शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जस्ट अ मैत्रीण

By admin | Updated: September 10, 2015 21:54 IST

गर्लफ्रेण्ड वेगळी आणि मैत्रीण वेगळी, मित्र वेगळा आणि बॉयफ्रेण्ड वेगळा हे मान्य करण्याइतपत मोकळेपणा तरुण-तरुणींमधे आलाय! पण ‘नुस्ती मैत्रीण’ हे नातं जपणं मुलांसाठी सुळावरची पोळी ठरतंय. असं का?

 - मुक्ता चैतन्य

‘गर्लफ्रेण्डला सांभाळणं सोपं, पण मैत्रीण? तिचं काही कळतच नाही. गर्लफ्रेण्डचं कसं असतं, चिडली-रागावली तर ‘आय लव्ह यू डिअर’ म्हटलं की तिचा राग कमी होतो. मैत्रिणीला तसं काही म्हणण्याचीही सोय नाही. तिचं डोकं फिरलं की आपली तंतरलीच.’
- रोहित हसत पण वैतागून सांगत होता.
त्याचं बोलणं ऐकतानाही गंमत वाटते. 
मागच्या पिढीत गर्लफ्रेण्ड आणि मैत्रीण या दोन वेगळ्या गोष्टी असतात हेच कुणाला मान्य नव्हतं. प्रेयसी आहे तर मैत्रीण कशाला? आणि जी मैत्रीण आहे तिच्याशीच तसलं काहीतरी असणार हे गृहीतच धरलं जायचं.  
पण आता तसं नाही. 
गर्लफ्रेण्ड वेगळी आणि मैत्रीण वेगळी हे बहुतेक सगळ्यांनाच माहिती असतं, मान्यही असतं. तरुणींनाही ते आता पुष्कळदा मान्य असतं. मैत्रीण म्हणजे कुठलीही शारीरिक ओढ नसलेली एक दोस्ती. मुलामुलांची, मुलीमुलींची असते तशी!
‘त्याची’ मैत्रीण आहे म्हणून कपल्समधे हल्ली भांडणं होताना कमी दिसतात. गर्लफ्रेण्ड्सची जमात याबाबतीत ब:यापैकी असुरक्षिततेच्या चौकटीतून बाहेर पडली आहे. त्यातही आपला बॉयफ्रेण्ड मैत्रिणीच्या फार आहारी जातोय किंवा त्यांनी मैत्रीची रेषा पार केलीये असं तिला जाणवलं तर त्याबद्दल उघड जाब विचारायला किंवा थेट ब्रेकअप करायला त्या मग मागेपुढे पाहत नाहीत.
मुलींनी स्वत:साठी हा विषय असा मान्य करून घेतला असला तरी खरी गोची झालीये ती मात्र तरुणांची. 
रोहितसारख्याच अनेकांच्या रिअॅक्शन्स हल्ली ऐकू येतात. मैत्रिणींना सांभाळणं ही त्यांच्यासाठी डोकेदुखी नाही पण फारच कौशल्याचं होऊन बसलं आहे. रोहितशी बोलताना सहज विचारलं, इतके मित्र असताना, गर्लफ्रेण्ड असताना जवळची मैत्रीण लागते कशाला? तिला सांभाळावं लागेल इतकी ती महत्त्वाची असते का?
तर तो चटकन म्हणाला, ‘मैत्रीण हवीच. मैत्रिणीला पर्यायच नाही. ते नातं खूप वेगळं असतं. त्यात काळजी असते पण पङोसिव्हनेस नसतो. एकमेकांचं हित शोधणं असतं, पण नॅ¨गग नसतं. दोस्तीच ती.’
पण मग गोची नेमकी होते काय? 
मैत्रिणी!
तो सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. पण अवघड आणि किचकट. 
त्या कधी स्त्रीदाक्षिण्याच्या मोडवर जातील, कधी चिडतील, कधी स्पेस मिळत नाही म्हणून वैतागतील, कधी स्पेस का देतोस म्हणून भांडतील, कधी कचकचून मिठी मारतील, कधी खांद्यावर हात ठेवून का उभा आहेस म्हणून धारेवर धरतील.
कधी काय करतील याचा तरुणांना अंदाजच येत नाही. आपण वागायला जायचो एक आणि अर्थ निघायचा भलताच, अशी अदृष्य टांगती तलवार सतत त्यांच्या मानेवर असते. कसं वागायचं हे न कळल्यामुळे रोहितसारखे अनेक जण कन्फ्यूज्ड आहेत. 
 
