शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीसाठी हे वर्ष थोडी खुशी, थोडा गम

By admin | Updated: December 24, 2015 23:48 IST

पुरुष आणि हॉकी संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे वर्ष भारतासाठी ‘यादगार’ ठरले असले तरी मैदानाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे हे वर्ष डागाळले गेले आहे

‘प्रतिभा’ ही १९४४ सालची कलाकृती पाहताना आजही ती खिळवून ठेवते हे जाणवले. केवळ चित्रपट अभ्यासक नव्हे, तर सर्वसामान्य रसिकही त्याला दाद देत होते. यंदाच्या ‘किफ’मधील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हाच वाटला. तर ‘वुंब,’ ‘द अटॅक’सारख्या कलाकृती असणारे कॅलिडोस्कोप या पॅकेजने रसिक मने उजळून निघाली. त्यातीलच ‘टुरिस्ट’ (स्वीडन) ही आणखी एक युनिक कलाकृती. कधी-कधी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनाही नातेसंबंधास अस्थिर करू शकतात. हे अगदी सर्वसाधारण लयीतच ‘लाईफ अ‍ॅज इट इज’ उलगडत राहते.चांगल्या जाणिवांनी उजळलेल्या मनात ख्रिसमस असो वा ईद / दिवाळी. उत्सव निरंतर सुरूच राहतो. चांगले चित्रपट पाहताना रजतपटच नव्हे, तर रसिक मनेही उजळून निघतात, तेव्हा नाताळ दरम्यान येणारा ‘किफ’ हा रसिकधर्मींना ‘ख्रिसमस’च वाटला, तर नवल नाही !‘ओरिजिन’ या साध्या, सरळ, सहजसुंदर नॉनफिक्शन लघुपटात बाळाचा जन्म होतानाची प्रसूतिगृहाबाहेरील नातेवाइकांची लगबग आणि कुतूहल त्याच्या भोवतालासह टिपले आहे. गंमत म्हणजे जन्मास येऊ घातलेल्या बाळाच्या बापानेच म्हणजे मयूर कुलकर्णीने हा लघुपट बनविला आहे. ‘एक्स्प्रेशन रॅदर दॅन इंप्रेशन’ या सूत्रास साजेशा या लघुपटामध्ये फिल्मीपणाचा लवलेशही नाही आणि उगाच आशयगर्भतेचा अभिनिवेशही नाही! ‘किफ’च्या अस्पर्धात्मक विभागात हा लघुपट दाखविला गेला.‘शूऽऽऽ गर्ल्स डोंट स्क्रीम’ या इराणच्या कलाकृतीमध्ये बाललैंगिक शोषणाची समस्या तरल संवेदनशीलतेने पण तीक्ष्णतेने मांडली आहे. पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांची, लहान मुलींचीही होणारी घुसमट हे पूरक आशयसूत्रही आहेच. हीच समस्या मराठीत किती स्थूल, बटबटीतपणे मांडली जाते याचे उदाहरण म्हणजे ‘द सायलेन्स!’ अर्थात ‘...गर्ल्स...’मध्ये सर्वांत शेवटी मन बधिर करणारा अप्रत्यक्षपणे सुचविलेला भाग झाल्यानंतर मुलींचे प्रसन्नदायी चेहरे आता ‘चुप्पी तोडो’ स्वीकारल्याचा आश्वासक भावही रसिकांपर्यंत पोहोचवितात.सेक्स, ड्रग्ज अ‍ॅँड टॅक्सेशन (डेन्मार्क) हादेखील चरित्रपटच - टॅक्स चुकविण्याची नैतिक अशी भूमिका घेणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी आर्थिक सल्लागाराचा. त्याने पुढे प्रोगे्रस पक्षही काढला होता. आजच्या बोकाळणाऱ्या नवउदारमतवादी धोरणांच्या ओंगळवाण्या प्रवृत्तीचे हे तटस्थ चित्रीकरण आहे. वलयांकित करू पाहणाऱ्या ‘गुरू’मध्ये मात्र अशी तटस्थता मणिरत्नमला राखता आली नव्हती. व्यक्तिवाद आणि समाजवाद या दोहोंतील कोणतेच चांगले गुण नसणाऱ्या चंगळवादाचे ते प्रतीक!कंट्री फोकस मेक्सिको पॅकेजमधील ‘टाइम टू डाय’ हा वेस्टर्न विधेतील चित्रपट. मुळात वेस्टर्न हा ‘बळी तो कान पिळी’ या अमेरिकन प्रवृत्तीतून निष्पन्न विधाप्रकार. मेक्सिकोमध्ये मात्र तो विविध छटेतून वापरला जातो. त्यामुळे शिक्षा भोगून आल्यानंतर नायक येथे बंदुकीचा वापर करणे आव्हान मिळूनदेखील टाळतो; पण भूतकाळाचे ओझे त्याला टाळता येत नाही. तो मारला जातो तेव्हा फ्रेममध्ये येणारा येशूचा क्रॉस रूपकात्मकतेने कथेच्या पल्याड आशयाला कवेत घेतो.युगोस्लाव्हियाची शकले झाल्यानंतर निर्माण झालेल्या या यादवीग्रस्त भागातील बोस्निया, सर्बिया आणि चिमुकल्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेले चित्रपट हा मन उजळून टाकणारा अनुभव असतो. ‘लगान’ला नमवून आॅस्कर विजेता ठरलेला ‘नो मॅन्स लॅँड’ (बोस्निया) हे त्याचे उदाहरण. तेव्हा ‘फास्सिफिकेटर’ (सर्बिया) मध्ये बनावट पदव्या देणाऱ्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाची कथा सांगितली आहे. तो हे काम पैशासाठी व स्वार्थासाठी करीत नाही. केवळ परिस्थितीमुळे अनेकांना शाळेत जाण्याची संधीच मिळत नाही. तेव्हा केवळ त्यामुळे त्यांना पदवीचा अभाव अडथळा ठरू नये. यासाठी तो हे काम करीत असतो. या कारणामुळे त्याला तुरुंगात जावे लागते. तेथील कैदी हे पूर्वीच्या युगोस्लाव्हियामधील बहुविविधतेचे प्रतिनिधित्व करतात. ‘द किड्स फ्रॉम मार्क्स अ‍ॅँड एंगेल्स स्ट्रीट’ (मॉन्टेग्रो) मध्ये दोन भावांची कथा उलगडत असताना पार्श्वभूमीला असणाऱ्या देशात जागतिकीकरणाने झालेला कायापालट हाही एक वेगळा संदर्भ म्हणून महत्त्वाचा. स्टॅन्कोला वडिलांच्या खुनाचा सूड उगवायचाय; तर योजोला पहिला प्रणय अनुभवायचा आहे! एक शैलीदार चित्रपट तर ‘मदर आॅफ अस्फाल्ट’ (क्रोएशिया) ही आजची क्लोजिंग फिल्म असेल.किफनामाडॉ. अनमोल कोठाडिया