शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

रॉयल चॅलेंजर्सही ‘प्ले आॅफ’मध्ये

By admin | Updated: May 18, 2015 03:24 IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी रविवारी आलेला पाऊस वरदान व शाप दोन्ही ठरला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे

बंगलोर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी रविवारी आलेला पाऊस वरदान व शाप दोन्ही ठरला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यामुळे बंगळुरू संघाचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चित झाला, पण गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावित थेट क्वालिफायर वनसाठी पात्र ठरण्याच्या त्यांच्या निर्धाराला मात्र धक्का बसला आहे.डेअरडेव्हिल्सने क्विंटन डिकॉक (६९) व कर्णधार जेपी ड्युमनी (नाबाद ६७) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ५ बाद १८७ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १.१ षटकात बिनबाद २ धावांची मजल मारली असता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर खेळ झाला नाही. पाऊस थांबल्यानंतर ७ वाजता खेळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अखेर पंचांनी ७ वाजून ४० मिनिटांना सामना रद्द करण्याची घोषणा केली. या निकालामुळे आरसीबीला एक गुण मिळाला. बंगळुरूच्या खात्यात एकूण १६ गुणांची नोंद असून प्ले आॅफमध्ये स्थान मिळवणारा आरसीबी तिसरा संघ ठरला.त्याआधी, क्विंटन डिकॉक व कर्णधार जेपी ड्युमिनी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ५ बाद १८७ धावांची दमदार मजल मारली. डिकॉकने ३९ चेंडूंना सामोरे जाताना ३ षट्कार व ९ चौकारांच्या साहाय्याने ६९ धावांची खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसोबत (२०) सलामीला ५५ धावांची भागीदारी केली. ड्युमिनीने ४३ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षट्कारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा फटकावल्या. नाणेफेक गमविल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या डेअरडेव्हिल्सला डिकॉक व अय्यर यांनी चांगली सुरुवात करून दिली. डिकॉकने आक्रमक पवित्रा स्वीकारताना हर्षलच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकले. त्यानंतर अशोक डिंडाच्या षटकातही दोन चौकार वसूल केले. अय्यरने डिंडाच्या गोलंदाजीवर चौकार व मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षट्कार ठोकला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला ५४ धावांची मजल मारून दिली. अय्यरचा अडथळा हर्षलने दूर केला. डिकॉकने डेव्हिड वाइसीच्या गोलंदाजीवर एक षट्कार व दोन चौकार वसूल करीत ३० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. संघाला शतकाची वेस ओलांडून दिल्यानंतर डिकॉक चाहलचे लक्ष्य ठरला. त्यानंतर कर्णधार ड्युमिनीने संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळताना चाहलच्या गोलंदाजीवर सलग दोन षट्कार वसूल केले. युवराज सिंगने (११) याच षटकात एक षट्कार ठोकला, पण त्यानंतरच्या चेंडूवर षट्कार ठोकण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. हर्षलने केदार जाधवला (०) बाद करीत दिल्ली संघाला चौथा धक्का दिला, तर अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (०१) दुर्दैवीपणे धावबाद झाला. ड्युमिनीने स्टार्कच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत ३५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या षटकात हर्षलच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार वसूल केले. सौरव तिवारीने (नाबाद १३) एक शानदार षट्कार ठोकला. (वृत्तसंस्था)