शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

आॅस्करचे भवितव्य गुरुवारी ठरणार?

By admin | Updated: September 10, 2014 02:18 IST

ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टीरिअस याचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. मॉडेल रिवा स्टिंकॅम्प हिच्या मृत्यूप्रकरणी आॅस्करवर खटला सुरू

दक्षिण आफ्रिका : ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टीरिअस याचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे. मॉडेल रिवा स्टिंकॅम्प हिच्या मृत्यूप्रकरणी आॅस्करवर खटला सुरू असून, त्यावर अंतिम सुनावणी गुरुवारी होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी रिवा हिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आॅस्करच्या घरी सापडला होता. या प्रकरणातील प्रमुख मुद्यांवर टाकलेली ही नजर...‘व्हेलेन्टाइन डे’च्या आदल्या दिवशी घडलेल्या या प्रकरणात आॅस्करला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ७ एप्रिलला या खटल्याची सुनावणी झाली आणि त्या वेळी आॅस्करने न्यायालयात रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागितली. तो म्हणाला, की मला बोलण्याच्या दिलेल्या संधीचा मी फायदा उचलून प्रथम रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागतो. सकाळी डोळे उघडल्यावर मला तुमचाच विचार येतो. रिवाच्या जाण्याने तुम्हाला किती दु:ख झाले असेल, याचा विचार मी करूच शकत नाही. मी रिवावर प्रेम करत होतो.रिवाच्या मृतदेहाची छायाचित्रे ज्या वेळी न्यायालयातील मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात आले, त्या वेळी आॅस्करने उलट्या करण्यास सुरुवात केली. पॅथलॉजिस्ट गेर्ट सायमन यांनी रिवावर कशा प्रकारे तीन गोळ्या झाडण्यात आल्या, याचे वर्णन न्यायालयात केले. या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी रिवाने आॅस्करला पाठवलेला मेसेज २४ मार्च रोजी पोलीस अधिकाऱ्याने वाचला. त्यात रिवाने म्हटले होते की, माझ्या प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट होतोस, त्याची मला कधी कधी भीती वाटते. हे दोघेही एकमेकांना ‘एंजल’ आणि ‘बाबा’ या टोपणनावाने संबोधत होते आणि यांच्यातील ९० टक्के संवाद हा प्रेमाचाच होता. क्रिकेट बॅट दरवाजावर आदळण्याचा आवाज आणि गोळ्या झाडण्याचा आवाज यात साम्य जाणवत असल्याने खटल्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न आॅस्करच्या वकिलाने केला. त्यांच्या मते रिवा बाथरूममध्ये असताना तेथून ‘वाचवा वाचवा’ अशी हाक ऐकू आली आणि ती ऐकून आॅस्कर तेथे पोहोचला. दरवाजा बंद असल्याने त्याने बाहेरून गोळ्या झाडल्या आणि यात चुकून रिवाचा मृत्यू झाला.