पॅरिस : स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यादरम्यान फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. वावरिंकाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव केला.अंतिम फेरी गाठणारा तो गेल्या ४४ वर्षांतील सर्वांत प्रौढ खेळाडू ठरला. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत वावरिंकाने मरेची झुंज ६-७, ६-३, ५-७, ७-६, ६-१ ने मोडून काढली.२०१५ च्या चॅम्पियनला आता ९ वेळचा विजेता राफेल नदाल आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पेनच्या राफेल नदालने दुसऱ्या उपांत्य लढतीत डोमिनिक थियेमचा ६-३,६-४,६-० ने पराभव केलो. दोन तास सात मिनिटेचाललेल्या या सामन्यात नदाल याने थीमवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये थियेमला एकही गुण मिळवता आला नाही.त्याआधी, अमेरिकन ओपन चॅम्पियन ३२ वर्षीय वावरिंकाने ४ तास ३४ मिनिट रंगलेल्या लढतीत सरशी साधली. वावरिंका चौथे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. निकी पिलिचनंतर रोला गॅरोवर अंतिम फेरी गाठणारा प्रौढ खेळाडू ठरला आहे. निकीने १९७३ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती.(वृत्तसंस्था)
वावरिंका-नदाल जेतेपदासाठी झुंजणार
By admin | Updated: June 10, 2017 04:42 IST