शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

ऑफिसातल्या सहकार्‍यांशी मैत्री?

By admin | Updated: March 20, 2015 15:26 IST

ऑफिसातल्या सहकार्‍यांशी मैत्री करणं हेसुद्धा एक स्किल आहे!

माणूस नावाच्या सामाजिक प्राण्याला मित्न बनवायला वेळ नाही लागत! आता तर काय प्रत्यक्ष भेट झालेली असो नसो, आपण फेसबुक आणि व्हॉट्सअँप फ्रेण्ड्स तरी सहज बनतो. गप्पा मारतो.

त्यामुळे आपण कितीही प्रोफेशनल रहायचं ठरवलं आणि कामापुरतं नातं असं मनाशी घोकलं तरी ते काही खरं नसतं. कामाच्या ठिकाणी तर आपण दिवसातला सर्वाधिक वेळ घालवतो. आपल्या सगळ्या महत्त्वाकांक्षा त्या जागेशी कुठं ना कुठं जोडतच असतो.
मात्र रोजच्या कामाचा व्याप सांभाळणं, सतत एकसारख्या वातावरणात वावरणं, एकसारख्या अनुभवांमधून सहकर्मचार्‍यांबरोबर एक प्रकारचं सहज नातं जुळून येतं. गप्पा-विनोद, शेअरिंग सारं सुरू होतं. अनेकदा आपली चांगली मैत्रीही होते.  
पण व्यक्तिगत आयुष्यात आपण मैत्रीकडून ज्या अपेक्षा ठेवतो, त्याच अपेक्षांचा डोंगर जर व्यावसायिक मैत्रीत ठेवला तर घोळ, मनस्ताप अटळ आहे.
आणि मग आपण म्हणतो की, मी तर सगळ्यांशी इतका फ्रेण्डली वागतो, तरी मलाच का त्रास होतो?
त्याचीच उत्तरं शोधण्याची ही काही सूत्रं.
 
१) कामाच्या ठिकाणी दोस्ती झाली, मस्त मैत्री झाली तर त्या युनिक वातावरणाला समजून घेणारा सवंगडी तुम्हाला लाभतो. रोजची कामाची आव्हानं, ऑफिसचा मूड, वरिष्ठांच्या अपेक्षा या सगळ्या न सांगता ओळखणारा एक माणूस तुमच्या दैनंदिन जीवनाशी एकरूप झालेला असतो. पण कितीही मैत्री असली तरी हे विसरू नका की आपण सहकारी आहोत, प्रोफेशनल सहकारी, प्रसंगी स्पर्धकही आहोत. त्यामुळे मैत्रीत जी स्पर्धा नसते ती या प्रोफेशनल मैत्रीत असणारच! हे लक्षात ठेवून वागा. आपण किती आणि काय शेअर करतो आहोत, याचा विचार करा.
२) मैत्री आहे म्हणून त्या नात्याचा आपल्या कामावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका. मैत्नी आपल्या ठिकाणी आणि काम आपल्या ठिकाणी. एकमेकांना सहकार्य करा, पण एकमेकांच्या चुकांना उत्तेजन देऊ नका. हे असं र्मयादित कक्षेतलं नातं सांभाळणं कठीण नक्की असतं, पण अशक्य नाही. 
३) कामापुरती, कॅलक्युलेटिव्ह मैत्नी करू नका. छान सच्ची मैत्री असेल तर त्यात राजकारण येऊ देऊ नका. ऑफिसचं राजकारण मैत्नीमध्ये येता कामा नये. कधी कधी ओघात वाहून जात अनेकजण नकळत मित्नांबरोबर राजकारण करतात. मग पस्तावतात. एकदा विश्‍वास गमावला की तो कमावणं फार अवघड. 
४) अर्थात तरीही वास्तववादी दृष्टिकोन ठेवा. काम म्हटलं की प्रमोशन, प्रोजेक्ट, बॉसची नाराजी हे सर्व आलंच. तुम्हाला आणि तुमच्या मित्नाला नेहमी सारखीच संधी मिळेल असं नाही. कधी तो तुमच्या पुढेही जाऊ शकतो, कधी तुम्ही. हे स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद तुमच्यात आहे का? कामापलीकडे मैत्री हे जपता येतं का ते पहा, तरच मैत्री करा. 
५) मुख्य म्हणजे पर्सनल रु सवे-फुगवे, भांडणं, नाराजी या सर्व गोष्टी कामानंतर करा. कामाचा वेळ वैयक्तिक वाटाघाटींमध्ये दवडू नका. मी इतकी सच्ची मैत्री केली, पण तरी तो माझ्याशी पॉलिटिक्सच करतो असं तुमचं मत असेल, तर वेळीच त्या नात्यापासून दूर जा.
६) मुख्य म्हणजे या नात्याविषयी पझेसिव्ह होऊ नका. आपल्या व्यावसायिक जगापलीकडे मित्राला जग आहे हे कायम लक्षात ठेवा.
७) सगळ्यात महत्त्वाचं ही सारी कसरत करणं तुम्हाला जमणार नसेल तर प्रोफेशनल कामापुरतं सौजन्याचं नातं ठेवा. गळ्यात गळे मैत्री नसली तरी चालेल, मैत्रीपूर्ण नातं असलं म्हणजे झालं!
८) तुम्हाला जर तुमच्या सहकार्‍यांच्या रूपात मित्र मिळाले तर तुम्ही खरंच भाग्यवान. फक्त त्या मैत्रीची लक्ष्मणरेषा वेळीच ओळखा! 
 
- समिंदरा हर्र्डीकर-सावंत 
 
 
ऑफिसातला जोकर
 
तसे आपण फारच फ्री अँण्ड फ्रॅँक असतो!
तोच अँटिट्यूड घेऊन आपण ऑफिसला जातो. सगळे सहकारीही आपल्यासारखेच यंग, उत्साही, अँटिट्यूडवाले!
म्हणून मग आपण काहीही बोलतो, एकदम कॉलेजच्या कट्टय़ावर असल्यासारखं!
अनेक मुली म्हणतात, ‘कसला नालायक आहेस तू?’
किंवा, ‘कित्ती स्वीट आहेस तू?’
किंवा ‘कित्ती हलकट आहात तुम्ही!’
आता कुणालाही वाटेल की, यात काय वाईट आहे? जनरली बोलतातच सगळे असं!
पण ऑफिसमधे हे सारं बोलून आपण टिंगलीचा विषय होतो हे अनेकींच्या लक्षातही येत नाही.
अनेकदा पुरुष सहकारी या सगळ्याविषयी गॉसिप करतात, नक्कल करतात आणि मग कधीतरी ते कानावर आलं की मनस्ताप होतो!
त्यामुळेच ऑफिसात आपण काय बोलतो याकडे जरा लक्ष द्यायलाच हवं!
ते दिलं नाही की, ऑफिसातला जोकर म्हणून आपली टिंगल होणारच!
खरं तर हा जो साध्या कॉमनसेन्सचा भाग आहे, त्यासाठी हल्ली कार्पोरेट कम्युनिकेशनमधे काही हजार रुपये खर्च होतात. कारण अनेकदा चांगलं काम करणार्‍यांना चांगलं बोलण्याची तमीजच नसते!
- मृण्मयी सावंत