शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘रण’भूमी

By admin | Updated: February 13, 2015 00:31 IST

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे. १४ मैदानांवर होणा-या सामन्यांसाठी आयोजकांनीही चांगलीच कंबर कसली आहेत

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘रण’भूमी चांगलीच तापली आहे. १४ मैदानांवर होणा-या सामन्यांसाठी आयोजकांनीही चांगलीच कंबर कसली आहेत. या दोन्ही देशांची भौगोलिक परिस्थिती सारखीच असल्याने येथील खेळपट्ट्या उसळी घेणाऱ्या आहेत. विश्वचषकाच्या लढती होणाऱ्या १४ मैदानांचा घेतलेला हा आढावा...> सिडनी क्रिकेट ग्राऊंड फिल ह्यूज याच्या निधनामुळे या मैदानाला भावनिक महत्त्व आले आहे. त्यामुळे या मैदानावर आॅस्ट्रेलिया जी लढत खेळेल ती जिवाचे रान करूनच. जवळपास ४४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर आॅस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ही लढत वगळता उपांत्यपूर्व आणि उपांत्य या मोठ्या लढती होणार आहेत. हे मैदान केवळ क्रिकेटपुरतेच मर्यादित नसून येथे फुटबॉल आणि रग्बीच्या लढतीही होतात. या मैदानावर आॅस्ट्रेलियाने ३६८ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेची दाणादाण उडवली होती. आतापर्यंत येथे १० वेळा तीनशेहून अधिक धावा एका संघाने कुटल्या आहेत. जलद गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही मधल्या षटकांत मदत मिळू शकते. एक काळ असा होता की शेन वॉर्न याने आपल्या फिरकीच्या बळावर सिडनी मैदान गाजवले होते.> मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडआॅस्ट्रेलियातील प्रमुख मैदान म्हणून एमसीजीची ओळख आहे. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या मैदानावर फुटबॉलचे सामनेही खेळविण्यात येतात. जवळपास लाखभर प्रेक्षकांची क्षमता या मैदानाला आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारी एमसीजीची खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. मात्र, शेन वॉर्न याने हा अपवाद ठरविला आहे. अनेकदा त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळले आहे. त्यामुळे येथे भारत तीन जलदगती गोलंदाजांसह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना घेऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरेल.अ‍ॅडलेड ओव्हल फुटबॉल, रग्बी, तिरंदाजी, अ‍ॅथलिट्स, बेसबॉल, सायकलिंग, हॉकी आदी विविध खेळ येथे खेळले जात असल्याने ‘मल्टी’ टास्कींग अशा या मैदानाची ओळख आहे. तरीही या सर्वांत क्रिकेट हा येथील प्रसिद्ध खेळ आहे. १८७३मध्ये स्थानिक आणि संघटक यांच्यातील वाद मिटल्यानंतर हे मैदान खेळासाठी खुले करण्यात आले. ५० हून अधिक प्रेक्षकक्षमता या मैदानाची आहे. दोन्ही डावांत फलंदाज खोऱ्याने धावा चोपू शकतील अशी खेळपट्टी अ‍ॅडलेडची आहे. > ईडन पार्क १९२९-३० सालापासून येथे कसोटी क्रिकेट खेळले जात आहे आणि १९५५-५६ मध्ये न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी विजय येथेच साजरा केला होता. मात्र, याच मैदानावर १९५५ मध्ये इंग्लंडविरुद्ध अवघ्या २६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की न्यूझीलंडवर ओढावली होती. कालांतराने जरी या मैदानात परिवर्तन झाले आहे. येथेही तग धरल्यास खोऱ्याने धावा बनविणे जितके सोपे आहे, तितकेच अचूक मारा केल्यास प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळणेही सहज शक्य आहे. येथे यजमान न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता आहे.> ब्रिसबन क्रिकेट ग्राऊंड ४० हजार प्रेक्षकक्षमता असलेले हे मैदान गॅबा म्हणूनही ओळखले जाते. आॅस्ट्रेलियातील इतर मैदानांप्रमाणे येथील खेळपट्टीही जलदगती गोलंदाजांसाठी पोषक आहे. येथे १९६०-६१ साली आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढत बरोबरीत सुटली होती. फलंदाजांनाही सेट होऊन आपली छाप सोडणे सहज शक्य असल्याने येथेही धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.