दिल्ली : खेळाची प्रतिमा मलिन होईल, असे मी चुकीचे काहीच केले नाही़, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवनियुक्त चेअरमन एऩ श्रीनिवासन यांनी व्यक्त केले़सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीवरून श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून दूर राहण्यास सांगितले होते, तरीही आयसीसीत ते चेअरमनपदी आले हे विशेष. चेअरमन पदापासून रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे त्यांचा चेअरमनपदाचा मार्ग मोकळा झाला. श्रीनिवासन पुढे म्हणाले, आयपीएल फिक्सिंगप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मी निर्दोष आहे हे स्पष्ट होईल. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर जास्त भाष्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले़ सेवानिवृत्त न्या़ मुकुल मुगदल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने आपला अहवाल सादर केल्यांनतर पुढची भूमिका काय हे ठरवू, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले आहे़ कायदेशीर बाबीत अडकल्यानंतरही श्रीनिवासन आयसीसीच्या चेअरमनपदी विराजमान झाले़ याबद्दल ते म्हणाले़ काही गटांनी मला या पदापासून दूर करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांना यश आले नाही़ त्यानंतर आयसीसीच्या अन्य सदस्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि माझ्यावर विश्वास टाकला याचे मला समाधान आहे़ त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)
मी काहीही चुकीचे केले नाही - एन. श्रीनिवासन
By admin | Updated: July 4, 2014 04:49 IST