दुबई : पाकिस्तानचा आॅफ स्पिनर आणि सध्या वन-डे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सईद अजमलवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विवादास्पद गोलंदाजी शैलीमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यातील गोलंदाजीस बंदी घातली आहे़ पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मात्र या बंदीविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे़ आयसीसीने जारी केलेल्या वृत्तानुसार अजमलची गोलंदाजी चाचणी घेण्यात आली असता, त्याची गोलंदाजी अॅक्शन अवैध आढळून आली आहे़ त्यामुळे अजमलवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ (वृत्तसंस्था)
पाकिस्तानच्या अजमलवर बंदी
By admin | Updated: September 10, 2014 02:34 IST