जयंत गोखले,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या अनेक वर्षातल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा विलक्षण अटीतटीने लढल्या जातायत. प्रत्येक डावागणिक ही चुरस वाढत जाताना आढळून आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत मर्यादित असलेली डावांची संख्या. अवघ्या १२ डावांच्या मालिकेत जेव्हा प्रत्येक खेळाडूला फक्त सहा वेळा पांढरी मोहरी मिळणार असतात तेव्हा त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याकडेच दोन्ही खेळाडूंचा कल असतो.तमाम बुद्धीबळ विश्वात सर्वाधिक लांबलेल्या अनातोली कार्पोव्ह विरुद्ध गॅरी कास्पारोव्ह यांच्यातल्या १९८४ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशाा कमी चालीत बरोबरी होत होत्या. सलग १७ सामने बरोबरीत सुटले होते आणि तेदेखील ३० खेळ्या होतायत न होतायत त्यातच!या पार्श्वभूमीवर आजच्या बरोबरीमुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे, लढवय्या कार्लसननी पांढरी मोहरी असून आनंदला २० खेळ्यांतच कसे मोकळे सोडले? कार्लसन थकला असेल का? का कार्लसनला आनंदच्या तयारीचे दडपण आले होते का? असे एक ना अनेक तर्क मांडले जातायत.आनंदची तयारी अफलातून होती यात काही संशयच नाही. आनंदच्या ११ पासून १४ पर्यंतच्या चारही खेळ्या या कार्लसनसाठी नवीन होत्या आणि आनंदनी ज्या झपाट्याने त्या खेळला त्यावरून त्याचा आत्मविश्वास कार्लसनला धडकी भरवून गेला असेल असं वाटतंय. कारण, कार्लसनने भरपूर विचार करून सरळ सरळ बरोबरीचीच योजना आखली आणि आनंदच्या तयारीपुढे नमते घेतले. २० व्या चालीला बरोबरी मान्य केली तेव्हा आनंदच्या घड्याळात कार्लसनपेक्षा ५० मिनिटे जास्त होती!आता शेवटचे तीन डाव उरलेत आणि त्यातल्या दोन डावांत आनंदला पांढरी मोहरी आहेत... त्या एका दुर्दैवी पराभवानंतर आनंदने स्वत:ला कमालीचे सावरले आहे आणि प्रत्येक डावागणिक त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.फक्त एक विजय, बाज....!
कार्लसनकडे १ गुणाची आघाडी; आनंदचे पारडे मानसिकदृष्ट्या वरचढ
By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST