बेंगळुरू : युवराजच्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १६ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात चौथा विजय नोंदविला.रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने ४ बाद १८६ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणार्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव ७ बाद १७० धावांत रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे मयंक अग्रवाल (३१), केव्हिन पीटरसन (३३), जेपी ड्युमिनी (४८) आणि केदार जाधव (३७) यांनी संघर्षपूर्ण खेळ केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स :- क्विन्टन डिकॉक त्रि. गो. स्टार्क ०६, मुरली विजय पायचित गो. मुरलीधरन ०१, मयंक अग्रवाल झे. राणा गो. अहमद ३१, केव्हिन पीटरसन यष्टिचित पटेल गो. चहाल ३३, जेपी ड्युमिनी त्रि. गो. स्टार्क ४८, दिनेश कार्तिक झे. चहल गो. मुरलीधरन ०१, केदार जाधव धावबाद ३७, राहुल शुक्ला नाबाद ०२, मोहम्मद शमी नाबाद ०१. अवांतर (१०). एकूण २० षटकांत ७ बाद १७०. बाद क्रम : १-२, २-१०, ३-७३, ४-९७, ५-१०२, ६-१४७, ७-१६८. गोलंदाजी : मुरलीधरन ४-०-२५-२, स्टार्क ४-०-२६-२, अहमद ४-०-४०-१, चहल ४-०-४५-१, युवराजसिंग ४-०-२८-०.
युवराजच्या खेळीने बंगळुरुचा 'रॉयल' विजय
By admin | Updated: May 14, 2014 01:44 IST