संधी मिळत गेल्या. हे सगळं काही अर्थातच मी ठरवल्याप्रमाणे झालं नाहीच. पण त्यातून मी घडत गेले हे नक्की. अशाच संधींची वाट मी यापुढेही पाहत राहीन. १) व्हाय नॉट हा प्रश्न स्वत:ला नेहमी विचारा. आणि तुम्हाला मनापासून जे करावं वाटतं, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा. मात्र त्यासाठी तुमच्याकडे दृढनिश्चय असला पाहिजे. इतरांनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं किंवा अपयश आलं तरी ते सहन करता आलं पाहिजे. मी स्वत: अत्यंत हुशार विद्यार्थिनी होते, अशातला भाग नाही. मी कॉलेजमध्ये दोन कोर्सेसमध्ये नापासही झाले होते. मात्र अपयश आल्यावर आपलं नेमकं काय चुकलं यावर विचार करून सुधारणा करण्याची तयारी असली पाहिजे. ही एक गोष्ट असेल तर तुम्ही जे हवं ते मिळवण्यासाठी मार्ग नक्कीच काढू शकता. २. अंतराळात असताना तुम्ही नेहमीच तरंगत असता. हे फार मजेशीर असतं. पण त्याचे काही साइड-इफेक्टही असतात. स्पेस स्टेशनमध्ये नेहमी तरंगत असताना, एकदा माझ्यावर चालण्याची वेळ आली. तेव्हा मला थांबून विचार करावा लागला होता. माझ्या मेंदूपर्यंत योग्य तो सिग्नल पोहचत नाहीये, असं वाटत होतं. रोज सहजपणे चालणारी मी आता आपल्याला काळजीपूर्वक पाऊल ठेवायचंय, असं स्वत:ला बजावत होते. सुनीता विल्यम्स. सर्वाधिक ‘स्पेस वॉक’चा विक्र म त्यांच्या नावावर आहे. तीन अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन अंतराळात राहण्याचा विक्रमी अनुभव त्यांनी कमावला आहे. या विक्रमापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास, करिअरमधील विविध टप्पे, एक स्त्री म्हणून आपल्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सारं त्यांनी नुकतंच मोकळेपणानं शेअर केलं.  Women's Empowerment through STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) नावाचा एक कार्यक्रम ‘फिक्की’ने दिल्लीत नुकताच आयोजित केला होता, त्याप्रसंगी केलेल्या भाषणातला हा संपादित भाग...शब्दांकन- अमृता कदम