शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डोह : मनात उठणा-या तरंगाचा ठाव घेत होणारी विचित्र घुसळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:37 IST

जागतिकीकरणानंतर प्रत्येक क्षेत्रात नव्याचे, बदलाचे वारे वाहू लागलेत. हा नवेपणा आणि बदल अनुभव घेण्याच्या आणि आनंद घेण्याच्या प्रक्रियेतही शिरला आहे.

- माधुरी पेटकर

जागतिकीकरणानंतर प्रत्येक क्षेत्रात नव्याचे, बदलाचे वारे वाहू लागलेत. हा नवेपणा आणि बदल अनुभव घेण्याच्या आणि आनंद घेण्याच्या प्रक्रियेतही शिरला आहे. स्वत:चा आनंद शोधणं, घेणं, स्वत:च्या स्पेसचा उपभोग घेणं, खासगीपणा जपणं या गोष्टीही टोकदार व्हायला लागल्या आहेत.मात्र अनुभव, आनंद केवळ तात्पुरता, वरवरचा नसतो. त्याचे खोलवर तरंग उमटतात. एखाद्या डोहात दगड टाकल्यानंतर त्यावर जसे तरंग उमटतात तसे. आपल्याला अनेकदा केवळ वरवरचा तरंग दिसतो; पण तरंगांनी तो अख्खा डोह ढवळला जात असतो. एक छोटासा दगड डोहाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचतो; तरंग उठतात, पाणी ढवळलं जातं. त्या एका दगडानं किती उलथापालथी होतात; पण त्या डोहातल्या आंदोलनांचा आवाज कोणालाही येत नाही. डोह त्याचा त्याचा अनुभव घेतो, स्वत:पाशीच जपून ठेवतो.असा हा डोह प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो. त्या डोहात प्रत्येक अनुभवानं अनेक तरंग उमटतात. आनंदाचे, दु:खाचे, शंकेचे, संभ्रमाचे. व्यक्तीच्या मनातल्या त्या डोहाचं दर्शन ‘डोह’ या १९ मिनिटांच्या लघुपटात होतं. आपल्याला तो डोह भेटतो तो नायिका श्रुतीच्या रुपात. श्रुती एक कॉलेजला जाणारी तरुणी. स्वत:ची स्पेस जपणारी आणि शोधणारीही. डोहची सुरुवात होते ती एका प्रवासानं. मुंबईत राहणारी ही तरुणी लोकलनं कुठूनतरी निघून आपल्या घराच्या दिशेनं निघालेली असते; पण तिचा खरा प्रवास तो नसतोच. मनातल्या आनंदाच्या छटा, त्या आनंदातून आलेला हलकेपणा तिच्या चेहºयावर दिसत असतो, तिच्या हावभावातून व्यक्त होत असतो. ती त्या अनुभवाचाच प्रवास परत परत अनुभवत असते. तो अनुभव असतो शारीरिक सुखाचा. आपल्या मित्रासोबत अनुभवलेल्या एकांताचा. या एकांतासाठी मैत्रिणींना थापा मारलेल्या असतात. घरी-कॉलेजला जाते असा बंडल मारलेला असतो. परीक्षेच्या तोंडावर सगळ्या ताणाचा विसर स्वत:ला पडून ती वेगळंच जगून घेते. घरी जाताना, घरी गेल्यावर, कॉटवर झोपलेली असताना, बाथरूममध्ये गेल्यानंतर प्रत्येकक्षणी तिच्या मनातला तो एकांताचा अनुभव सतत डोकं वर काढतो. प्रत्येक वेळेस प्रेक्षकाला त्या अनुभवांचं एक वेगळंच रूप दिसत असतं. लोकलमधून घरी जाताना आनंदी दिसणारी श्रुती वेगळी. घरी आल्यावरची वेगळी. मित्रासोबत असताना अचानक दारावरच्या टकटक झाली तेव्हा त्यानं तिला बाथरूममध्ये जा म्हणत लपवलेलं असतं. ते आठवून तेव्हा आपण चुकलो तर नाही ना ही शंकाही चेहºयावर येते. लोकलमधून मित्राला फोन करणारी श्रुती मित्राचा फोन लागत नाही म्हणून निराश होते, या माणसानं आपल्याला केवळ ‘यूज’ तर केलं नाही ना, हा प्रश्न तिला काही काळ छळताना दिसतो. घरी गेल्यावर आईपासून काहीतरी लपवणारी, सर्व लक्ष सारखं फोनकडे असणारी, मनातल्या विचारांनी त्रस्त होऊन लहान भावावर चिडणारी श्रुती दिसते. मित्राचा फोन आल्यावर पुन्हा आनंदी होते. हे सारे मनातले तरंग आपणही पाहतच राहतो.डोहचा लेखक- दिग्दर्शक आणि पटकथाकारअक्षय इंडीकरला या फिल्ममध्ये कोणतीच एकच एक भावना दाखवायची नाहीये. त्याच्या मते, कोणत्याही अनुभवाची अशी एकच एक छटा नसते. कोणत्याही अनुभवाला अनेक भाव चिकटलेले असतात. डोहमधून अक्षयला या एका अनुभवाला चिकटलेले अनेक भाव दाखवायचे होते. चूक-बरोबर असं काहीही ठरवायचं नव्हतं.जागतिकीकरणानंतर स्वत:ची स्पेस शोधणारी तरुण पिढी दाखवायची होती. जागतिकीकरणानंतर शरीराला, शरीर अनुभवाला आलेलं महत्त्वही दाखवायचं होतं. या सगळ्याच्या माध्यमातून मनातल्या भावनांच्या गूढतेचं दर्शनही घडवायचं होतं. हा अनुभव अस्वस्थ करतोच.

madhuripethkar29@gmail.com