यूएस ओपन टेनिस : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
न्यूयॉर्क : डेन्मार्कची स्टार टेनिसपटू कॅरोलिन वोज्नियाकी हिने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आह़े पुरुष गटात स्वीत्ङरलडचा अनुभवी खेळाडू रॉजर फेडरर याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आह़े
स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाची अनुभवी खेळाडू मारिया शारापोव्हा हिला घरचा रस्ता दाखविणा:या वोज्नियाकी हिने स्पर्धेतील आपले विजयी अभियान कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला़ तिने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या सारा इराणीचे आव्हान 6-क्, 6-1 से मोडून काढल़े
17 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररने लौकिकास साजेसा खेळ करताना पुरुष एकेरी लढतीत स्पेनच्या रॉबटरे बोटिस्टा याच्यावर सरळ सेटमध्ये 6-4, 5-3, 6-2 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली़ या विजयासह फेडररचा आर्थर ऐश स्टेडियमवर आपल्या विजयाचा विक्रम 25-1 असा झाला आह़े
महिला गटातील अन्य लढतीत चीनच्या पेंग शुआई हिने स्वीत्ङरलडच्या बेलिंडा बेनिसिस हिचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करीत स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली़ 28 वर्षीय शुआई हिने आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर बेनसिसला अवघ्या 64 मिनिटांत घरचा रस्ता दाखविला़ शुआई पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली आह़े
पुरुष गटातील ङोक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिचने 2क् वर्षीय ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमला 6-1, 6-2, 6-4 अशी धूळ चारत चौथ्या फेरीत विजय मिळविला़ फ्रान्सच्या गाएल मोफिल्स याने बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हवर 7-5, 7-6, 7-5 ने मात करीत स्पर्धेत आगेकूच केली़ याव्यतिरिक्त क्रोएशियाच्या मारिन सिलिच याने 26 वे मानांकनप्राप्त फ्रान्सच्या जाईल्स सिमोनवर 5-7, 7-6, 6-4, 3-6, 6-3 अशी सरशी साधत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़
दरम्यान, उपांत्यपूर्व फेरीत स्वीत्ङरलडच्या रॉजर फेडररचा सामना फ्रान्सच्या मोफिल्सशी होणार आह़े महिला गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात वोज्नियाकीसमोर चीनच्या शुआईचे आव्हान असणार आह़े (वृत्तसंस्था)