जोहान्सबर्ग : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार आणि अष्टपैलु खेळाडू क्लाईव्ह राइस (६६) यांचे ब्रेनट्युमरच्या आजाराने मंगळवारी निधन झाले. आफ्रिकेने देशाच्या मुख्यालयावरील राष्ट्रीय ध्वजही अर्ध्यावर उतरवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राइस यांनी आपल्या कारकिर्दीतला बराच खेळ त्या काळात केला जेव्हा दक्षिण आफ्रिकेला आतंरराष्ट्रीय स्तरावर बंदी होती. दक्षिण आफ्रिकेवरची बंदी हटवल्यावर पहिले कप्तान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लोगार्ट म्हणआले की, क्लाईव राइस हे पहिले कप्तान होते, ते एक लढवय्ये होते. अखेरच्या क्षणापर्यंत राइस आजाराशीही लढत होते.लोगार्ट म्हणाले, क्लाईव यांनी १९९१ चा ऐतिहासिक भारत दौरा केला. त्यात एक कप्तान आणि अष्टपैलु खेळाडू म्हणून त्यांची आठवण राहील. त्यांना खेळण्याची संधी योग्य होती.राइस यांनी प्रथम श्रेणी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांत ३९ हजारापेक्षा अधिक धावा व १५०० पेक्षा जास्त बळी मिळवले. त्यांच्या सन्मानार्थ दक्षीण अफ्रिकेचा संघ गुरूवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात काळी पट्टी बांधून खेळणार आहे.(वृत्तसंस्था)
क्लाईव्ह राइस यांचे निधन
By admin | Updated: July 29, 2015 02:24 IST