शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

सलग दुस-या वर्षी सानिया ‘नंबर वन’

By admin | Updated: October 31, 2016 19:14 IST

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप करणार आहे. सानिया व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीला डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस डब्ल्यूटीए स्पर्धेत सानियाला जेतेपद राखता आले नाही. पण ताज्या डब्ल्यूटीए क्रमवारीत मात्र तिने अव्वल स्थान कायम राखले आहे. क्रमवारीतसलग दुस-या वर्षी महिला दुहेरीत अव्वल खेळाडू म्हणून ती वर्षाचा समारोप करणार आहे. गत चॅम्पियन सानिया-हिंगीस जोडीला उपांत्य फेरीत एकातेरिना माकारोव्हा व एलिना वेस्निना या जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सानियाच्यानावावर ८१३५ मानांकन गुणांची नोंद आहे. तिची माजी सहकारी हिंगीस वर्षाचा शेवट चौथ्या स्थानावरील खेळाडू म्हणून करणार आहे. हिंगीस व सानिया संयुक्तपणे अव्वल स्थानी होत्या. पण अलीकडेच हिंगीसची क्रमवारीत घसरण झाली. दुस-या स्थानी फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया व ख्रिस्टिना म्लोदेनोव्हिच आहेत. सानियाने टिष्ट्वटरवर अव्वल असल्याचा आनंद व्यक्त केला. सानिया म्हणाली, ‘सलग दुस-या वर्षी अव्वल स्थानी कायम राहणे सन्मानाची बाब आहे.’ सानियाने यंदा हिंगीसच्या साथीने आॅस्ट्रेलियन ओपन व बारबोरा स्ट्राइकोव्हाच्या साथीने सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत जेतेपद पटकावले. आॅगस्ट महिन्यात सानिया हिंगीसपासून वेगळी झाली आणि चेक प्रजासत्तकच्या बारबोरासोबत जोडी बनविली. पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना २२ व्या स्थानी कायम आहे, तर लिएंडर पेसची एका स्थानाने घसरण झाली असून, तो ५६ व्या स्थानी आहे. पुरुष एकेरीत साकेत मिनेनीने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १९३ व्या स्थानी आहे. अव्वल २०० खेळाडूंमध्ये तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला एकमेवखेळाडू आहे.