पुणे : गोलकिपर आकाश चिकटे याचे दिल्लीहून पुण्यात पहाटे साडेपाच वाजता आगमन झाले. विमानतळावर हॉकी महाराष्ट्रचे महासचिव मनोज भोरे, बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रूपचे कोच सागरसिंग ठाकूर, राष्ट्रीय हॉकी पंच सौरवसिंग राजपूत, रोहण जावळे, निखिल जाधव यांच्यासह आकाशच्या बीईजी संघातील सहकाऱ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. सहकाऱ्यांनी आणलेली पुष्पगुच्छे तसेच हारतुरे पाहून आकाश कमालीचा भारवला होता. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात याहून चांगली कामगिरी करण्याचे त्याने सहकाऱ्यांना आश्वासन दिले.
हॉकी महाराष्ट्रतर्फे गोलकिपर आकाशचे स्वागत!
By admin | Updated: November 2, 2016 07:16 IST