नवी दिल्ली: रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाची टिप्पणी अपमानास्पद नव्हती, अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली आहे़ सचिन म्हणाला, मारिया क्रिकेट पाहत नाही त्यामुळे ती मला ओळखत नाही़ शारापोव्हाने जेव्हा विम्बल्डनमधील सामन्यानंतर वार्तालापप्रसंगी बोलताना सचिन तेंडुलकर कोण आहे, असा तिने सवाल केल्यानंतर तेंडुलकरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कडवी प्रतिक्रिया नोंदविली होती़ तेंडुलकर विम्बल्डनदरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉससोबत रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होता़
शारापोव्हाची टिप्पणी अपमानास्पद नव्हती : सचिन
By admin | Updated: July 23, 2014 11:02 IST