केदार लेले, लंडनयुरो चषक पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात डॅनी वेलबेकने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर इंग्लंडने स्वित्झर्लंडवर २-० असा विजय मिळवला. डॅनी वेलबेकने दोन्ही गोल दुसऱ्या सत्रात अनुक्रमे ५८ व्या आणि ‘इंज्युरी टाइम’ मध्ये (९०+४ व्या मिनिटाला) झळकावले. इंग्लंड आणि स्वित्झर्लंड या लढतीचा निकाल २-० असा असला तरी हा सामना निश्चितच एकतर्फी नव्हता. या सामन्यात दर्जेदार फुटबॉल बघायला मिळालं. पूर्वार्धात इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यात अटीतटीची झुंज बघायला मिळाली. बचाव व आक्रमण अशा दोन्ही बाबींमध्ये उभय संघ छान खेळ करत असल्याने गोलच्या समान संधी या संघांना उपलब्ध झाल्या पण दोन्ही संघांनी त्या लिलया परतवून लावल्या ज्यामुळे मध्यांतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात स्वित्झर्लंडने आक्रमक पवित्रता घेतला, पण इंग्लंडने त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. ५८ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडचे आक्रमकण परतवून लावत वेन रुनीने रहीम स्टर्लिंगकडे चेंडू सोपवला. डॅनी वेलबेकने रहीम स्टर्लिंगच्या पासवर गोल केला आणि इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. स्वित्झर्लंडला संधी उपलब्ध झाल्या होत्या पण या संधीचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करत आले नाही. ‘इंज्युरी टाईम’ मध्ये सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना वेन रुनीच्या जागी बदली खेळाडू म्हणून ओल्या रिकी लँबर्टच्या उत्कृष्ठ पासवर डॅनी वेलबेकने दुसरा गोल नोंदवून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडचा स्वित्झर्लंडवर २-० ने विजय
By admin | Updated: September 10, 2014 02:37 IST