शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

किमो

By admin | Updated: March 17, 2016 22:21 IST

सकाळी ८-९ वाजता किमोथेरपीसाठी पेशंट्सना दाखल करून घेण्याचा वॉर्ड उघडला जायचा. या वॉर्डचं दार उघडण्याआधीच

 शची मराठे(कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)सकाळी ८-९ वाजता किमोथेरपीसाठी पेशंट्सना दाखल करून घेण्याचा वॉर्ड उघडला जायचा. या वॉर्डचं दार उघडण्याआधीच पेशंट आणि नातेवाईक वॉर्डबाहेर रांगा लावून उभे राहत. काही वेळा रांगेत उभं राहण्याची जबाबदारीपिशव्या, पाणी, चहाचे थर्मासही उचलत. या सगळ्या वस्तू रांगेत ठेवूनलोक आजूबाजूला बसून घ्यायचे. पेशंट्स भरपूर आणि वॉर्डमधील खाटा लिमिटेड.त्यामुळे मग वॉर्डचं दार उघडलं की,चांगला बेड पकडण्यासाठी सुसाट पळत सुटायचंनी आपली जागा धरायची!कॅन्सर आहे हे कळलं, मग पुढचा टप्पा किमोथेरपीचा. माझी पहिली किमोथेरपी माझ्या चांगलीच लक्षात आहे. सकाळी लवकर उठून आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. काही तास चालणाऱ्या या किमोथेरपीची तयारी एखाद्या प्रवासाच्या तयारीहून कमी नव्हती. अर्थात सुसह्य किमोसाठीची आवश्यक ती स्किल्स मी काही दिवसांतच आत्मसात केली. बाबांच्या गाठीशी आईच्या किमोचा अनुभव होताच. त्याचीही मदत झाली.सकाळी ८-९ वाजता किमोथेरपीसाठी पेशंट्सना दाखल करून घेण्याचा वॉर्ड उघडला जायचा. या वॉर्डचं दार उघडण्याआधीच पेशंट आणि नातेवाईक वॉर्डबाहेर रांगा लावून उभे राहत. काही वेळा रांगेत उभं राहण्याची जबाबदारी पिशव्या, पाणी, चहाचे थर्मासही उचलत. या सगळ्या वस्तू रांगेत ठेवून लोक आजूबाजूला बसून घ्यायचे. पेशंट्स भरपूर आणि वॉर्डमधील खाटा लिमिटेड. जर सकाळच्या पहिल्या सेशनला तुमचा नंबर लागला नाही तर आधीच्या पेशंटची किमो संपवून खाट रिकामी होईपर्यंत वाट पाहणं भाग असायचं. त्यानंतर मग आपला नंबर. हॉस्पिटलच्या बेसमेंटमधल्या औषधांच्या दुकानातून बाबा औषधं आणायचे आणि मी किमो वॉर्डच्या बाहेर रांगेत उभी राहायचे. दरवाजा उघडताच लोकं धावत जाऊन बेड पकडायचे. मीही धावायचे. हळूहळू मीही जास्त चांगला, डोक्यावर पंखा असलेला, खिडकीजवळचा, टॉयलेट जवळ असलेला बेड पकडण्यात माहीर झाले. कारण सतत सलाइन दिल्यानं शू लागायची. त्यामुळे एका हातात सलाइनची बाटली सांभाळत टॉयलेटमध्ये जावं लागायचं. माझी किमो ४-५ तासात संपायची. पण काही पेशंट्सची किमो संपूर्ण दिवस, दोन दिवस, तीन दिवसही चालायची.