शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुम्ही  इरफान सारखे  फायटर  आहात  का ? -विचारा स्वतःला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 07:45 IST

आपल्या आयुष्यात जादू व्हावी आणि सगळे प्रश्न सुटून एकदम आलिशान आयुष्य आपल्या वाटय़ाला यावं, असं अनेकांना वाटतं. पण ते करत काहीच नाही, ते फक्त गोंजारत बसतात स्वत:ची असलेली (नसलेली) दु:ख आणि दोष देतात इतरांना.

ठळक मुद्देमग भिडायचं त्यांना, एकदम थेट. त्यासाठी खरं तर एकच मंत्न आहे.. निकल पडो.. आक्र मण.. 

- प्राची पाठक

‘काय करावं आता पुढे, काहीच सुचत नाहीये.’ असं वाटतंच. एकावर एक प्रश्न मनात येत असतात. त्यांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात. उत्तरं माहीत नाहीत म्हणून अनेकदा आपण सापडेल उत्तर कधीतरी किंवा कोणी आपल्याला आयताच मार्ग दाखवेल, मग आपण उठू आणि हातपाय मारू, असं ठरवतो.त्या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधणं दूर, आपण त्यांच्यापासून पळच काढत राहतो. त्यांना मनाच्या कोप:यात कुठेतरी डांबून ठेवतो. तो कोपरा दुस:या कोणी आपोआप वाचावा, समजून घ्यावा आणि प्रेमाने, चटचट आपल्याला उत्तरं देऊन आपले प्रश्नच सोडवून टाकावे.- अशी जादू घडायची आपण वाट पाहत बसतो.तशी जादू आयुष्यात घडत नाही. काही प्रश्नांची उत्तरं ही कडूजहर असतात आणि ती आपल्याला नको असतात.आपण शॉर्टकट मिळेल का, बायपास मिळेल का, असं आपण बघत असतो.ते काही सापडत नाहीत म्हणून मग आपण मला खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडचणी आहेत, मार्ग दिसत नाही असं म्हणत.काहीच करत नाही. असतो तिथेच बसून राहतो. गाडी हलतच नाही जागची. त्यामुळे, आणखीन नवनवीन प्रश्न आपल्या जुन्या प्रश्नांशेजारी येऊन बसतात. आता तर आपलं डोकं पार हँग होऊन जातं. आणि काहीच न करता, आपण फक्त रडत राहतो आणि एक नंबरचे रडे होता जातो.ज्याच्या जाण्यानं आपण अलीकडेच हळहळलो, तो इरफान खान. सामान्य घरातला मुलगा, त्यानं ठरवलं आपण अभिनय करायचा, तेव्हा त्याच्या आयुष्यात काही सगळं सोपं होण्याची जादू झाली असेल का?त्याच्याही समोर असेच अनेक प्रॉब्लेम्स होते. तो काही बॉलिवूडच्या व्याख्येत बसणा:या हिरोसारखा गोरापान, देखणा, उंच, सिक्स पॅक नव्हता. अगदी त्याच्या दिसण्या-बोलण्यापासून ते त्याच्या बॅकग्राउण्डर्पयत त्याच्यापुढे वेगवेगळे प्रश्न होते. या प्रश्नांना जेव्हा तो स्वत: भिडला, तेव्हा त्याला एकेक करून मार्ग दिसत गेला. त्यांना जर तो भिडलाच नसता, तर तो केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चमक दाखवणारा अभिनेता बनूच शकला नसता.प्रत्येक टप्प्यावर त्यानं स्वत:ला त्याच्या आजूबाजूच्या प्रश्नांमधून स्वत:च उत्तरं शोधत बाहेर काढलं. अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातसुद्धा जेव्हा असाध्य रोगाचं निदान झालं, तेव्हाही त्याने असाच स्व-संवाद साधत स्वत:ला धीर दिला होता. ते त्याचं पत्र चिक्कार व्हायरल झालं, ते तुम्हीही एव्हाना वाचलंच असेल.एखाद्या अथांग समुद्रावर एखादी छोटीशी प्लॅस्टिकची पाण्याची बाटली फेकून द्यावी आणि ती बाटली त्या प्रचंड मोठय़ा समुद्राच्या लाटांवरती हेलकावे खात अशीच भरकटत राहावी आणि शेवटी त्या लाटांना शरण जावी, असेही असहाय विचार त्याच्या वाटेला आले. मग त्या लाटा मनात आणून, आपली असहायता बघून रडत बसावं, त्यात आपला आजचा वेळदेखील खराब करून टाकावा की ठीक आहे, भिडू यांनाही अशी मनाची उभारी घेऊन असेल त्या परिस्थितीला सामोरं जावं, हा निर्णय त्याने शेवटी घेतला. नुसताच विचार करत बसून, खूप समस्या आहेत असं स्वत:ला गोंजारत बसून काहीच उपयोग नसतो, हे त्याच्या लक्षात आलं. आयुष्य हा एक खेळ आहे आणि त्याचे काही नियम आहेत. हे नियम समजून घेतल्या शिवाय, त्यांना स्वीकारल्याशिवाय आणि  मग त्यांच्यावरती खिलाडूवृत्तीने उपाय शोधल्या शिवाय आयुष्याच्या खेळामध्ये मजा येत नाही, हे त्याला कळलं. आपल्या हातात फार कमी दिवस आहेत, याची जाणीव एकीकडे होतीच. तो असेल त्या परिस्थितीला थेट भिडला. नवीन कामं करत राहिला. जमेल तितकी स्वत:ची तब्येत सांभाळत राहिला.

या सगळ्या जाणिवेच्या प्रवासात आपल्याला शिकण्यासारखं खूपच काही आहे. आपण आपल्या समस्यांमध्ये गुरफटून जाऊन त्या आहेत त्याहून खूप मोठय़ा करून हातावर हात ठेवून बसलेले असतो का?हा प्रश्न आधी स्वत:ला विचारायला हवा. आपल्या पुढेच खूप मोठय़ा समस्या आहेत, असंच एक रडगाणं आपण वाजवत बसलेलो असतो का?आपण अनेकदा कल्पनाच करत बसतो. मी असं करायला गेलो, तर तसं होईल. मी हा निर्णय घेतला, तर अमुक लोक काय म्हणतील?ते आपल्याला त्नासच देतील. मी अमुक मार्ग निवडला तर तिथे तमुक अडथळे असतील, अशा कल्पनेच्या विश्वात समस्या फुगवत किती वेळ अडकून राहायचं? कधीतरी आपल्याला स्वत:शी बोलावं लागेलच. ऊठ बाबा आणि झडझडून कामाला लाग, हे स्वत:लाच सांगावं लागेल. आपण कल्पना करून आपलं दु:ख फुगवून ठेवतो का याचा विचार करून थेट कामाला लागलं पाहिजे.स्वत:शी बोलायचं. काय बेस्ट उपाय असू शकतात, यांची माहिती काढायची. मग भिडायचं त्यांना, एकदम थेट. त्यासाठी खरं तर एकच मंत्न आहे.. निकल पडो.. आक्र मण.. फार काही अवघड नसतं हे..

( प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)