शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

पाकचा आत्मविश्वास उंचावेल

By admin | Updated: March 9, 2015 09:34 IST

पाकिस्तानच्या कामगिरीचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयामुळे निश्चितच आनंद झाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या

पाकिस्तानच्या कामगिरीचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयामुळे निश्चितच आनंद झाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाचा पराभव केल्यामुळे पाक संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. या निकालामुळे लक्ष्याचा बचाव करण्यात पाकिस्तान संघ यशस्वी ठरतो, तर लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र हा संघ संघर्ष करतो, हे स्पष्ट झाले. पुन्हा एकदा मिसबाह-उल-हक शिलेदाराप्रमाणे भासला. पाक संघाची स्थिती एकवेळ २ बाद १०० अशी होती. उमर अकमलबाबत कुठवर प्रतीक्षा करायची, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनुभव नाही, असे केव्हापर्यंत सांगायचे? तो सहा-सात वर्षांपासून संघात आहे. त्याच्या प्रतिभेबाबत साशंकता नाही, पण कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत असलेल्या खेळाडूचे ओझे पाक संघ केव्हापर्यंत वाहणार ? पाक संघात अखेर सरफराजला स्थान मिळाले. त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याने डेल स्टेनविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. एबोट व मोर्ने मोर्केलविरुद्धही त्याने प्रभावी कामगिरी केली. ड्युमिनीच्या एका षटकात तीन षट्कार ठोकत त्याने संघातील अन्य खेळाडूंना मार्ग दाखविला. इंजमाम, सईद अन्वर आणि एजाज अहमद यांच्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये सरफराजप्रमाणे निर्भीड वृत्ती दिसली नाही. फॉर्मात नसलेल्या नासिर जमशेदच्या स्थानी सरफराजला खेळवण्याचा निर्णय योग्यच होता. वहाब रियाजनेही माझे लक्ष वेधले. तो एक लढवय्या क्रिकेटपटू आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत तो फर्स्ट चेंज म्हणून गोलंदाजीला आला. त्याने सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आता पाक संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. सोहेलचा (१३१ किलोमीटर) गोलंदाजीचा वेग कमी असला तरी तो धावा बहाल करीत नाही, ही बाब महत्त्वाची आहे. मिसबाहचे नेतृत्वही प्रभावित करणारे होते. बळी घेणे हाच एकमेव पर्याय आहे, याची त्याला चांगली कल्पना होती. वन-डेमध्ये नेतृत्व करण्याचा हाच योग्य मार्ग आहे. दक्षिण आफ्रिकेला पाचव्या गोलंदाजासाठी काहीतरी योजना आखावी लागेल. ड्युमिनी केवळ फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवरच उपयुक्त ठरू शकतो. त्याचसोबत लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला अडचण भासत आहे. मिलर, रोसो यांच्यामध्ये प्रतिभा आहे, पण दक्षिण आफ्रिका संघाची भिस्त यावेळी केवळ डिव्हिलियर्सवर अवलंबून आहे. ९० च्या दशकात भारतीय संघाची भिस्त ज्याप्रमाणे सचिनवर अवलंबून असायची तसेच. भारतीय संघातर्फे मोहम्मद शमी व उमेश यादवच्या कामगिरीमुळे मला आनंद झाला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी या दोन्ही गोलंदाजांसह काम केलेले आहे. संघातील खेळाडूंना मर्यादेमध्ये ठेवण्याचे श्रेय रवी शास्त्रीला जाते. अडचणीच्या स्थितीतही शास्त्री संघातील खेळाडूंना सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगतो. मी शमी व उमेशला नेहमी वेगाने धावण्याचा सल्ला देतो. शमी व उमेश आता गोलंदाजी करताना वेगाने धावत असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. त्याचा त्यांच्या गोलंदाजीमध्ये फरक दिसून येतो. भारतीय संघाच्या कामगिरीचे आश्चर्य वाटले नाही. वन-डेमध्ये हा एक उत्तम संघ असल्याची कल्पना होती. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात बऱ्याच दिवसांपासून आहे. हा संघ चॅम्पियनप्रमाणे खेळत आहे. अश्विनच्या रूपाने संघाकडे अनुभवी फिरकीपटू आहे. याव्यतिरिक्त भारताकडे पाच नियमित गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सर्व फरक दिसून येत आहे. (टीसीएम)