शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर

By admin | Updated: July 13, 2016 03:11 IST

अनुभवी यष्टिरक्षक दिनेश रामदीनला भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या विंडीज संघातून वगळले आहे

बासेटेरे : अनुभवी यष्टिरक्षक दिनेश रामदीनला भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या विंडीज संघातून वगळले आहे. मध्य फळीतील फलंदाज रोस्टन चेसला प्रथमच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. आॅफ स्पिनर चेस अलीकडेच भारताविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यात खेळला होता. त्यात त्याने केवळ दोन धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २९ सामन्यांत ४२.८७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गेल्या ११ वर्षांपासून विंडीज संघाचा सदस्य असलेल्या रामदीनने ७४ कसोटी सामने खेळताना २५.८७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्याने टिष्ट्वट केले होते की, त्याला संघातून वगळण्याची शक्यता आहे. डावखुरा फलंदाज लियोन जॉन्सनचे पुनरागमन झाले आहे, तर वेगवान गोलंदाज केमार रोचला वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज जेरोम टेलरही संघात नाही. कारण, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारीत असल्याचे बोर्डाला कळवले आहे. शेनोन गॅब्रियल संघात एकमेव स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहे, तर त्याची साथ देण्यासाठी अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट व कर्णधार जेसन होल्डर हे आहेत. पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून अ‍ॅन्टिग्वामध्ये खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)बासेटेरे : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाविरुद्ध आगामी २१ जुलैपासून प्रारंभ होत कसोटी मालिकेच्या निमित्ताने आमच्या अनुभव नसलेल्या संघापुढे कडवे आव्हान असल्याचे मत वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले आहे. होल्डर म्हणाला, ‘ही मालिका खडतर आहे. भारत जागतिक क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची फलंदाजी व गोलंदाजीची बाजू दमदार आहे. आमच्या युवा कसोटी संघासाठी ही मालिका म्हणजे मोठे आव्हान आहे. आमच्या खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा विशेष अनुभव नाही. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत असून, सांघिक कामगिरी करण्यासाठी आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. टिष्ट्वटरवर निराशा व्यक्त करणाऱ्या रामदीनवर कारवाई?सेन्ट जोन्स : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत संघातून वगळल्यामुळे टिष्ट्वटरवर नाराजी व्यक्त करणारा वेस्ट इंडिजाचा यष्टिरक्षक दिनेश रामदीनविरुद्ध विंडीज बोर्ड कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने म्हटले की, ‘माजी कर्णधाराची कृती नीतीच्या विरोधात आहे आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे, याबाबत मात्र बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आलेले नाही. रामदीनने गेल्या बुधवारी टिष्ट्वट केले होते की, त्याला संघातून वगळण्यात आले असून, त्यासाठी निवड समितीचे नवे अध्यक्ष कर्टन ब्राऊन जबाबदार आहेत. भारताविरुद्ध सराव सामन्यात खेळणार रोचसेन्ट किटस् : वेगवान गोलंदाज केमर रोचला पाहुण्या भारतीय संघाविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यात विंडीज अध्यक्ष एकादशमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत आणि डब्ल्यूआयसीबी संघांदरम्यान १४ जुलैपासून बासेटेरेमध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी विंडीजचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या रोचला सराव सामन्यात संधी देण्यात आली आहे. राष्ट्रीय संघातर्फे ३७ कसोटी सामने खेळणाऱ्या रोचला गेल्या डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर वगळण्यात आले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर विंडीज संघात स्थान मिळालेले नाही. सराव सामन्यासाठी निवड समितीने जाहीर केलेल्या १३ सदस्यांच्या संघात सहा बदल करण्यात आले. रोच व्यतिरिक्त जॉन कॅम्पबेल, राहकीम कोर्नवाल, जमार हॅमिल्टन, मोंटचिन हॉज, चेमार होल्डर आणि गुडाकेश मोटी यांचा समावेश करण्यात आला.