शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

By admin | Updated: June 22, 2016 20:33 IST

जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे

शिवाजी गोरे

पुणे, दि. 22 - जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे. आता प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळणार आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी संपूर्ण संघ आतुर असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने व्यक्त केला. बंगळुरू येथील साई सेंटर येथे सध्या भारतीय हॉकी संघाचा सराव सुरू आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सरदार सिंग याने लोकमतशी संवाद साधला. सरदार म्हणाला,  मार्गदर्शक रोलंट ओल्टमन्स प्रत्येक खेळाडूची जातीने तयारी करून घेत आहेत. युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या मनातील भीती घालविणे. उणिवा व चुकांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. दीड महिन्यावर आॅलिम्पिक स्पर्धा आली आहे. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आपल्या संघाने बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले. पेनल्टी शूटआऊटमध्ये आपल्याला रौप्यपदक मिळाले, हा एक इतिहासच आहे. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत कधीच प्रवेश केला नव्हता. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या गटात असलेल्या इतर संघांची सध्या कामगिरी आणि आपली तयारी याबाबत काय सांगाल?जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाला आपल्या संघाने अंतिम लढती शेवटपर्यंत झुंजवले. यावरून तुम्ही अंदाज करू शकता, की आपल्या संघाची तयारी कशी सुरू असेल. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. ओल्टमन्स यांचे संघाच्या कामगिरी सुधारण्याबाबतचे प्रयोग उपयोगात येत आहेत. त्यांनी संघातील खेळाडूंच्या शैलीत चांगलाच बदल घडवून आणला आहे. कॅनडासारखा संघ आपल्या गटात असला तरी आम्ही त्या संघाला कमी लेखणार नाही. प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळावा लागणार आहे. प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना आम्हाला एक वेगळे नियोजन करावे लागणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कोणतेही दडपण न घेता मनमोकळेपणाने खेळावे, असे त्यांचे म्हणणे असते. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध, दुसरा जर्मनी, तिसरा अर्जेंटिना, चौथा नेदरलॅँड आणि पाचवा कॅनडा त्यामुळे आम्ही जे काही गुण संपादन करायचे आहेत, ते पहिल्या चार लढतींमध्ये करावे लगणार आहेत.

संघाच्या प्रशिक्षणात कशावर भर दिला जात आहे?तंदुरुस्ती (फिटनेस), तंत्र (टेक्निक), चपळता, लाँग व शॉर्ट पासिंग यावर ओल्टमन्स यांचा जास्त भर असतो. आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी एकमेकांमध्ये समन्वय कसा साधायचा, यावर विशेष लक्ष दिले जात आहे. चॅम्पियन्स चषकातील चुका आम्हाला सुधाराव्या लागतील. आपण पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झालो. व्हिडिओ पंचांनी काहीही निर्णय देऊ द्यात, आम्हाला नक्कीच सुधारणा करावी लागणार आहे. हरमनप्रीत, रघुनाथ, उथप्पा, सुनील, सुरेंद्र, मनप्रीत यांच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे. चॅम्पियन्स चषकच्या अंतिम लढतीत श्रीजेशचे गोलरक्षण थक्क करणारे होते. पण तरीही प्रत्येक सामन्याच्या वेळी कोणाचा कसा खेळ होतो, हे महत्त्वाचे असते. ओल्टमन्स खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देतात. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, याकडे त्यांचे लक्ष असते. एकूण सराव आणि सध्या संघाची कामगिरी पाहता मी एवढेच सांगू शकतो, की आम्ही या वेळी आमच्या चाहत्यांना नाराज करणार नाही. 

आपल्या ब गटात जर्मनी, अर्जेंटिना, आयर्लंड, नेदरलँड आणि कॅनडा हे संघ आहेत. या वर्षीपासून प्रत्येक गटातील चार संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील. त्यामुळे आम्हाला आमच्या गटात पहिल्या चार क्रमांकांमध्ये येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण विरुद्ध संघाच्या उणिवा शोधून रणनीती आखत असतो. त्याचप्रमाणे समोरच्या संघाचे खेळाडू व मार्गदर्शक नियोजन करीत असतात. त्यामुळे आपले खेळाडू आपल्या मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक सामन्यात खेळ त्या वेळी मैदानावर होईल तो महत्त्वाचा.युवा खेळाडूंना संधीसाठीच मला विश्रांतीपुढील काळात मला सातत्याने सामने खेळायचे आहेत, त्याचबरोबर संघातील युवा खेळाडूंना बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळावा, यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मला विश्रांती दिली गेली, असे सरदार सिंगने सांगितले.