राष्ट्रीय फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस प्रारंभ
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
नाशिक : ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ५व्या सब-ज्यूनियर, ज्यूनियर, व सिनियर फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून उत्साहात प्रारंभ झाला .
राष्ट्रीय फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस प्रारंभ
नाशिक : ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ५व्या सब-ज्यूनियर, ज्यूनियर, व सिनियर फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून उत्साहात प्रारंभ झाला . पंचवटीतील येथील विभागीय क्र ीडा संकुलाच्या मैदानावर या स्पर्धा होत असून, या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा हस्ते कीक मारून झाले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी हे होते. यावेळी ऑल इंडिया फुटबॉल टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष राम अवतार, महाराष्ट्र फुटबॉल टेनिस असोसिएशनचे सचिव भीमराव बालागे, कोशाध्यक्ष इकबाल शेख, सुरेश पाटील, शिवकुमार पाटील, प्रकाश कोल्हे, उत्तम उघाडे आदि उपस्थित होते़ या राष्ट्रीय स्पर्धेत २० राज्यांच्या ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे़. फुटबॉल टेनिस या खेळाला २०१० पासून भारतीय शालेय खेळ महासंघाची मान्यता असून, नियमित या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे.