शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

फर्डिनेंडने सोडली मँचेस्टरची साथ

By admin | Updated: May 14, 2014 02:12 IST

स्टार डिफेंडर रिओ फर्डिनेंड याने जगातील प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली आहे.

लंडन : स्टार डिफेंडर रिओ फर्डिनेंड याने जगातील प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडची साथ सोडली आहे. कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे १२ वर्षांपासून क्लबकडून खेळणारा फर्डिनेंडने हा निर्णय घेतला आहे़ ३५ वर्षीय फर्डिनेंड याचा सध्याच्या कराराचा अवधी लवकरच संपणार आहे, तरी सुद्धा मँचेस्टर क्लबने नवीन कराराचा प्रस्ताव ठेवलाच नाही़ त्यामुळे त्याने हा क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याने मँचेस्टरसाठी ४५४ सामने खेळले आहेत़ त्यात त्याने ८ गोल नोंदविले आहेत़ इंग्लंडचा फर्डिनेंड म्हणाला, लहानपनापासून या क्लबकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते़ ते पूर्ण झाले याचा विशेष आनंद आहे़ मात्र, मला मनासारखा निरोप घेता आला नाही, याची खंत आहे, असे असले तरीही ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या यशात योगदान दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे़ दरम्यान, मँचेस्टर युनायटेडने फर्डिनेंडने दिलेल्या योगदानामुळे क्लब लिजेंड म्हणून क्लबशी जुडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे़ विशेष म्हणजे क्लबचे अनेक माजी खेळाडू क्लब लिजेंड म्हणून क्लबशी जुडलेले आहेत़ फर्डिनेंडला मँचेस्टर युनायटेडने २००२ मध्ये तीन कोटी पाऊंडमध्ये खरेदी केले होते़ हा त्यावेळचा एक विक्रम होता़ फर्डिनेंड याने मँचेस्टरकडून आपला पहिला सामना ऑगस्ट २००२ ला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळला होता़ गत रविवारी ईपीएलच्या सत्रातील अखेरच्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड क्लब विरुद्ध मँचेस्टरकडून त्याचा अखेरचा सामना होता़ विशेष म्हणजे मँचेस्टरकडून खेळताना फर्डिनेंडला सुरुवातीला विशेष कामगिरी करता आली नव्हती़ मात्र, २००२-०३ मध्ये प्रीमिअर लीगमध्ये किताब जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती़ सप्टेंबर २००३ मध्ये एक ड्रग्ज टेस्ट न केल्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती़