बर्मिंघम : ''अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच.'' टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रविवारच्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेत हे वक्तव्य केले.भारताला १८१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. विराट कोहलीच्या दौर्यातील पहिल्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताचा डाव २0 षटकांत ५ बाद १७७ धावांवर थांबला. यावर धोनी म्हणाला,'सहा चेंडूवर १७ धावा काढणे नेहमी कठीण काम असते. मी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर याच षटकांत ज्या चेंडूवर किमान चौकार मारायला हवे होते असे दोन चेंडू गमावले. परिस्थिती विपरीत असली की चेंडू देखील बॅटवर घेणे अवघड जाते. दुसर्या टोकाला अंबाती रायुडू होता. मी मात्र एकेरी धाव न घेता विजयी शॉट मारण्याचा निर्णय घेतला. चेंडू माझ्या बॅटवर येत आहे असे वाटले होते. मी सामना जिंकून देऊ शकतो अशी खात्रीहो होती. मात्र तसे घडले नाही. षटक सुरू होण्याआधीच सामना मी संपवेन असा मनोमन विचारही केला. रायुडू खेळपट्टीवर नुकताच आला होता. त्यामुळे मी स्वत:कडे सूत्रे ठेवली. सामना जिंकण्यात मोठी जबाबदारी उचलणे ही माझी ताकद असल्याने माझा आत्मविश्वास कायम होता. पण स्थिती बाजूने नव्हती.'सामन्यादरम्यान गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यात अपयशी ठरले. त्यांनी यॉर्कर चेंडू टाकण्याऐवजी खाली राहणारे फुलटॉस चेंडू टाकले. यावर धोनीने चिंता व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, 'या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळविल्याने चेंडू नवा कोरा होता. अशावेळी डेथ ओव्हरमध्ये मारा करणे अवघड जाते. लाईन आणि लेग्ंथ बदलण्यात अपयश आल्यामुळे डेथ ओव्हरमध्ये अधिक धावा मोजाव्या लागल्या.'दोन महिन्यांचा हा दौरा कसा राहिला, असे विचारताच धोनी म्हणाला,'या दौर्यात अनेक युवा खेळाडू होते. पाच सामन्यांची कसोटी मालिका लांबलचक असते. याआधी आमचा कुठलाही खेळाडू दीर्घ मालिका खेळला नाही. पहिल्या दोन सामन्यात सरस कामगिरी तर झालो पण नंतरच्या तिन्ही सामन्यात कामगिरी ढेपाळली. त्यांनतर वन डेतही चांगली कामगिरी अपेक्षित होती पण तसे घडू शकले नाही.' या दौर्याच्या मधल्या काळात आमच्याकडून खराब खेळ झाला. असे प्रत्येक संघासोबत घडते. अनुभव मात्र सर्वकाही शिकायला भाग पाडतो. यानंतर विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असल्याने चुका सुधारू शकलो तर मला आत्यानंद होईल.'(वृत्तसंस्था)
पराभवास मी जबाबदार : धोनीची कबुली
By admin | Updated: September 9, 2014 03:14 IST