- अंकिता पुंडलिक भोईर
(परिचारिका, सायन हॉस्पिटल)
नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागलेत, सगळीकडे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसीचा गाजावाजा. पैसेवाल्यांसाठीच्या या सा-या वाटा?
मग गरिबानं काय करावं? आईबापाला वाटतं, पोरीनं नाही डॉक्टर तर नर्स तरी व्हावं. पण नर्स झाल्यावर मात्र आपला समाज आदरानं पाहत नाही, असं का?
नर्सिग क्षेत्रविषयी भलतेच गैरसमज . यामुळेच क्षमता, चिकाटी, जिद्द असूनसुद्धा त्या क्षेत्रकडे जाण्याचं मुली टाळतात. असं चित्र का दिसतंय सध्या? डॉक्टर नंतर पेशंटच्या जवळचं कोणी असेल तर ते नर्सच, पेशंटला डॉक्टरांपेक्षा धीर देणारी व्यक्ती म्हणजे नर्सच, दवाखान्यात घरच्या माणसापेक्षा पेशंटची जास्त काळजी घेणारी व्यक्ती म्हणजेच नर्स. उत्तम डॉक्टर होण्याइतकंच उत्तम नर्स होणं कठीण आहे. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, नर्सच्या पेशात मनाचा/ सेवेचा भाग मोठा आहे. पण समाजाला कधी कळणार या गोष्टी? कधी कळणार त्यांची पण अत्यंत धकाधकीची जीवनपद्धती?
का आजही नर्सिग म्हणजे दुय्यम काम असं पाहिलं जातं? अत्यंत सेवाभावी काम करणा:या नर्सेसना आपला समाज आदर देईल, त्या कामाला प्रतिष्ठा देईल, तो खरा सुदीन.