हातात मावेल इतक्या लहान उपकरणानं जमिनीवरच नाही तर थेट अवकाशात डीएनए चाचणी करता येऊ शकेल अशा उपकरणाच्या संशोधनावर काम करणारी अमेरिकास्थित मराठी संशोधक मुग्धा नरसिंहन. तिच्याशी या विशेष गप्पा.
1. डीएनए तंत्नज्ञानातून निर्माण झालेली उपकरणं, हा वेगळाच विषय, या विषयाकडे तू कशी वळलीस?
मुग्धा : खरं तर माझी पाश्र्वभूमी ही योगशिक्षक घराण्याची. योग गुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर हे माङो आजोबा. अध्ययनाची परंपरा होतीच. त्यामुळे मानवी जीवनात उपकारक ठरणा:या संशोधनाची, नवनव्या उपकरणांची आवड माङयाकडेही आली. मी मुंबईत शिकले. ङोवियर्सला. तिथून मी हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. बिझनेस मॅनेजमेंट शिकताना केवळ व्यापारवृद्धी हाच हेतू न ठेवता मानवी जीवनात उपकारक ठरणारं संशोधन लोकांपुढे आणावं असं मनात होतं, म्हणून मी हा विषय निवडला.
2. सध्या तुझ्या कामाचं स्वरूप काय?
मुग्धा : मी अमेरिकेत मिनी पीसीआर या संस्थेत चीफ एक्सपिरिअन्स ऑफिसर म्हणून डीएनए संशोधनाशी निगडित उपकरणांच्या निर्मिती, संशोधन, प्रसाराचं काम करते. त्यापूर्वी मी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये प्रकल्पप्रमुख म्हणून, हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये वरिष्ठ धोरण सहयोगी म्हणून काम केलंय. नवीन संकल्पनांची निर्मिती व संपर्क धोरणाला गती देत लोकांना प्रोत्साहित करण्याची, तसंच विज्ञानात तरुणांना रस निर्माण व्हावा यासाठी विज्ञान अधिकाधिक सुलभ करण्याची जबाबदारी पार पाडते आहे.
3. मिनी पीसीआर, नेमकं काय आहे?
मुग्धा : मिनी पीसीआर ही केंब्रिज येथील कंपनी आहे. ही कंपनी सर्वाना जीवशास्त्नीय अध्ययनासाठी प्रयोगशाळा तंत्नज्ञान उपलब्ध करून देणारी आहे. माङो सहकारी ङोक आणि सॅबेस्टियन यांच्या अनेक संकल्पनांतील ही एक. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं व व्यावसायिक संधीत रूपांतर करण्याचं आव्हान होतं. खरं तर कॅरी बी. मुल्लीस हे पीसीआर तंत्नज्ञानाचे मूळ जनक. त्यांना त्याबद्दल वीस वर्षापूर्वी नोबेल पुरस्कारही मिळाला. प्रत्यक्ष जीवनात लोक या तंत्रज्ञानाचा आज वापरही करतात. अगदी शाळकरी मुलंही हे तंत्र वापरतात. हे तंत्र तसं क्लिष्ट नाही, पण ते सहजसुलभ वापरण्यासाठी उपलब्ध होण्याची गरज आहे. अवकाशात या तंत्नावर आधारलेले मशीन वापरण्याची कल्पना तोवर नव्हती; पण ङोकने मांडलेल्या या संकल्पनेतून आम्हीही तसे उपकरण निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारले.
4. या उपकरणाचं वैशिष्टय़ काय आहे?
मुग्धा : पीसीआर तंत्रज्ञानाच्या तुलनेत मिनी पीसीआर स्वस्त व सुलभ तरीही चांगला परफॉर्मन्स देणारी आहे. त्याचप्रमाणे हाताळणीसाठी इतकी सुलभ आहे की अगदी तळहातावर ठेवून वापरता येतं. लॅपटॉप, स्मार्टफोन व टॅबलेट या साधनांशी जोडता व वापरताही येतं. बॅटरीही पोर्टेबल असल्यानं दुर्गम भागातही नेण्यास सहज सोपे आहे.
आपण डीएनएच्या जगात राहतो. डीएनए विज्ञानामुळे नवी औषधे, पीकपद्धती विकसित करण्यास, गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होत आहे. मात्र डीएनए तंत्नज्ञान क्लिष्ट व खर्चाचे असल्यानं बहुतेकजण त्याच्या वापराकडे वळत नाहीत. मात्न, मिनी पीसीआरमुळे हे तंत्नज्ञान सर्वासाठी सर्वत्न खुले झाले आहे. मिनी पीसीआर डिस्कव्हरी सिस्टीम हे यंत्न जीवशास्त्नीय अभ्यासासाठी शाळांमधून उपलब्ध होऊ शकते, तसेच शास्त्नज्ञांनाही आता त्यांच्या संशोधनासाठी महागडय़ा मोठय़ा पीसीआर यंत्नाची गरज भासणार नाही. मोठी यंत्नणा वापरण्यासाठी मोठय़ा प्रयोगशाळांमध्ये जो वेटिंग पिरेड असतो, तो टळणार आहे.
5. अवकाशात या यंत्नाची गरज का भासेल?
मुग्धा : इम्युन सिस्टिम तपासणं, सूक्ष्म जीवसृष्टीच्या शक्यता तपासणं अशा अनेक गोष्टींच्या संशोधनासाठी, त्याविषयीच्या विश्लेषणासाठी, समस्यांची उकल करण्यासाठी या यंत्नाचा मोलाचा उपयोग होणार आहे. अवकाश संशोधकांच्या शरीरावर तेथील वास्तव्याचा होणारा परिणाम तपासण्याची सुविधा या यंत्नाद्वारे उपलब्ध होणार आहे.
6. भारतात हे उपकरण उपयुक्त असू शकतं का?
मुग्धा : एबोला व्हायरस रिसर्चसह विविध संशोधनात हे उपकरण उपयुक्त ठरतं आहे. रक्तातील घटक तपासणं, अनुवांशिक माहिती मिळवणं, पिकांची अनुवांशिक रचना तपासणं आदि कामात हे उपयुक्त ठरतं. प्रयोगशाळेत विकसित झालेलं हे तंत्न पिकांवरील रोग व कीडीचं निरीक्षण करण्यास मदत करते. कीड संपवण्यासाठी शेतकरी कीटकनाशकाचा वापर करतात. अनेकदा पिकांना संसर्ग झाला किंवा कसे, हे जाणण्यासाठी व्हिज्युअल चाचण्यांवर अवलंबून असतात. अनेकदा उशीर झाल्यामुळे पिकांवरील रोगांवर नियंत्नण मिळवणो कठीण होऊन बसते. त्यामुळे भारतीय शेतक-यांसाठीही पिकांवरील कीड, रोग, हवामानातील बदल यांची तत्काळ माहिती मिळू शकेल याचं निदान करणारं डीएनए आधारित हे उपकरण उपयुक्त ठरू शकेल असं वाटतं.
मुलाखत- सुषमा उपाध्याय