शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा सुरू राहणार

By admin | Updated: May 31, 2015 01:29 IST

पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यान दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान गद्दाफी स्टेडियमजवळ काल रात्री झालेल्या स्फोटाला विद्युत रोहित्राचा स्फोट असल्याचे सांगण्यात आले होते;

लाहोर : पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यान दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान गद्दाफी स्टेडियमजवळ काल रात्री झालेल्या स्फोटाला विद्युत रोहित्राचा स्फोट असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु तो दहशतवादी हल्ला होता. तथापि, या घटनेनंतरही झिम्बाब्वेने मालिका सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील अखेरचा सामना उद्या खेळवला जाणार आहे.गद्दाफी स्टेडियमवर दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले जात होते आणि तेथे जवळच स्फोट झाला. सामन्यादरम्यान जवळपास ९ वाजता झालेला स्फोट हा रिक्षात ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे झाल्याचा दुजोरा माहितीमंत्री परवेज रशीद यांनी ‘जियो न्यूज’ला दिला. रिक्षात स्फोट हा कलमा चौक येथे झाला आणि कलमा चौक गद्दाफी स्टेडियमपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असल्याचे रशीद म्हणाले.सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हा स्फोट स्टेडियमजवळील विद्युत रोहित्रच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले होते.पीसीबी प्रवक्त्यांनी लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्रीच पाऊल उचलण्यात आले होते, यालाही दुजोरा दिला. आगा अकबर म्हणाले, ‘‘स्फोट झाल्याचे समजताच ही बाब पसरली गेली; परंतु सामना पाहण्यासाठी आलेले क्रिकेट चाहते सुरक्षित होते आणि कोणतीही घटना झाली नाही. मुख्य बाब म्हणजे झिम्बाब्वे त्यांचा पूर्ण दौरा सुरूठेवणार असून नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी अखेरचा वन-डे सामना खेळणार आहे.’’अकबर यांनी पहिल्या ४ सामन्यांप्रमाणेच अखेरच्या सामन्याचीही सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे सांगितले. रिक्षात झालेल्या स्फोटामुळे उपनिरीक्षकासह कमीत कमी ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाल्याचे पंजाब पोलीसचे उपमहानिरीक्षक डॉ. हैदर अशरफ यांनी सांगितले. पंजाब पोलीसांच्या सूत्रांनुसार, रिक्षात झालेला स्फोट लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आला होता. कारण, त्याचा फायदा अन्य एक दहशवादी घेण्याच्या विचारात होता; परंतु सुरक्षा इतकी मजबूत होती, की गद्दाफी स्टेडियमच्या चहू बाजूला तो भेदू शकला नाही आणि तो मारला गेला. अशरफ म्हणाले, स्फोट स्टेडियमच्या एक किलोमीटर अंतरावर झाला आणि त्यानंतर भयावह वातावरण निर्माण झाले होते. पोलीस कर्मचारी आणि रेंजर्स परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत आणि आम्ही प्रकरणाचा तपास करीत आहोत आणि घटनास्थळी साक्षी गोळा करीत आहोत. मार्च २००९ मध्ये लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवरही दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ६ पोलीस कर्मचारी आणि एक व्हॅन ड्रायव्हरचे निधन झाले होते. या घटनेनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा झिम्बाब्वे हा कसोटी खेळणारा पहिलाच संघ आहे.