शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ

By admin | Updated: July 18, 2016 06:22 IST

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे. क्रिकेटने सर्वांवर जादू केली आहे. पण क्रिकेट हा खेळ आॅलिम्पिकमध्ये नाही, याचीसुद्धा सर्वांना कल्पना आहे. आॅलिम्पिक म्हटले, की जगातील क्रीडापटूंना एक कुंभमेळा वाटतो. प्रत्येक देशातील विविध खेळांचे खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाचा ध्वज तेथे फडकाविण्यासाठी जिवाची बाजी लावतात. प्रत्येक देश आपला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सांघिक प्रकारासाठी सर्वश्रेष्ठ संघ निवडत असतो. अशा या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. आॅलिम्पिकमध्ये हॉकी साम्राज्यावरील भारतीय संघाचा सूर्य कधी मावळणार नव्हता. १९२८ ते १९५२ या काळात भारतीय संघाने हॉकीवर अधिराज्य गाजविले. अर्थातच याचे सर्व श्रेय जाते ते मेजर ध्यानचंद, लेसली क्लाड्युअस, बलबीर सिंग सिनियर, अजितपाल सिंग, उधम सिंग, के. डी. सिंग बाबू, मोहम्मद शाहिद, शफर इक्बाल यांना. १९२८ ते १९५६ या काळात भारतीय हॉकी संघाने सलग ६ सुवर्णपदके जिंकली होती. त्यांनी सलग २४ सामने आपल्या नावावर केले होते. या काळात त्यांनी एकूण १७८ गोल केले होते. एक काळ असा होता, की महाराष्ट्राच्या धनराज पिल्लेचासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा दबदबा होता. १९७६ नंतर मात्र भारतीय हॉकी संघाला पदक जिंकता आले नाही. पुन्हा १९८० मध्ये मॉस्को येथे भारतीय हॉकी संघाने कमाल केली. या वेळी त्यांनी सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. नंतर १९८४, १९८८ व १९९२ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना कोणताच चमत्कार करता आला नाही. यानंतर भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ संपत आल्यासारखे झाले होते. भारतामध्ये हॉकी मागे पडले आणि क्रिकेटने क्रीडाप्रेमींवर मोहिनी घातली. पण, आता थोडी परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय हॉकीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला आहे. रिओ येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपली प्रवेशिका निश्चित केली आहे. संघामध्ये सरदारसिंग, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, मनप्रीत सिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मीकी आणि आपल्या संघाची चीनची भिंत असलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हे सर्वच खेळाडू चांगल्या बहरात आहेत. गेल्या काही महिन्यांत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या या खेळाडूंनी जगाला दाखवून दिले आहे, की हम भी कुछ कम नहीं. त्यामुळे भारतीय संघाकडून या वर्षी पदकाची अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही. - शिवाजी गोरे>५ ते २१ आॅगस्ट २०१६भारतीय हॉकी संघाने १९२८ मध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर १९३२ (लॉस एंजिलिस), १९३६ (बर्लिन), १९४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) व १९५६ (मेलबर्न) हा पदकांचा सुवर्णकाळ होता. मेलबर्नमध्ये हॉकी संघाने सुवर्ण जिंकले, त्या वेळेस ध्यानचंद भारतीय संघात नव्हते. १९६० मध्ये रोम (इटली) येथे मात्र भारतीय हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले. पुन्हा १९६४ मध्ये टोकिओ येथे भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला. १९६८ मध्ये मेक्सिको येथे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १९७२ मध्ये म्युनिच येथेसुद्धा कांस्यपदकच पदरी पडले.