शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

भारतीय संघाची निवड आज

By admin | Updated: November 2, 2016 07:09 IST

इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज, बुधवारी करण्यात येणार आहे.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज, बुधवारी करण्यात येणार आहे. त्यात फिट वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे; पण सलामी जोडीची निवड करताना राष्ट्रीय निवड समितीला मात्र पुन्हा चर्चा करावी लागणार आहे. ‘बीसीसीआय’च्या सूत्रानी सांगितले की, भारतीय संघाची निवड बुधवारी मुंबईत करण्यात येणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला असला, तरी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीला पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड करताना काही बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि ईशांत शर्मा आजारी असल्यामुळे निवड समितीने अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व आॅफ स्पिनर जयंत यादव यांना कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पाचारण केले होते. गंभीरला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळाली नाही; पण कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर गंभीरला इंदूरमध्ये कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. धवनच्या स्थानी करुण नायरला संघात स्थान देण्यात आले होते; पण त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. जयंत यादवलाही दोन्ही कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले नाही. जर राहुल आणि धवन फिट असतील, तर निवड समिती पुन्हा एकदा गंभीरला स्थान देते का, याबाबत उत्सुकता आहे. गंभीरने इंदूरमध्ये दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. गंभीरने दिल्लीतर्फे ओडिशाविरुद्धच्या रणजी लढतीत १४७ धावांची खेळी केली होती. केएल राहुल व भुवनेश्वर कुमार दुखापग्रस्त झाल्यानंतर एकही सामना खेळलेले नाही. त्यांना आता मॅच फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. राहुल स्नायूच्या दुखापतीतून सावरत असून, भुवनेश्वरच्या टाचेला दुखापत झाली आहे. जोपर्यंत हे खेळाडू मॅच फिटनेस सिद्ध करीत नाहीत, तोपर्यंत त्यांची निवड होण्याची शक्यता कमी आहे. अशीच स्थिती बोटाच्या दुखापतीतून सावरत असलेल्या धवनबाबत आहे. दरम्यान, पाहुणा इंग्लंड संघ बुधवारी बांगलादेशहून भारतात दाखल होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले. ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंग्लंड संघ येथे सराव सामना खेळणार नसून पहिल्या कसोटी सामन्यासाठी राजकोटला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट क्लब आॅफ इंडियावर केवळ ५ नोव्हेंबर रोजी सराव सत्रात सहभागी होणार आहे.’ सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ‘सध्या निश्चित असलेल्या कार्यक्रमानुसार इंग्लंड संघ केवळ एका सराव सत्रात सहभागी होणार आहे. जर त्यांना अधिक सराव सत्राची गरज असेल, तर तशी व्यवस्था करण्यात येईल.’इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत. (वृत्तसंस्था)वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुनियातून सावरला असून, त्याचे पुनरागमन निश्चित आहे. त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती; पण त्याला मालिकेत एकही सामना खेळता आला नाही. त्यानंतर तो दोन रणजी सामने खेळला आणि ४० पेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील उर्वरित संघात विशेष बदल होण्याची शक्यता नाही.