आमचा हा किमो वॉर्ड म्हणजे एक एसटी होती. एका जागी स्थिर असलेली एसटी. पण एसटीतले सगळे प्रवासी पेशंट्स सुसाट. सकाळी आम्ही बेड पकडण्यासाठी धावाधाव करायचो. एकदा सगळे स्थानापन्न झाले की मग चहावाले, पेपरवाले यायचे. सलाइनची एक बाटली संपली की नवी बाटली लावण्यासाठी नर्स यायची. एकदम चहलपहल असायची. या ४-५ तासात मी खूप गोष्टी शिकले. टाइम मॅनेजमेण्ट, चित्त एकाग्र कसं करायचं, त्रास होणाऱ्या विचारांपासून मन कस डायव्हर्ट करायचं या सगळ्याचं छान प्रशिक्षण मिळालं. मी प्रत्येक किमोच्या वेळी एकच प्रार्थना करायचे की, या नर्सला माझी नस मिळू दे. तीही एकाच अटेम्प्टमध्ये! किमो सुरू असताना मनात भयानक विचार यायचे. पहिल्या किमोच्या वेळी तर मी आता आपले केस जाणार या विचाराने इतकी धास्तावले होते की इथे एकीकडे सलाइन सुरू होणार आणि दुसरीकडे माझे केस गळायला सुरुवात होणार असंच मला वाटलं होतं. किमो घेऊन घरी गेल्यावर वाटायचं आजचा दिवस शेवटचा. उद्या सकाळी उठू तेव्हा आपण गंजाक्वीन. पण तसं काही झालं नाही. या सगळ्या वाइल्ड इमॅजीनेशनमधून वाचण्यासाठी मी किमोच्या आदल्या दिवशी रात्री ३-४ वाजेपर्यंत जागायचे. टीव्ही पाहायचे नाहीतर पुस्तक वाचायचे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किमोची सलाइन सुरू झाली की मी झोपून जायचे. डोक्यात विचार नको आणि त्यामुळे येणारं डिप्रेशनही नको. फक्त सलाइन संपत आलं की नर्सला बोलावून आणावं लागायचं. प्रत्येक वेळी टाटाला जाताना मी आणि बाबा हे कॉमन फॅक्टर. मग कधी काका, कधी काकू, कधी आणखी कोणी, असं पॅकेज बदलायचं आणि आम्ही टाटाला जायचो.पहिल्या किमोनंतर घरी आले. आईची हालत मी पाहिली होती. त्यामुळे प्रचंड भीती वाटत होती. काय साइड इफेक्ट्स होतील याची मनात धाकधूक होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काहीच घडलं नाही. मग अचानक पोटात ढवळून आलं. सकाळचं सॅण्डविच, दुपारचं जेवण सगळं उलटून पडलं. डोकं भणभणून गेलं. मला वाटलं, झालं सगळं. पण दर अर्ध्या पाऊण तासानं एक या वेगानं उलट्या होत राहिल्या. इलेक्ट्रॉलचं पाणीही पोटात ठरत नव्हतं. नंतर मग कोरड्या उलट्या. त्यानंतर नुसतेच उमासे. तोंडातून बाहेर काहीच नाही. नंतर नंतर तर मी मोजणंचं सोडून दिलं. एक उलटी झाली की लगेच पोटात नवी उलटी तयार व्हायला सुरुवात व्हायची. पोटात एकदम आत कुठेतरी काहीतरी हलल्यासारखं व्हायचं. हळूहळू ते वाढत एक विचित्र जाणीव पोटातून वर चढायला लागायची. पोटातून छातीत मग घसा आणि मग नाकातोंडातून बाहेर. उलटीचा हा सगळा प्रवास मी खूप लक्षपूर्वक पाहत होते. उलटीचं बीज ते प्रत्यक्ष उलटी ह्या दरम्यान लागणारा वेळ हळूहळू वाढत गेला तसा उलटीतला जोर कमी होत गेला आणि रात्री उशिरा कधीतरी हे उलटी सत्र थांबलं. उलट्या थांबल्या असल्या तरी आणखी एका मोठ्या संकटाची सुरुवात होण्याची मी वाट पाहत होते. रोज आरशात बघताना आरशातल्या प्रतिबिंबात मला फक्त डोक्यावरचे केसचं दिसायचे.काउंटडाउन कधीही सुरू होऊ शकत होतं...