- अमोल मचाले, पुणे
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही ‘फिरकी’चे अस्त्र आपल्यावरच उलटल्यामुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला आॅस्ट्रेलियाकडून ३३३ धावांनी मानहानीजनक पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताचे तीन तेरा वाजले. विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर शनिवारी यजमानांचा दुसरा डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळून कांगारूंनी दिमाखदार विजयाची नोंद केली. या विजयासह सलग १९ सामन्यांत अपराजित राहण्याचा भारताचा अश्वमेध आॅस्ट्रेलियाने रोखला. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही स्टीव्ह ओकिफीने ३५ धावांत ६ बळी घेत भारतीय फलंदाजांना मान वर करण्याची संधीच दिली नाही. दोन्ही डावांत मिळून सामन्यात ७० धावांमध्ये १२ बळी घेणारा ओकिफी अर्थातच सामनावीर ठरला.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवरील पहिली कसोटी खेळपट्टीमुळे अविस्मरणीय ठरली. ३ दिवसांत सुमारे साडेसात सत्रांच्या खेळात दोन्ही संघांचे मिळून ४० फलंदाज बाद झाले. पहिल्या डावात १५५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्व बाद २८५ धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथने (१०९ धावा, २०२ चेंडू, ११ चौकार) शानदार शतक झळकावत आपला क्लास दाखवून दिला. झपकन वळणाऱ्या तसेच उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर त्याने टिच्चून फलंदाजी करीत साकारलेली ही खेळी भारतामध्ये विदेशी फलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक ठरली. त्याच्या या खेळीमुळेच कांगारूंनी फिरकीमय झालेल्या खेळपट्टीवर जवळपास अडीच दिवसांत ४४१ धावा करण्याचे अवघड आव्हान भारतासमोर ठेवले. भारतीय फलंदाजांचा दरारा बघता सामना जिंकला नाही, तरी तो रंगतदार होईल, अशी भाबडी आशा स्टेडियमवर जमलेल्या सुमारे १२ हजार प्रेक्षकांना होती. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही ओकिफी भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला. अनुभवी फिरकीपटू नाथन लिआॅनने ५३ धावांत ४ बळी घेत त्याला मोलाची साथ दिली. भारताचा दुसरा डाव ३३.५ षटकांत संपला. विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा घरच्या मैदानावर हा पहिलाच पराभव ठरला. या विजयासह ४ सामन्यांच्या गावसकर-बॉर्डर चषक मालिकेत आॅस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी ४ मार्चपासून बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे.चेतेश्वर पुजाराने (३१ धावा, ५८ चेंडू, २ चौकार) केलेला थोडाफार प्रतिकार वगळता भारताचा एकही फलंदाज आज लौकिकास जागला नाही. सलग ४ मालिकांमध्ये द्विशतके झळकावून विश्वविक्रम करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीकडून आज मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र, दुसऱ्या डावात पहिल्या डावापेक्षाही वाईट पद्धतीने बाद होत त्याने सपशेल निराशा केली. पहिल्या डावात भोपळाही फोडू न शकलेल्या कोहलीने दुसऱ्या डावात जेमतेम १३ धावा केल्या. ओकिफीचा गुडलेंग्थच्या आसपास आॅफ स्टंपच्या दिशेत पडलेला चेंडू सोडून देण्याची बेफिकिरी कोहलीला नडली. या चेंडूने त्याचा आॅफ स्टंप जमीनदोस्त करताच १७व्या षटकामध्ये आॅस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला होता. विजयासाठी ४४१ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला पाचव्याच षटकात पहिला धक्का बसला. ओकिफीने विजयला (०) पायचित पकडले. