शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

रंगात रंग..

By admin | Updated: March 24, 2016 21:13 IST

निसर्ग एकीकडे या दिवसांत मनमुक्त रंगपंचमी खेळत असतो, आणि आपण रंग खेळायचा नाही,

 - विनय र. र.( लेखक.... आहेत.)निसर्ग एकीकडे या दिवसांतमनमुक्त रंगपंचमी खेळत असतो,आणि आपण रंग खेळायचा नाही,रंगायचं नाही म्हटल्यावर हिरमोड होतोच.पण पाणीटंचाईच्या काळातपाण्याची नासाडी करत रंग खेळणंही चूकच!त्यावर उपाय काय?अशा रंगात रंगायचं जे निसर्गच देतो,बादलीभर अंघोळीच्या पाण्यातही ते धुऊन निघतात,नाही धुतले तरी चालतात!पण असे रंग शोधायचे कुठं?आपल्याच घरात!!लहान मुलं एक खेळ खेळतात ‘डाली बत्ती लावत जाव’ असे राज्य घेतलेला मुलगा म्हणतो आणि कुठल्यातरीे झाडाचे नाव सांगतो. लाल पत्ती लाव जाव म्हटलं की सगळी मुलं लाल पत्रीच्या झाडावरून लाल पत्री आणून त्याला देतात. मग दुसरे, तिसरे, चौथे अशी अनेक झाडांचा, त्यांच्या रंगांची, फुलांची, फळांची, पानांची ओळख लहानपणी होते. ती विसरली की मग रंगांसाठी बाजारावर अवलंबून राहायला होते. चार रुपये टाकले की भरपूर रंग मिळतो, तो एकमेकांना फासायलाही काहीे वाटत नाही.उन्हाळ्यात होळी-रंगपंचमी हे सण येतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. दुष्काळी वर्षांमध्ये ती आणखीनच तीव्र असते. मग काही जागरूक नागरिक सर्वांना सांगतात- होळी, रंगपंचमी खेळू नका, पाणी वाया घालवू नका. त्यांचं हे म्हणणं चुकीचं नाही. पण हेही खरं की, याच काळात सर्वांना निसर्गात वृक्षांकडून प्रगट होणाऱ्या रंगांच्या उधळणीचा आविष्कार आकर्षित करीत असतो. इतर वेळी ज्या वृक्षांकडे लक्षही जाणार नाही असे अमलताश, गुलमोहोर, नीलमोहोर, पाटलाची सून, पळस, पांगारा असे विविध वृक्ष आपल्याला त्यांच्याकडे बघायला लावतात. पुन्हा पुन्हा बघायला लावतात. त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचे रंगही किती आकर्षक. भगवा, अबोली, कितीतरी रंग, याशिवाय सूर्याच्या वाढत्या ऊर्जेमुळे जुन्या पानांचे ज्येष्ठ पोक्त असे पिवळे-तपकिरी रंग, तरण्या पानांचे हिरवे पोपटी रंग आणि उमललेल्या पर्णकुटांचे लाल, तांबूस, विटकरी रंग.. निसर्गात रंगांच्या उठावाचा असा इशारा असल्यावर माणूस तरी काय करणार? होळी ते रंगपंचमीच्या या पाच दिवसांत रसरशीत रंगात रंगून जाण्याची ओढ लागणारच की!एकीकडे ही ओढ आणि दुसरीकडे पाण्याची तंगी, दुष्काळ, होरपळ. काय करणार? मन स्वस्थ बसू देत नाही. पाणी तर वाचवलंच पाहिजे.पण आपल्या मित्रमैत्रिणींना रंगात रंगवलं पाहिजे, रंगलेलं पाहिलं पाहिजे, आणि स्वत:ही रंगलं पाहिजे. पण कसं?हे जमावं कसं? ऐन दुष्काळात पाणी नासवून रंग खेळायला मन मानत नाही, कारण ते चुकीचंच आहे. पाण्याची नासाडीही करायची नाही आणि रंगही मनसोक्त खेळायचे असं काही करता येईल का?असे रंग वापरता येतील का, की ज्यांना फारसं पाणी लागणार नाही? असे रंग वापरता येतील का, जे धुवून काढून टाकायला लागणार नाहीत?मुळात हे प्रश्न आपल्याला पडायचं कारणच हे की आपण होळीला/रंगपंचमीला असे रंग वापरायला सुरुवात केली की जे खरं तर अंगाला लावण्यासाठी तयार झालेलेच नाहीत. कारखान्यात तयार झालेले हे रंग भिंती रंगवण्यासाठीचे आहेत. लाकडी आणि लोखंडी सामान रंगवण्यासाठी आहेत. हो आणि अर्थातच काही प्लॅस्टिक, नायलॉन रंगवण्यासाठी आहेत. ते अंगाला लागले की चामडीला त्रास होणारच! फिनाईलाने फरशी, संडास, बाथरूम चांगली धुतली जाते म्हणून फिनाईलने अंघोळ कराल तर काय होईल? चामडी काळवंडून जाईल.तेच या रंगांचंही! कारखान्यात बनलेले रासायनिक रंग त्रास देणारच! मला प्रश्न पडतो, निसर्ग रंगांची उधळण करतो ती कशी दिसते?- मनमोहक दिसते. आकर्षक दिसते. प्रत्येक रंग खुलून उठून दाखवणारी असते. आपण दुसऱ्याला रंगवतो ते कसे? रंगांची उधळण कसली मिसळण करतो आणि रंगांची दुनिया बहारदार करण्याऐवजी विद्रूप करतो. आॅईलपेंट फासतो, सिल्व्हरपेंट, डांबरी रंग फासतो आणि त्यातून ते काढायला भरपूर पाणी वापरतो. त्वचारोग ओढवून घेतो. डोळ्यात रंग गेला तर आंधळेपण ओढवून घेतो.आपण एकमेकांना विद्रूप नको करायला. रंगांनी सजवून रंग उधळ्यापेक्षा रंग लावू या. फुलांच्या पाकळ्यांच्या माळा, गुच्छ, गोंदे असेही करता येईल. एकमेकांना घालता येतील. दुनिया रंगीबेरंगी आहे. प्रत्येक रंगाच्या वस्तूला शेजारपाजारच्या रंगाच्या वस्तू खुलवतील असे रंग लावू. मजाही करू, आरोग्यही आणि पाणीही वाचवू!!रंगपंचमी खऱ्या अर्थानं साजरी करू..!!