शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुणवान युवा खेळाडूंना मिळाले उत्कृष्ट व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 02:02 IST

खेलो इंडिया शालेय तसेच महाविद्यालयीन स्पर्धांनी अशीच अपेक्षा जागवली आहे.

- धनराज पिल्लेखेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा युवा खेळाडूंसाठी आॅलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद,आशियाई स्पर्धा आणि राष्टÑकुल स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी आहे. यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकारणाचे अभिनंदन करतो. अमेरिकेत महाविद्यालयीन स्पर्धा मोठी स्पर्धात्मक असते. एनसीएएद्वारा निर्धारित महाविद्यालयांमध्ये युवा खेळाडूंच्या सरावासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केली जाते. टेनिसपटू सोमदेव देवबर्मन हा याच स्पर्धेतील शोध आहे, खेलो इंडिया शालेय तसेच महाविद्यालयीन स्पर्धांनी अशीच अपेक्षा जागवली आहे.वैयक्तिक सांगायचे तर गुजरातच्या शाळांमध्ये अनन्य साधारण हॉकी गुणवत्ता उपलब्ध आहेत. अशा युवा खेळाडूंना अधिक संधीची गरज आहे. या दिशेने खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा चांगली सुरुवात आहे. या स्पर्धेत १७ क्रीडा प्रकारात ४००० खेळाडू सहभागी झाले आहेत.धावपटू द्युतीचंद हिने वेगळी छाप सोडली. मी अनेक शहरांमधील शाळांमध्ये खेळाची लोकप्रियता अनुभवली आहे. मात्र शालेय स्तावर चमक दाखविणारे खेळाडू महाविद्यालयापर्यंतच्या वाटचालीत टिकत नाहीत. त्यांच्यापुढे मर्यादित संधी असल्याने असे होत असावे. जे क्लबसाठी खेळतात तेच यात ताळमेळ साधू शकतात. अन्य खेळाडू मात्र खेळापासून दुरावतात. या खेळांच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट कोचिंग, सुविधा आणि प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.या आगळ्यावेग़ळ्या आयोजनाद्वारे २०२४ आणि २०२८ च्या आॅलिम्पिक पदक तालिकेत मागच्या सर्व आयोजनांच्या तुलनेत भारत अधिक चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही.खेळातील आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी इतकेच सांगू शकतो की भारतीय खेळाडू देशासाठी पदक आणि गौरव जिंकतील तो दिवस आता दूर नाही.(पद्मश्री धनराज पिल्ले चार वेळेचे आॅलिम्पियन खेळाडू असून १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण विजेते हॉकीपटू आहेत.)