प्राची पाठक
कॉलेजगोइंग तरुणांना बर्याचदा आपले आई-वडील म्हणजे ‘बिते कल की बात’ असं वाटत असतं. त्यांच्याशी, आपल्या लहान-मोठय़ा भावा-बहिणीशी आपलं पटणारच नाही, असंही मनात उगाचंच गोंदवून ठेवलेलं असतं. त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा त्यामुळे आपण प्रय}च करत नाही. संवादाची ही गरज उगाचंच दुसरीकडे शोधत असतो आणि त्यानं बर्याचदा निराशही होत असतो. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आजूबाजूची माणसं आपल्याला समजून घेणार नाहीत, असं सारखं का वाटत असतं? आपण कधी प्रयत्न करतो का घरातल्या माणसांशी नीट बोलायचा? त्यांना आपलं सुखदुर्ख, आपलं मन कळणारच नाही, असा पक्का निष्कर्ष आपण कशाच्या जोरावर काढतो?
* काय करता येईल?
ज्यांच्याशी आपली मैत्री व्हावी, त्यांच्याशी ‘बोलता’ यावं म्हणून आपण धडपडतो, ते आपल्याला त्यांच्यात घेतसुद्धा नाहीत, त्यांच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळेल मिळावी म्हणून आपण इतकी धडपड करतो, त्याच्या दोन टक्के जरी धडपड आपण आपल्या घरातल्या मंडळींना समजून घ्यायला केली तर? - बघा एकदा करून. एक छान दिलासा आपल्या मनाला मिळू शकेल. आपली भावंडं आपले जिगरी दोस्त होऊ शकतात. एकाच घरात वाढल्यामुळे आपली पूर्ण परिस्थिती त्यांना वेगळी सांगायची गरज नसते. यांना काय आपलं मन कळणार, या अडथळ्यापलीकडे जाऊन आपल्या बहीण-भावांशी, आपल्या आईवडिलांशी, आजोबा- आजीशी, इतरही नातेवाइकांशी, शेजारपाजारच्या लोकांशी मैत्नी होऊ शकते का, ते एक्सप्लोर करून बघितलं पाहिजे. आपले जिव्हाळ्याचे विषय त्यांच्याशी बोलले पाहिजे. आपण काही न बोलताच आपल्या मनातलं ते ओळखून घेतील, अशा भ्रमात राहायची काही गरज नसते. आपल्या घरातल्या लोकांशी हळूहळू संवाद वाढवत नेता येऊ शकतो.
* त्याने काय होईल?
1- घरातल्या लोकांशी आपलं संभाषण केवळ संवादापुरतं न राहता हळूहळू मैत्नीत रूपांतरित होईल.2- आपला सच्चा मित्न होण्यासाठी कोणाला तरी भलामोठा दिवा घेऊन शोधत बसायची गरज नसते. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातच सच्चे मित्न असू शकतात आणि त्यांची मैत्नी आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित असू शकते, याची जाणीव आपल्याला होईल. 3- अडीअडचणीला लागणारा सपोर्ट घरच्या घरीच तात्काळ मिळू शकेल. 4 - मदत करायची वेळ आलीच तर ते तयार असतात.