शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:25 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

-डॉ. अरुणा ढेरे

अरुणा  तू वीस वर्षाची होतीस तेव्हा वेगळी होतीस. आज तुझ्यापेक्षा कितीतरी वेगळी विशीतली ‘तरुण’ मुलं माझ्या आवतीभोवती आहेत.तो काळ संथ होता. वाढीचा अवकाश पुष्कळ मोठा होता. आज आहेत तेवढी वेगवेगळी दालनं खुली नव्हती. आजच्या तरुण मुलांना इतके विविध, आपल्या कक्षेपलीकडे प्रदेश पाहता येतात, इतकी माहिती असते, नवे अनुभव समोर असतात. असं बरंच काही जे तुला माहितीही नव्हतं.वेगळं आहे आजचं जग.मात्र आजही या जगात एक गोष्ट तीच आहे. हे जे वय आहे ते बक्षीस आहे आपल्याला आयुष्यानं दिलेलं. मोठी देण आहे. आणि तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हा निर्णय प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे.टाइम हा ‘पास’ करण्यासाठी नसतो.  आपलं आयुष्य सुंदर, कसदार आणि समृद्ध करणार्‍या गोष्टी आपण आपला वेळ वापरून कराव्यात. कला, ज्ञान, तंत्रज्ञान जे शिकू, वाचू, करून पाहू ते कमीच आहे. म्हणतात ना, सितारों के आगे जहॉँ और भी है.-तसंच आहे हे.मग आता मला सांग तू आजच्या काळात जर वीस वर्षाची असती तर काय केलं असतं?आजची मी मला तुझ्यात, वीस वर्षाच्या अरुणात पाहतेय, मी तुझ्या माध्यमातून जगायला लागले तर मी काय केलं असतं?हे ऐन मोक्याचं वय आहे. आनंद, उल्हास, उमेद असते या वयात. कराल त्यासाठी जागा असते आयुष्यात. जगामध्ये वावरण्याचं, उभं राहण्याचं, हवं ते करण्याचं स्वातंत्र्यही देतं ते हेच वय.त्या स्वातंत्र्यासह जबाबदारीची जाणीवही करून दे स्वतर्‍ला. ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या खांद्यावर आपण जबाबदारी देतोय हे ‘भान’ सतत जागं असायला हवं मनात.आपली माणसं, परिसर, ज्यांच्या संबंधात आपण मोठे होतो, वाढतो त्या गोष्टी, समाज, त्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तेव्हा तुला एकटीलाच मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं आहे.आणि ही सगळी माणसं, भोवताल, जगण्याचा अवकाश सोबत असणं म्हणजे काही ते तुझ्या स्वातंत्र्यावर आलेलं बंधन नाहीये, तर या सार्‍या तुलाच समृद्ध करणार्‍या गोष्टी आहेत. तशी समृद्ध तू हो. जमेल तुला!एक काळ होता जेव्हा वीस वर्षाच्या मुलांच्या पायात घरच्यांच्या, समाजाच्या मोठय़ा बेडय़ा होत्या. आता त्या दोन्हीकडच्या बेडय़ा तुटल्या आहेत. घरचे लोक सदैव पाठिंबा द्यायला तत्पर दिसतात. मग विचार काय करता, झेप घ्या! उद्याचं जग तुमचं आहे.वीस वर्षाची होती अरुणा तेव्हाही सुदैवानं तिच्यावर विश्वास टाकणारी माणसं होती. आजही आहेत.मात्र नव्या जगात नवं अवकाश आहे. ते अवकाश कवेत घेताना तात्पुरतं काय आणि टिकाऊ काय यातला फरक ओळखायला शिक. माध्यम तुमच्यासाठी की तुम्ही माध्यमांसाठी हे विचार स्वतर्‍ला!आता तंत्रज्ञानामुळे गोष्टी किती सोप्या झाल्या, जी माहिती, ज्या गोष्टी मिळवायला झटावं लागायचं ते सारं सहज पुढय़ात येतं, मग त्यापुढे जात, त्यापलीकडचं जग आणि अनुभव कसे कवेत घेणार, ते कसं जगणार याचा विचार कर.आणि आपलं मोठ्ठं अवकाश कायम ठेवताना आणि विस्तारताना आपल्या माणसांच्या, समाजाच्या विश्वासाचं ‘भान’ ठेव.ते भान कायम जागं असलं पाहिजे.आणि जात राहिलं पाहिजे सतत पुढे. नेमानं!

(ख्यातनाम लेखिका)