शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

कोलकाताचा सहज विजय

By admin | Updated: May 12, 2014 05:10 IST

कोलकाता नाईट रायडर्सने सांघिक खेळाचा पुन्हा एकदा नजराणा पेश करत तगड्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्स राखून विजय साजरा केला.

कटक : कोलकाता नाईट रायडर्सने सांघिक खेळाचा पुन्हा एकदा नजराणा पेश करत तगड्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्स राखून विजय साजरा केला. या विजयाबरोबर कोलकाताने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. सलामीवीर रॉबीन उथप्पा (४६) आणि गौतम गंभीर (६३*) यांच्या दमदार खेळानंतर मनीष पांडेनेही (३६*) सुरेख खेळ करत पंजाबने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य १८व्या षटकांतच पूर्ण केले. त्तपूर्वी पीयुष चावल्याच्या फिरकीने पंजाबच्या धावांवर अंकुश ठेवला. सेहवाग खेळला, पण... २५-३० धावांवर समाधान मानून तंबूत परतणार्‍या विरेंद्र सेहवागला कोलकाताविरुद्ध सूर गवसला आणि त्याने तुफान फटकेबाजी मारून ७२ धावांची खेळी केली. पण, त्याच्या या खेळीवर इतर फलंदाजांना इमले उभारता न आल्याने पंजाबला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४९ धावांवरच समाधान मानावे लागले. आज सेहवाग भलत्याच फॉर्मात होता आणि त्याने जॅक कॅलिसच्या पहिल्याच षटकात १७ धावा चोपून याचा नजराणा दाखवला. मनदीप सिंह मात्र भोपळाही न फोडता मॉर्ने मॉर्केलच्या गोलंदाजीवर रॉबीन उथप्पाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. वृद्धिमान सहाही ९ चेंडूंत ३ चौकारांसह १५ धावा करून मॉर्केलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. या दोन विकेट्स फटाफट पडल्या असल्या तरी सेहवाग कुणाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एरवी मुक्तपणे फटकेबाजी मारणारा मॅक्सवेल थोडासा सैरभैर दिसला. पीयुष चावलाच्या फिरकीचे त्याला उत्तर सापडत नव्हते आणि ११व्या षटकांत तो चावलाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सेहवागने मात्र एक बाजूने फटकेबाजी करत ५० चेंडूंत ११ चौकार व एक षटकार खेचून ७२ धावांची खेळी केली. सेहवागला चावलाने त्रिफळाचीत केले. शेवटच्या षटकात खोर्‍याने धावा करून मोठा पल्ला गाठण्याची जबाबदारी मिलर व बेली यांच्यावर होती. मात्र, मिलर (१३) माघारी परतला. मिशेल जॉन्सनने शेवटच्या षटकात १ चौकार व १ षटकार खेचून संघाला दिडशेसमीप पल्ला गाठून दिला. (वृत्तसंस्था)