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा के. एल. राहुलची विकेट लिआॅनने काढत भारताची अवस्था २ बाद १६ अशी केली. कोहली बाद झाल्यानंतर रहाणे-पुजारा जोडीनेच काय तो थोडाफार तग धरला. तत्पूर्वी, कालच्या ४ बाद १४३ वरून पुढे खेळणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज ८७ षटकांत २८५ धावांमध्ये आटोपला. स्मिथने कारकिर्दीतील १८वे शतक झळकावले. पहिल्या डावात आक्रमक अर्धशतक ठोकणाऱ्या मिशेल मार्शने दुसऱ्या डावातही तोच कित्ता गिरवला. आश्विनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने ३१ चेंडूंंत ३० धावा फटकावताना ३ षटकार आणि २ चौकार लगावले. भारतातर्फे आश्विनने ४, उमेश यादवने ३, तर जडेजाने २ गडी बाद केले. उर्वरित १ बळी जयंत यादवने घेतला. नंबर गेम...212 घरच्या मैदानावर एका सामन्यात भारताने २० फलंदाजांच्या मोबदल्यात काढलेल्या सर्वांत कमी धावा.घरच्या मैदानावर एका कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून सर्वांत कमी केवळ ७४ षटके भारतीय संघाने खेळले. 333 धावांनी घरच्या मैदानावर झालेला भारतीयांचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पराभव.2012मध्ये भारताने घरच्या मैदानावर (इंग्लंडविरुद्ध) अखेरचा पराभव स्वीकारला होता. त्यानंतर सलग २० सामन्यांत भारतीय संघ अपराजित होता.पुण्यात विजय मिळविण्याआधी आॅस्टे्रलियाने भारतात सलग ७ पराभव स्वीकारले होते. १२/७०, स्टीव्ह ओकिफी भारतीय भूमीवर सर्वोत्तम कामगिरी करणारा परदेशी गोलंदाज ठरला.याआधी केवळ १९९३मध्ये आॅस्टे्रलियाच्या फिरकी जोडीने प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळले होते. भारताचे १३ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद. के. एल. राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनाच दोन्ही डावांत दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले.या सामन्यात एकूण १३ पायचीतचे बळी ठरले. याआधी इडन गार्डन्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक १५ पायचीतचे बळी गेले होते.भारताविरुद्ध सलग ५ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके झळकावण्याचा पराक्रम स्टीव्ह स्मिथने केला. याआधी त्याने २०१४-१५मध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील सर्व ४ सामन्यांत शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर, भारतात शतक ठोकणारा तो आठवा आॅसी कर्णधार बनला.पुण्यात आॅस्ट्रेलिया अपराजितपुण्यामध्ये यजमान भारतीय संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नसली तरी, आॅस्ट्रेलिया संघाने या कसोटीत भारताला धूळ चारून पुण्यात अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली. पाहुण्यांचा हा पुण्यातील सलग चौथा विजय ठरला. या कसोटीपूर्वी पुण्यात आॅस्ट्रेलियाने खेळलेले तिन्ही एकदिवसीय सामने जिंकले आहेत. 3कसोटीत धावांच्या फरकाने भारताचा आॅस्ट्रेलियाविरूद्ध हा तिसरा मोठा पराभव ठरला. याआधी भारतीय संघ २००४मध्ये नागपूरला ३४२ धावांनी, तर २००७मध्ये मेलबोर्न येथे ३३७ धावांनी पराभूत झाला होता. 2015 नंतर प्रथमच भारताने कसोटीत पराभवाची चव चाखली. यापूर्वी २०१५मध्ये गॉल कसोटीत श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते. त्यानंतर १९ सामन्यांत १६ विजय आणि ३ अनिर्णित, अशी प्रभावी कामगिरी भारताने केली होती.16 फलंदाज दोन्ही संघांचे मिळून तिसऱ्या दिवशी बाद झाले. यापैकी वेगवान गोलंदाज उमेश यादवने आॅस्ट्रेलियाच्या घेतलेल्या २ बळींचा अपवाद वगळता उर्वरित १३ फलंदाज फिरकीचे शिकार ठरले. धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव २६०भारत : पहिला डाव : १०५.आॅस्ट्रेलिया : दुसरा डाव (कालच्या ४ बाद १४३ वरून पुढे) : स्मिथ पायचित गो. जडेजा १०९, मिशेल मार्श झे. साहा गो. जडेजा ३१, वेड झे. साहा गो. उमेश यादव २०, मिशेल स्टार्क झे. राहुल गो. जडेजा ३०, ओकिफी झे. साहा गो. जडेजा ६, लिआॅन पायचित गो. उमेश यादव १३, हेजलवूड नाबाद २. अवांतर : १४. एकूण : ८७ षटकांत सर्व बाद २८५. गोलंदाजी : आश्विन २८-३-११९-४. जडेजा ३३-१०-६५-३. उमेश यादव १३-१-३९-२. जयंत यादव १०-१-४३-१. इशांत ३-०-६-०.