कोल्हापूर : राजा पंढरी चषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी शाहूपुरी जिमखाना संघाने परफेक्ट वन अकॅडमीवर, तर एसफोरए टायगर्सने के.एस.ए. संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. शाहूपुरी जिमखाना मैदान येथे शाहूपुरी जिमखाना विरुद्ध परफेक्ट वन अकॅडमी यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाने ५ बाद २७८ धावा केल्या. यामध्ये शॉन रॉड्रीक्सने १४२ धावांचा पाऊस पाडला. तर अमान हरचिरकरने ६६ धावा केल्या. गोलंदाजी करताना परफेक्ट वनकडून पी. देठे याने ३५ धावांत २ बळी, एस. कोंडाळकरने ४४ धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना परफेक्ट वन अकॅडमीचा संघ सर्वबाद ९५ धावांत गुंडाळला. गोलंदाजी करताना शाहूपुरीकडून अमान हरचिरकरने १३ धावांत दोन बळी, शुभम साळोखेने ९ धावांत दोन बळी घेतले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर शाहूपुरी जिमखाना संघाने हा सामना १८३ धावांनी जिंकला. दुसरा सामना शास्त्रीनगर मैदान येथे एसफोरए टायगर्स विरुद्ध के.एस.ए. यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना एसफोरए टायगर्सने ३५ षटकांत १६६ धावा केल्या. यामध्ये प्रसाद पाटीलने ५६ धावा केल्या. गोलंदाजी करताना के.एस.ए.कडून विश्वनील मोरेने ३३ धावांत तीन बळी घेतले. उत्तरादाखल के.एस.ए. संघाला केवळ सर्वबाद ८० धावा करता आल्या. यामुळे सामना एसफोरए टायगर्सने जिंकला. गोलंदाजी करताना एसफोरए कडून पवन धनताडे याने ५ बळी घेतले. -----------------फोटो : १२ कोल- अमान हरचिरकर (सिंगल)फोटो : १२ कोल- प्रथमेश पाटील (सिंगल)फोटो : १२ कोल- शॉन रॉड्रीक्स (सिंगल )
शाहूपुरी जिमखाना, एसफोरए टायगर्स उपांत्य फेरीत
By admin | Updated: May 13, 2014 06:20 IST