मुंबई : मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने २० आणि २१ जून या दोन दिवशी मुंबई सुपर लीग (एमएसएल) या टेबल टेनिस स्पर्धेचा धमाका होणार आहे. एकूण ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मुंबईकर खेळाडूंचा सहभाग असल्याने स्पर्धेची चुरस शिगेला पोहचली आहे.मुंबईतील खार जिमखाना येथे पार पडणारी ही स्पर्धा साखळी व बाद फेरीनुसार होईल. स्पर्धा दोन गटात विभागली असून प्रत्येक गटात प्रत्येकी ४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.प्रत्येक संघात सहा खेळाडूंचा समावेश असून यामध्ये कॅडेट मुले, ज्यूनियर मुले-मुली, पुरुष, महिला व वेटरन्स गटातील खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक सामना हा एकूण ९ लढतींचा असेल, ज्यामध्ये वेटरन्स एकेरी, पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी (ज्यू.), कॅडेट मुले एकेरी, मिश्र दुहेरी (पुरुष व महिला), ज्यूनियर मुली केरी, दुहेरी (पुरुष व वेटरन्स) आणि ज्यूनियर मुले एकेरी या लढती रंगतील. या स्पर्धेसाठी सनील शेट्टी आणि अमन बालगू या भारताच्या व महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली. हे दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे कूल स्मॅशर्स आणि मुंबई टायटन्स या संघामध्ये निवड झाली आहे. प्रत्येक संघमालकाला खेळाडूंना करारबध्द करण्यासाठी एक हजार युनिट्सची मर्यादा देण्यात आली होती.राष्ट्रीय क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सनीलला कूल स्मॅशर्सने ३८० युनिट्स खर्च करुन आपल्या संघात घेतले. त्याच युनिट्समध्ये मुंबई टायटन्सने अमनला आपल्या संघात समाविष्ट केले. त्याचप्रमाणे अनुभवी रवींद्र कोटीयनला सुप्रीम फायटर्सने ३५० युनिट्स खर्च करुन करारबध्द केले. महिलांमध्ये राष्ट्रीय उपविजेती युवा चार्वी कावळेसाठी सर्वाधिक बोली लागली. सेंच्युरी वॉरीयर्सने ३०० युनिट्स खर्च करुन तीला आपल्या चमूमध्ये समाविष्ट केले. सेन्होरा डीसूझा (२८० युनिट्स) व श्रुष्टी हेलंगडी (३१० युनिट्स) या कसलेल्या खेळाडूंना अनुक्रमे मुंबई टायटन्स व हाय टाइड संघांनी करारबध्द केले.४० खेळाडूंसाठी बोली लागलेल्या या स्पर्धेत अव्वल ज्यूनियर खेळाडू शुभम आंब्रेला धक्कादायकरीत्या सर्वात कमी १७० युनिट्समध्ये एस संघाने करारबध्द केले. मानसी चिपळुणकरला २७० युनिट्सच्या बोलीवर ब्लॉक बस्टर्स संघाने आपल्या संघात समाविष्ट केले.स्पर्धेतील संघ : ‘एस’ - शुभम आंब्रे (पुरुष), आश्लेषा त्रेहान (महिला), जिग्नेश रहाटवाल (ज्यूनियर), आदिती सिन्हा (ज्यूनियर), जश मोदी (कॅडेट), प्रकाश केळकर (वेटरन्स) आणि तरुण गुप्ता (प्रशिक्षक).‘ब्लॉक बस्टर्स’ - निशांत कुलकर्णी (पुरुष), श्वेता पार्टे (महिला), ॠत्विक पंडीरकर (ज्यूनियर), मानसी चिपळूणकर (ज्यूनियर), अर्णव कर्णवार (कॅडेट), अनिल रसम (वेटरन्स) आणि गणदीप भिवंडकर (प्रशिक्षक).‘सेंच्युरी वॉरियर्स’ - ऱ्हीस अल्बुक्वेर्क्यू (पुरुष), चार्वी कावळे (महिला), शौर्या पेडणेकर (ज्यूनियर), प्रांजल शिंदे (ज्यूनियर), ध्रुव दास (कॅडेट), कपिल कुमार (वेटरन्स), नरेंद्र चिपळूणकर (प्रशिक्षक).‘हाय टाइड’ - हर्ष मणियार (पुरुष), मृण्मयी म्हात्रे (महिला), मंदार हर्डीकर (ज्यूनियर), श्रुष्टी हेलंगडी (ज्यूनियर), राजवीर शाह (कॅडेट), योगेश देसाई (वेटरन्स) आणि गुरुचरण सिम्ग गिल (प्रशिक्षक).‘किंग पाँग’ - ओमकार तोरगळकर (पुरुष), दिव्या महाजन (महिला), मुदीत दाणी (ज्यूनियर), तन्विता ठाकूर (ज्यूनियर), समीहान कुलकर्णी (कॅडेड), दीपक दुधाणे (वेटरन्स) आणि महेंद्र चिपळूणकर (प्रशिक्षक).‘कूल स्मॅशर्स’ - सनील शेट्टी (पुरुष), संजना चौधरी (महिला), अश्विन सुब्रमनियम (ज्यूनियर), अंतरा जग्गी (ज्यूनियर), मयुरेश शिंदे (कॅडेट), दिनकर सेलार्का (वेटरन्स) आणि सुबोध गोरेगावकर (प्रशिक्षक).‘मुंबई टायटन्स’ - अमन बालगू (पुरुष), सेन्होरा डीसूझा (महिला), श्याम पुरोहित (ज्यूनियर), विधी धूत (ज्यूनियर), मैनक निस्ताला (कॅडेट), किरण सलियन (वेटरन्स) आणि सचिन शेट्टी (प्रशिक्षक).‘सुप्रीम फायटर्स’ - रवींद्र कोटीयन (पुरुष), द्युती पत्की (महिला), पार्थव केळकर (ज्यूनियर), मनुश्री पाटील (ज्यूनियर), टी. के. श्रीकांत (कॅडेट), सुहास कुलकर्णी (वेटरन्स) आणि वैभव पवार (प्रशिक्षक).
मुंबईमध्ये टेबल टेनिसची धूम रंगणार
By admin | Updated: June 17, 2015 01:50 IST