हॉकीला चालना द्यावी- अजय चाबुकस्वार
By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST
अन्य खेळांच्या तुलनेत हॉकी मैदानी आणि अथक पर्शिम करायला लावणारा खेळ आह़े त्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिज़े सोलापुरात सध्या हॉकीला पोषक वातावरण निर्माण झाले आह़े याचा पुरेपूर लाभ घेत खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवून सोलापूरचा नावलौकिक करावा़
हॉकीला चालना द्यावी- अजय चाबुकस्वार
अन्य खेळांच्या तुलनेत हॉकी मैदानी आणि अथक पर्शिम करायला लावणारा खेळ आह़े त्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिज़े सोलापुरात सध्या हॉकीला पोषक वातावरण निर्माण झाले आह़े याचा पुरेपूर लाभ घेत खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवून सोलापूरचा नावलौकिक करावा़शाळेने सर्व सुविधा उपलब्ध केल्या: स्नेहा शालगर (सहस्त्रार्जुन प्रशाला)हॉकी राष्ट्रीय खेळ आह़े आमच्या शाळेतील हॉकी हा मुख्य खेळ आह़े शाळेने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ विद्यार्थ्यांनी जिद्दीने व स्वप्रयत्नाने कसे पुढे जावे ते त्यांनी स्वत: ठरवून घ्यायला पाहिज़े मी दैनंदिन सराव करीत असत़े याचे फळ म्हणजे आज मी महाराष्ट्र राज्य हॉकी संघात गोलकीपरची प्रमुख भूमिका निभावत आह़े माझ्या विकासासाठी मला भौतिक परिस्थिती खूपच उपयोगात आली़हॉकी माझा आवडता खेळ: आरती तिवारी (सहस्त्रार्जुन प्रशाला)राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीची वेगळीच ओळख आह़े या खेळात जोश आणि मनोरंजनही आह़े मला माझ्या गुरुजनांपासून हॉकीची प्रेरणा मिळाली़ आज मी महाराष्ट्र संघात खेळतेय याचे र्शेय आई-वडील आणि माझ्या शाळेला मी देतेय़ आजपर्यंत ज्या ज्या साधनांची मला गरज होती ते शाळेने उपलब्ध करून दिलेले आह़े भारतीय संघात खेळण्याचे माझे स्वप्न आणि ध्येय आह़े यासाठी मी अथक पर्शिम घेणार आह़ेमला हॉकीचा अभिमान आहे- शिवगंगा व्हनमळगीहॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, याचा मला अभिमान वाटतो़ आमच्या शाळेत हॉकीला पुरेपूर वाव दिला जातो़ त्यामुळे मी वेगवेगळ्या स्तरावर खेळून आज महाराष्ट्र राज्य हॉकी संघाची कर्णधार म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडत आह़े यात मी भरपूर यशही मिळवले आह़े मला पीएसआय व्हायचे असून माझ्या शाळेकडून मिळणार्या सहकार्यामुळे माझे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल़नियमित सरावाचा फायदा- रेणुका तलवारआमच्या शाळेतील हा अग्रेसर खेळ असून, यात मुलींचा मोठा सहभाग आह़े मला लहानपणापासूनच हॉकीची आवड आह़े दररोज मी नियमितपणे सराव करीत असत़े त्यामुळे मी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत़ राज्यस्तरावरदेखील आमच्या संघाची कामगिरी समाधानकारक राहिली आह़े सलग दुसर्यांदा माझी महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झालेली आह़े मला मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेत आह़े