शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

फुटबॉल जोड

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST

उभय संघांचे गोलकिपर सर्वोत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेंटिनाचा सर्जियो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जर्मनीतर्फे लेफ्ट बॅक बेनेडिक्ट हेविडिसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून सेंटर बॅक मॅट्स हमल्स व जेरोम बोटेंग यांनी छाप सोडली आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोओकिम लो यांनी कर्णधार फिलिप लाम याला मिडफिल्डच्या स्थानावरून राईट बॅकमध्ये स्थान देत बचाव मजबूत केला आहे.

उभय संघांचे गोलकिपर सर्वोत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेंटिनाचा सर्जियो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जर्मनीतर्फे लेफ्ट बॅक बेनेडिक्ट हेविडिसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून सेंटर बॅक मॅट्स हमल्स व जेरोम बोटेंग यांनी छाप सोडली आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोओकिम लो यांनी कर्णधार फिलिप लाम याला मिडफिल्डच्या स्थानावरून राईट बॅकमध्ये स्थान देत बचाव मजबूत केला आहे.
अर्जेंटिनाची बचावफळीही मजबूत आहे. अर्जेंटिनाने अखेरच्या साखळी सामन्यात नायजेरियाचा ३-२ ने पराभव केल्यानंतर गेल्या तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही. साबेला संघाचा समतोल कायम राखण्यावर भर देत आहेत. रोमेरोचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. राईट बॅक पेब्लो जबालेटा, सेंटर बॅक एजक्विल गेरे आणि मिडफिल्डर झेविअर मश्चेरानो यांनीही या स्पर्धेत छाप सोडली आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या लिओनल मेस्सीची या स्पर्धेतील कामगिरी समाधानकारक ठरली आहे. मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे, पण विश्वविजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अद्याप त्याला सत्यात उतरविता आलेले नाही. मेस्सीने साखळी फेरीत बोस्निया, इराण आणि नायजेरियाविरुद्ध साखळी फेरीतील तीन सामन्यात तीन गोल नोंदविले, पण बाद फेरीत स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि हॉलंडविरुद्ध त्याला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. पेले, आंद्रेस इनिस्ता, डिएगो मॅराडोना, जिनेदिन जिदान आणि रोनाल्डो यांनी फुटबॉलच्या सर्वोच्च व्यासपीठावर चमकदार कामगिरी करीत आपले श्रेठत्व सिद्ध केलेले आहे. मेस्सीकडे अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध इतिहास नोंदविण्याची संधी आहे.