भारत : दुसरा डाव : विजय पायचित गो. ओकिफी २, राहुल पायचित गो. लिआॅन १०, पुजारा पायचित गो. ओकिफी ३१, कोहली त्रि. गो. ओकिफी १३, रहाणे झे. लिआॅन गो. ओकिफी १८, अश्विन पायचित गो. ओकिफी ८, साहा पायचित गो. ओकिफ ५, जडेजा त्रि.गो. लिआॅन ३, जयंत यादव झे. वेड गो. लिआॅन ५, ईशांत झे. वॉर्नर गो. लिआॅन ०, उमेश यादव नाबाद ०. अवांतर : १२. एकूण : ३३.५ षटकांत सर्व बाद १०७. गडी बाद क्रम : १-१० (विजय), २-१६ (राहुल), ३-४७ (कोहली), ४-७७ (रहाणे), ५-८९ (आश्विन), ६-९९ (साहा), ७-१०० (पुजारा), ८-१०२ (जडेजा), ९-१०२ (ईशांत), १०-१०७ (जयंत यादव). गोलंदाजी : मिशेल स्टार्क २-२-०-०. लिआॅन १४.५-२-५३-४. ओकिफी १५-४-३५-६. हेजलवूड २-०-७-०. नंबर गेम...212 घरच्या मैदानावर एका सामन्यात भारताने २० फलंदाजांच्या मोबदल्यात काढलेल्या सर्वांत कमी धावा.घरच्या मैदानावर एका कसोटी सामन्यात दोन्ही डाव मिळून सर्वांत कमी केवळ ७४ षटके भारतीय संघाने खेळले. 333 धावांनी घरच्या मैदानावर झालेला भारतीयांचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पराभव.2012मध्ये भारताने घरच्या मैदानावर (इंग्लंडविरुद्ध) अखेरचा पराभव स्वीकारला होता. त्यानंतर सलग २० सामन्यांत भारतीय संघ अपराजित होता.पुण्यात विजय मिळविण्याआधी आॅस्टे्रलियाने भारतात सलग ७ पराभव स्वीकारले होते. १२/७०, स्टीव्ह ओकिफी भारतीय भूमीवर सर्वोत्तम कामगिरी करणारा परदेशी गोलंदाज ठरला.याआधी केवळ १९९३मध्ये आॅस्टे्रलियाच्या फिरकी जोडीने प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळले होते. भारताचे १३ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद. के. एल. राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनाच दोन्ही डावांत दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले.या सामन्यात एकूण १३ पायचीतचे बळी ठरले. याआधी इडन गार्डन्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक १५ पायचीतचे बळी गेले होते.भारताविरुद्ध सलग ५ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके झळकावण्याचा पराक्रम स्टीव्ह स्मिथने केला. याआधी त्याने २०१४-१५मध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील सर्व ४ सामन्यांत शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर, भारतात शतक ठोकणारा तो आठवा आॅसी कर्णधार बनला.पुण्यात आॅस्ट्रेलिया अपराजितपुण्यामध्ये यजमान भारतीय संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नसली तरी, आॅस्ट्रेलिया संघाने या कसोटीत भारताला धूळ चारून पुण्यात अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली. पाहुण्यांचा हा पुण्यातील सलग चौथा विजय ठरला. या कसोटीपूर्वी पुण्यात आॅस्ट्रेलियाने खेळलेले तिन्ही एकदिवसीय सामने जिंकले आहेत. 3कसोटीत धावांच्या फरकाने भारताचा आॅस्ट्रेलियाविरूद्ध हा तिसरा मोठा पराभव ठरला. याआधी भारतीय संघ २००४मध्ये नागपूरला ३४२ धावांनी, तर २००७मध्ये मेलबोर्न येथे ३३७ धावांनी पराभूत झाला होता. 2015 नंतर प्रथमच भारताने कसोटीत पराभवाची चव चाखली. यापूर्वी २०१५मध्ये गॉल कसोटीत श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते. त्यानंतर १९ सामन्यांत १६ विजय आणि ३ अनिर्णित, अशी प्रभावी कामगिरी भारताने केली होती.16 फलंदाज दोन्ही संघांचे मिळून तिसऱ्या दिवशी बाद झाले. यापैकी वेगवान गोलंदाज उमेश यादवने आॅस्ट्रेलियाच्या घेतलेल्या २ बळींचा अपवाद वगळता उर्वरित १३ फलंदाज फिरकीचे शिकार ठरले. सामनावीर : स्टीव्ह ओकिफी (सामन्यामध्ये ७० धावांत १२ बळी)