मग तरुणांनी करायचं काय?
मुलींच्या मनात कधी, काय चालू असेल कुणीच सांगू शकत नाही. अगदी त्यासुद्धा नाही. मग मित्रंना तर ते समजणं फारच अवघड गोष्ट आहे. मुळात बायकांचं जग आणि पुरुषांचं जग यात बरच अंतर असतं.  त्या जगाचे नियमही वेगवेगळे आहेत. त्या जगामधे घडणा:या घडामोडी वेगवेगळ्या असल्या, तरी वागताना प्रत्येक जण आपल्या अनुभवविश्वातल्या शिदोरीवरच अवलंबून असतो आणि मग घोळ होतो. म्हणजे अनेकदा मैत्रिणी बिनधास्त वाटेल त्या विषयावर बोलत असतात, कधीमधी सिगारेटचा एखादा कश मारतात. मित्रंबरोबर बसून काहीजणी दारूही पितात. मग मित्रंना वाटतं, की हिला सगळं चालतं. अशावेळी मग तो जरा पुढे सरकला किंवा तिच्या अपेक्षेबाहेरचं वागला तर तिचं डोकं फिरतं. आणि मग मित्रंना कळत नाही आता करायचं काय?
त्यातही बहुतेकदा स्त्री-पुरुषांच्या मैत्रीचे नियम त्यातली मैत्रीण ठरवत असते. ते नियम ती मैत्रीण तिच्या इच्छेप्रमाणो वाटेल तशी बदलते. बरं, नियम बदलतायेत याची पुसटशी कल्पनाही ती मित्रंना देत नाही. मित्रला मात्र या सतत बदलणा:या नियमांना समजूत घेत, तारेवरची कसरत करत मैत्री सांभाळावी लागते. पुन्हा मैत्री सांभाळण्याची सगळी नैतिक, भावनिक आणि बौद्धिक जबाबदारी तरुणांवरच असते. यातून घोळ वाढत जातो. 
आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर आम्ही अनुभवतोच. पण यातून सुटकेचा मार्ग काय?
तर रोहित म्हणतो तसा, काहीच नाही. घट्ट मैत्री हवी असेल तर सुटकेचा मार्ग बंद करूनच त्या नात्यात शिरावं लागतं. खरंतर मैत्रिणीला सांभाळणं याचा काही फॉम्यरुला नाहीये आणि तसंही ती अत्यंत व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. 
पण तरीही ढोबळमानाने विचार केला तर मैत्रिणींची खटकी उडते कुठे, तर अनएक्सपेक्टेड वैयक्तिक प्रश्न आले किंवा तिला आवडणा:या तरुणाबद्दल फालतू कमेंट्स झाल्या किंवा तिला अपेक्षित असलेल्या तिच्या सामाजिक स्टेटसला धक्का पोचेल असं वर्तन किंवा वर्तनाची शक्यता निर्माण झाली की तिची खटकी पडते. ती रिअॅक्ट होते. 
आता हे ओळखायचं कसं?
तर ही गोष्ट ब्रrादेवालाही शक्य नाही. नात्यातले अपडाऊन्स सोसत, तिला जाणून घेतच हे ज्याला त्याला ओळखावं लागतं. त्यात कुणीही कसल्याही टिप्स देणं भयंकर धोकादायकअसू शकतं. कारण मैत्रीण नेमकी उलट वागली तर?
टिप्स घेऊन वागणा:या मित्रचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजायला हरकत नाही.
मैत्रिणीच्या स्वभावाचा, तिच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीचा, अप¨ब्रगिंगचा, तिच्या आवडीनिवडीचा, इगो इश्यूचा विचार करत स्ट्रॅटेजी ठरवली आणि त्यात बदल करण्याची लवचिकता ठेवली तर या नात्याइतकं सुंदर आणि परिपूर्ण नातं नाही. 
 
बिंधास्त असल्या तरी भीती वाटतेच!
आताचा काळ मोठा विचित्र आहे. एकीकडे नात्यांमध्ये कमालीचा मोकळेपणा येतो, तर दुसरीकडे असुरक्षिततेची भावनाही मोठय़ा प्रमाणावर रुजते आहे. स्त्रियांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो, तर दुसरीकडे जग त्यांच्यासाठी अनपेक्षितपणो संकुचित होत चाललंय. या सगळ्या गोष्टी एकदम घडताहेत. बलात्कार, ¨हसा यांसारख्या घटनांचे तपशील मीडियातून अंगावर आदळत आहेत. त्यामुळेही तरुणी वरवर कितीही बिनधास्त वाटत असल्या तरी आतून काहीसं भांबावलेपण आहे. संशयाचा किडा सतत डोक्यात वळवळत असतो. त्यातूनच सतत मैत्रीतले नियम आणि स्वत:च्या अपेक्षांच्या चौकटी बदलण्याकडे त्या जातात. एखादा माणूस आपल्याला गृहीत धरतोय असं त्यांना वाटायला लागलं की त्या त्यांचं वागणं बदलतात, ते याच असुरक्षिततेमधून.
 
muktachaitanya11@gmail.com