शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

भारत आशियाई टी-२० ‘चॅम्पियन’

By admin | Updated: January 25, 2016 02:32 IST

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४४ धावांनी धुव्वा उडवून यजमान भारताने अंधांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले.

कोची : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४४ धावांनी धुव्वा उडवून यजमान भारताने अंधांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानने साखळी फेरीत भारताला नमवले होते. अंतिम सामन्यात भारताने त्या पराभवाचा चांगलाच वचपा काढताना दिमाखात बाजी मारली.जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या रंगतदार अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २०८ धावांचा हिमालय उभारला. दीपक पटेल याने सर्वाधिक धावा काढताना ४० धावांची आक्रमक खेळी केली. तर केतन पटेलने त्याला उपयुक्त साथ देताना ३४ धावांची खेळी केली. यानंतर भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना पाक संघाची सुरुवात खराब झाली. सामन्यातील दुसराच चेंडू टोलावताना फटका चुकल्याने सलामीवीर हरुन खान झेलबाद झाला. यामुळे धावांचे खाते उघडण्यापूर्वीच पाक संघाला पहिला धक्का बसला. यानंतर पुढच्याच षटकात मेहमूदचा त्रिफळा उडवून भारतीयांनी वर्चस्व मिळवले. या झटपट दोन धक्क्यानंतर पाक संघ अखेरपर्यंत सावरु शकला नाही. भारतीयांनी यावेळी भेदक मारा केला आणि केवळ ४० धावांत पाकिस्तानचे ४ खंदे फलंदाज बाद करुन त्यांना दबावाखाली आणले. यावेळी आमीर इशफाकने २१ चेंडूत ३८ धावांचा तडाखा देत दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. आमीर नंतर अनीस जावेद यांनी इसरार हसन यांनी पाक संघाला सावरताना ११ व्या षटकांत ११३ धावांची मजल मारुन दिली. मात्र पुन्हा फलंदाजीला गळती लागल्याने त्यांचा डाव १८.५ षटकांत १६४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडून अनीसने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर दीपकने निर्णायक २ बळी घेत भारताच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.