एक ई-मेल
मा. उपसंचालक
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
येरवडा, पुणो,
सप्रेम नमस्कार,
आपली मला नक्की मदत मिळेल या आशेवर आज मी हे पत्र लिहित आहे.
गेले कित्येक दिवस मला तुम्हाला पत्र लिहावावंस वाटत होतं. पण धीर होत नव्हता. कित्येकदा मी मेल लिहिता लिहिता थांबले. खरं बोलायची लाज वाटत होती. आमच्यासारख्या उच्चशिक्षित घरात जे घडत होते ते चारचौघांत सांगण्यासारखं नाही, पण तरी आता बोलायला हवं! कारण आई म्हणून मी कमी पडले की काय, असा प्रश्न मलाच छळतोय!
तुमच्या केंद्रात यायचे माझं धाडस होत नाही म्हणून हा ई-मेलचा मार्ग सोयीचा वाटला. मी पुण्याचीच. मी एका प्रख्यात महाविद्यालयात एचओडी म्हणून काम करते. माङो पती एका मल्टिनॅशनल कंपनीत प्रेसिडेण्ट आहेत. आम्हाला एकच मुलगा बंटी.
घरात कशाला काही कमी नाही. तो अगदी हुशार विद्यार्थी होता. इतका हुशार की त्याला पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये लगेच अॅडमिशन मिळाले. पहिली दोन वर्षे चांगली गेली. पण दुस:या वर्षीचं सेमिस्टर संपल्यापासून त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. रात्री घरी उशिरा येई, विचारलं, ‘का रे बाबा उशिरा येतोस?’’ तर अमुक मित्रकडे गेलो होतो, सिनेमाला गेलो होतो, अशी काहीतरी उत्तरं तो देत असे. मला वाटायचं सुट्टी आहे, करू दे मौज. तो मागेल तितके पैसेही मी देत होते. त्याच्या बाबांना त्याचा उशिरा येणं अजिबात आवडत नसे. ते त्याला पटकन रागावून बोलत. तो काहीही उत्तर देत नसे किंवा आलोच जाऊन असे सांगून सरळ चपला घालून घराबाहेर पडत असे.
कॉलेज सुरू झाल्यावर तो घरी येताच सिगरेटचा वास येई. पण काडेपेटी किंवा सिगरेट असे काही मला सापडत नसे. त्याच्या बाबांना सतत सिगरेट ओढायची सवय होतीच. त्या गोष्टीवरून आम्हा दोघांची भांडणो होत. मला सिगरेट आणि दारूचा किती तिटकारा आहे याची बंटीला पूर्ण जाणीव होती. कारण त्याचे बाबा पार्टीला जात आणि येताना पिऊन येत. आधी सिगरेटचा वास आणि त्यात दारूचा दर्प, मला मळमळायचचं. पण मी काही या विषयावर बोलले तर ते मला गप्प करीत. हळूहळू त्यांची सवय वाढत गेली इतकी की आम्ही घराचं रिनोव्हेशन केलं तेव्हा त्यांच्या मनासारखा बार त्यांच्या स्टडीत बसवून घेतला. तेव्हापासून आमच्या नात्यात अंतर पडलं. आमचं सतत भांडण व्हायचं ते झालं की ते डोकं शांत करण्यासाठी भरपूर प्यायचे.
हे सारं बंटीसमोर व्हायचं. तो तरुण होता, निदान हे सारं पाहून तरी तो दारूला कधी स्पर्श करणार नाही, असं मला वाटायचं!
पण एक दिवस बंटी म्हणाला, ‘‘आम्ही सगळे मित्र गोव्याला जाणार आहोत’’. मी म्हटलं, ‘जा पण काहीबाही पिऊ नको’. ते गेले ते ही गाडी चालवत. परत येताना गाडी कुठल्याशा ट्रकवर जाऊन आदळली. नशिबाने डोक्यावर जखम झाली इतकंच. पोलीस केस झाली. त्यात बंटी दारू पिऊन चालवत होता हे निष्पन्न झाले. मी हताश झाले. विचारलं तर तो निर्लज्जपणो म्हणाला फक्त एक कॅन बिअर घेतली होती. पण पहिल्यांदाच घेतली होती म्हणून त्रस झाला इतकंच. पंधरा दिवसांनी पुन्हा एका वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेला. आला तो पिऊनच!
मग रोजच रात्री अभ्यासाला जातो म्हणून जाऊ लागला. पैशाची मागणी वाढली. तो बहुधा रोज पीत असावा. त्या काळात माझी सकाळी साडेसात वाजता लेक्चर्स असायचे. तोपर्यंत तो जागा झालेला नसे. मी घरात असले की तो घराबाहेर. मी झोपल्यावर घरात.
माझी पक्की खात्री पटली आहे की, तो वडिलांच्या मार्गावर चालला आहे.
अलीकडेच आमच्या एका नातेवाइकाने त्याला बारमध्ये पाहिलं आणि मला खडूसपणो सांगितलं,‘ वाहिनी लक्ष द्याच बंटीकडे. बापाच्या वळणावर चालला आहे.’
मी तेव्हापासून त्याच्याशी कडकपणो वागू लागले. त्याचे डेबिट कार्ड काढून घेतलं. पैसे देणं बंद केलं. त्याच्या नकळत दोन दिवसांपूर्वी त्याची खोली तपासली. तर बेडखाली पाच- सहा बाटल्या पडलेल्या.
माझं सगळा धीर गेलाय. तुम्हीच मला मदत करा.
ही एका आईची कळकळीची विनंती आहे
***
तरुणांमधलं दारूचं व्यसन कसं पोसलं जातं याचा अभ्यास करत मुक्तांगणमध्ये पोहोचलो तर नाव गाव सारं गुप्त ठेवत, ही एक ई-मेल मला वाचायला देण्यात आले! वयात येणारा, दारूच्या व्यसनाचे सगळे दुष्परिणाम माहिती असलेला एक तरुण मुलगा स्वत:हून दारूच्या गर्तेत फसत चाललाय!
असे कितीतरी आजचे सुशिक्षित तरुण दारूच्या पेगमध्ये आयुष्य बुडवणारे. का? कशामुळे? ते असे फसतात.
उत्तर शोधत मी मुक्तांगणमध्ये येऊन पोहोचलो होतो.
दारूचं व्यसन लागण्याची
काही सुरुवातीची लक्षणं!
1. घरात आई-वडील जर दारू पीत असतील, तर मुलांना हे पटतच नाही की, दारू पिणं वाईट आहे!
2. दारू पिणं अनेकदा मित्रंच्याच संगतीनंच सुरू होतं!
3. दारूचं प्रमाण सुरुवातीला कमीच असतं पण ते प्रमाण सावकाश वाढतच जातं.
4. तरु ण मुलांचं घराबाहेर राहण्याचं आणि पैसे खर्च करण्याचं प्रमाण अचानक वाढलं तर दारूचं व्यसन लागलंय का, हे तपासून पहायला हवं.
5. घरच्यांनी पैसे देणं थांबवलं, पुरत्या नाडय़ा आवळल्या तरी ही मुलं पैशाचा बंदोबस्त कसातरी करून दारू पितातच!
मनोज कौशिक
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो.