निंबळकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने सोमवारी उद्घाटन : ग्रामीण खेळांडूना मिळणार संधी
By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST
अहमदनगर : दीपावलीच्या सुयांमध्ये सालाबादप्रमाणे नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच (कै.) संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित दीपावली क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार ३१ ला आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
निंबळकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने सोमवारी उद्घाटन : ग्रामीण खेळांडूना मिळणार संधी
अहमदनगर : दीपावलीच्या सुट्टयांमध्ये सालाबादप्रमाणे नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच (कै.) संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित दीपावली क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार ३१ ला आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा असोसिएशन मान्यता प्राप्त दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे सिझन बॉलवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे संयोजक माधवराव लामखडे यांनी सांगितले. निंबळक येथे होणार्या क्रिकेट स्पर्धेत शहर व ग्रामीण भागातील १६ संघ सहभागी होणार आहे. सिझन बॉलवर स्पर्धा असल्याने क्रिकेट मधील उत्कृष्ट संघांना प्रवेश देण्यात आला आहे. मर्यादित क्रिकेट संघाचे सामने साखळी पध्दतीने खेळवले जाणार आहे. प्रथम विजेत्या संघास ११ हजार रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास ७ हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह, तृतीय संघास ५ हजार रोख स्मृतीचिन्ह व चतुर्थ संघास ३ हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरणार्या खेळाडूंना रोख स्वरुपात पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती लामखडे यांनी दिली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय जपकर, सबाजी पानसंबळ, पोपट खामकर, रावसाहेब गेरंगे, अमोल शिंदे, घनशाम म्हस्के, राजू रोकडे, बाबा पगारे, बाळू कोतकर, सुनील जाजगे, अजय लामखडे, केतन लामखडे आदींसह निंबळकचे ग्रामस्थ प्रयत्नशील आहे. क्रिकेट रसिकांनी सामने पाहण्यासाठी निंबळकच्या ग्रीन हिल मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे...............